Territorial Army Rally Bharti 2025: भारतीय प्रादेशिक सेनेत 1426 जागांची मेगा भरती! 56,100 रु. पगार, 8वी/ 10वी/ 12वी पास अर्ज करा

Territorial Army Rally Bharti 2025: भारतीय प्रादेशिक सेनेत मोठी मेगा भरती जाहीर झाली आहे. देशसेवेत योगदान देण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे. या भरती अंतर्गत विविध पदांसाठी एकूण 1426 जागा जाहीर करण्यात आल्या आहेत. पात्र उमेदवारांना आकर्षक पगार आणि सरकारी सुविधांचा लाभ मिळणार आहे.

या भरतीत 8वी, 10वी आणि 12वी उत्तीर्ण उमेदवारांना अर्ज करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामुळे शिक्षण कमी असले तरी, देशसेवेत करिअर करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी ही भरती एक उत्तम संधी आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाईन तसेच प्रत्यक्ष भरती मेळाव्याद्वारे पार पडणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी दोन्ही पद्धतींनी सहभाग घेता येईल.

या भरतीसाठी वेगवेगळ्या ठिकाणी भर्ती मेळावे आयोजित करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, या भरतीसाठी अर्ज शुल्क (Exam Fee) पूर्णपणे मोफत ठेवण्यात आले आहे, त्यामुळे सर्व पात्र उमेदवार कोणत्याही अडचणीशिवाय अर्ज करू शकतात.

ज्यांना भारतीय प्रादेशिक सेनेत सामील होण्याची इच्छा आहे, त्यांनी ही संधी गमावू नये. या भरतीसंबंधीची संपूर्ण माहिती, पात्रता, वयोमर्यादा आणि अर्ज प्रक्रिया या लेखात दिली आहे. कृपया सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच अर्ज सादर करा.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Territorial Army Rally Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

भरती करणारी संस्थाभारतीय प्रादेशिक सेना
भरतीचे नावTerritorial Army Rally Bharti 2025
पदाचे नावविविध पद
रिक्त जागा1426
वेतन56,100 रु.
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रता8वी/ 10वी/ 12वी पास
वयोमर्यादा18 ते 42 वर्षे
अर्जाची फीफी नाही
अर्ज प्रक्रियाऑनलाईन/ भरती मेळावा

Territorial Army Rally Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1सोल्जर (जनरल ड्युटी)1372
2सोल्जर (लिपिक)07
3सोल्जर (शेफ कम्युनिटी)19
4सोल्जर (शेफ स्पेशल)03
5सोल्जर (मेस कुक)02
6सोल्जर (ER)03
7सोल्जर (स्टुअर्ड)03
8सोल्जर (आर्टिजन मेटलर्जी)02
9सोल्जर (आर्टिजन वुड वर्क)02
10सोल्जर (हेअर ड्रेसर)05
11सोल्जर (टेलर)01
12सोल्जर (हाऊस कीपर)03
13सोल्जर (वॉशरमन)04
*Total1426

Territorial Army Rally Bharti 2025: भरती मेळाव्याचा तपशील

तारीखठिकाणसहभागी जिल्हे
16 नोव्हेंबर 2025 1. शिवाजी स्टेडियम, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर (महाराष्ट्र).
2. राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम, बेळगावी (कर्नाटक)
3. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल मैदान, नाशिक (महाराष्ट्र).
कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग
17 नोव्हेंबर 2025 सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा & धुळे
18 नोव्हेंबर 2025 अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छ. संभाजी नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार & जळगाव
19 नोव्हेंबर 2025 चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, पुणे & रायगड
18 नोव्हेंबर 2025थापर स्टेडियम, AOC सेंटर, सिकंदराबाद (तेलंगणा).सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड बुलढाणा, धुळे, अहमदनगर, अकोला, