AAI Bharti 2025: भारतीय विमानतळ प्राधिकरणात (Airports Authority of India) एकूण 976 रिक्त पदांसाठी भरती जाहीर झाली आहे. ही भरती BE./B.Tech पदवीधारक उमेदवारांसाठी असून इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात आले आहेत. अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे, त्यामुळे पात्र उमेदवारांनी वेळ न घालवता त्वरित अर्ज प्रक्रिया सुरू करावी.
ही भरती भारतीय विमानतळ प्राधिकरणात काम करण्याची सुवर्णसंधी आहे. देशातील महत्त्वाच्या विमानतळांवर काम करण्याची संधी मिळाल्यास केवळ नोकरीच नाही तर प्रतिष्ठा आणि नोकरीचा चांगला अनुभव पण मिळतो. यासोबतच पगार, भत्ते आणि इतर सरकारी सुविधा देखील मिळतात. त्यामुळे BE./B.Tech पदवीधारकांसाठी ही नक्कीच एक आकर्षक करिअर संधी आहे.
भरतीसंबंधी अधिकृत नोटिफिकेशनमध्ये पदांची संख्या, पात्रता, वयोमर्यादा, पगार, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा याची सविस्तर माहिती दिली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी सर्वप्रथम नोटिफिकेशन नीट वाचावी. त्यानंतर दिलेल्या सूचनांनुसार आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत, जेणेकरून अर्ज करताना कोणताही विलंब होणार नाही.
AAI Bharti 2025 मधील संपूर्ण माहिती या लेखामध्ये दिली आहे. त्यामुळे लेख शेवटपर्यंत नीट वाचा आणि त्यानुसार तुमचा अर्ज भरा. शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज केल्यास आणि भरतीची योग्य तयारी केली तर भारतीय विमानतळ प्राधिकरणात तुम्हाला नोकरी मिळवणे नक्कीच शक्य होईल.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
AAI Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
विवरण | माहिती (Details) |
---|---|
भरतीचे नाव | AAI Bharti 2025 |
भरती करणारी संस्था | एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया (Airports Authority of India) |
पदाचे नाव | ज्युनियर एक्झिक्युटिव |
एकूण जागा | 976 |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार भिन्न – BE./B.Tech |
वयोमर्यादा | 18 ते 27 वर्षे |
पगार / मानधन | ₹40,000/- ते ₹1,40,000/- प्रति महिना |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन (Online) |
अर्ज फी | General/OBC/EWS: ₹300/- SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाइट | https://www.aai.aero |
AAI Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव | पद संख्या |
ज्युनियर एक्झिक्युटिव (Architecture) | 11 |
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐Civil) | 199 |
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐Electrical) | 208 |
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐ Electronics) | 527 |
ज्युनियर एक्झिक्युटिव (IT) | 31 |
Total | 976 |
AAI Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
पदाचे नाव (Disciplines) | शिक्षण |
---|---|
ज्युनियर एक्झिक्युटिव (Architecture) | उमेदवाराने आर्किटेक्चर पदवी मिळवलेली असावी, आणि त्याने GATE 2023/2024/2025 ची परीक्षा दिलेली असावी. |
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐Civil) | उमेदवार हा BE./B.Tech (Electrical) मध्ये पदवीधर असावा, आणि त्याने GATE 2023/2024/2025 ची परीक्षा दिलेली असावी. |
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐Electrical) | उमेदवार हा BE./B.Tech (Electrical) मध्ये पदवीधर असावा, आणि त्याने GATE 2023/2024/2025 ची परीक्षा दिलेली असावी. |
ज्युनियर एक्झिक्युटिव (Engineering‐ Electronics) | उमेदवार हा BE./B.Tech (Electronics/ Telecommunications/ Electrical) मध्ये पदवीधर असावा, आणि त्याने GATE 2023/2024/2025 ची परीक्षा दिलेली असावी. |
ज्युनियर एक्झिक्युटिव (IT) | उमेदवार हा BE./B.Tech (Computer Science/ Computer Engineering/ IT / Electronics) किंवा MCA मध्ये पदवीधर असावा, आणि त्याने GATE 2023/2024/2025 ची परीक्षा दिलेली असावी. |
AAI Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
वर्ग | वयोमर्यादा | सवलत |
---|---|---|
सर्वसाधारण (General / UR) | 18 ते 27 वर्षे | सवलत नाही |
OBC | 18 ते 30 वर्षे | 03 वर्षे वयोमर्यादेत सूट |
SC / ST | 18 ते 32 वर्षे | 05 वर्षे वयोमर्यादेत सूट |
AAI Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) पात्रता तपासणी –
पदा नुसार जी काही पात्रता लागते ती पात्रता या ठिकाणी तपासली जाईल, सोबतच अर्जदाराने GATE 2023 / GATE 2024 / GATE 2025 मधील संबंधित विषयातील परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अर्ज करताना सर्व पात्रता अटी 27 सप्टेंबर 2025 या तारखेनुसार लागू राहतील.
2) शॉर्टलिस्टिंग –
अर्जातील माहितीच्या आधारे उमेदवारांची Application Verification साठी निवड केली जाईल. जे उमेदवार पदासाठी शैक्षणिक आणि इतर बाबी मध्ये पात्र असेल तर अशा उमेदवाराची शॉर्टलिस्टिंग केली जाते.
3) कागदपत्रे पडताळणी –
जे उमेदवार निवडले जातील त्यांना पुढे कागदपत्रे पडताळणी साठी बोलावले जाईल, या टप्प्यात उमेदवारांची मूळ कागदपत्रे तपासली जातील. सर्व कागदपत्रे ok असणे आवश्यक आहेत, जर एकही कागदपत्रे नसतील किंवा काही प्रोब्लेम असेल तर अशा परिस्थितीत उमेदवार अपात्र ठरवले जातील.
4) मेरिट लिस्ट –
त्यानंतर जे काही उमेदवार पुढच्या टप्प्यासाठी पात्र होतील त्यांना मेरीट लिस्ट मध्ये add केले जाईल, त्यानंतर मेरीट लिस्ट द्वारे उमेदवारांची अंतिम निवड हि केली जाईल. अंतिम निवड GATE स्कोअरच्या आधारे केली जाईल, आणि जर दोन उमेदवारांचा स्कोअर समान असल्यास वय आणि नंतर पदवीतील मार्क्स विचारात घेतले जातील.
थोडक्यात वरील प्रमाणे अर्जदार उमेदवारांची निवड हि AAI Bharti साठी केली जाईल, यात पुढे काही पदांसाठी प्रशिक्षण व बॉण्ड साईन करणे आवश्यक असणार आहे, त्याच बरोबर पुढे उमेदवारांची वैद्यकीय चाचणी हि देखील घेतली जाणार आहे. आणि नंतरच उमेदवारांना पोस्टिंग साठी पाठवले जाणार आहे.
AAI Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | तारीख |
---|---|
अर्जाची सुरुवात | 28 ऑगस्ट 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 27 सप्टेंबर 2025 |
AAI Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
भरतीची जाहिरात PDF | Notification वाचा |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
AAI Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या वेबसाइटवर (www.aai.aero) Recruitment Section मध्ये जाऊन “APPLY ONLINE” वर क्लिक करा.
- AAI Recruitment 2025 चा फॉर्म Open होईल, तिथे तुम्हाला फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरायची आहे.
- अर्नाजामध्ये नाव व इतर माहिती प्रमाणपत्रानुसार बरोबर टाका, चूक होऊ देऊ नका.
- त्यानंतर मग तुमचा फोटो व सही अपलोड करा.
- पूर्ण फॉर्म भरून झाला कि मग भरती साठी जी काही फी आहे ती फीस ऑनलाईन स्वरुपात भरून घ्या.
- शेवटी एकदा अर्जाचा Preview पहा, जी माहिती फॉर्म मध्ये दिली आहे ती माहिती अचूक असल्याची खात्री करा.
- सर्व माहिती जर बरोबर असेल तर मग तुम्हाला AAI Bharti चा Submit करून टाकायचा आहे.
- त्यानंतर मग अर्जाची जी पावती येईल ती तुम्हाला सेव करून ठेवायची आहे, आणि त्याची प्रिंट देखील काढून घ्यायची आहे.
थोडक्यात वरील प्रमाणे तुम्ही भारतीय विमानतळ प्राधिकरण भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म हा भरू शकता.
इतर भरती
Agniveervayu Sports Quota Bharti 2025: भारतीय हवाई दल अग्निवीरवायु (Sports) भरती, 12वी पास लगेच अर्ज करा
Union Bank of India Bharti 2025: युनियन बँक ऑफ इंडिया मध्ये पदवीधरांना नोकरी! ₹93,960 पगार, लगेच अर्ज करा
Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा
Western Railway Sports Quota Bharti 2025: पश्चिम रेल्वेत 10वी, 12वी, ITI पास वर खेळाडूंची भरती! 50000 रु. महिना पगार, लगेच फॉर्म भरा
CCRAS Bharti 2025: केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेत 10वी पास वर भरती! 39,100 रु. महिना पगार, लगेच अर्ज करा
OICL Assistant Recruitment 2025: ओरिएंटल इंश्योरेंस कंपनी मध्ये भरती ! पदवीधर लगेच येथून अर्ज करा, पगार 20 हजार पासून सुरू!
IBPS Clerk Recruitment 2025: आयबीपीएस क्लर्क भरती, पदवी पास वर 10277 जागांची बंपर भरती, लगेच येथून फॉर्म भरा
Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा
AAI Bharti 2025 – 26 : FAQ
AAI Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?
ज्युनियर एक्झिक्युटिव हि पदे या भरती अंतर्गत भरली जाणार आहेत.
AAI Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
एकूण रिक्त जागा या 976 आहेत.
AAI Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 27 सप्टेंबर 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.
AAI Bharti मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि 5 टप्प्यात होणार आहे यात पात्रता तपासणी, शॉर्टलिस्टिंग, कागदपत्रे पडताळणी, मेरीट लिस्ट आणि अंतिम निवड असे टप्पे आहेत.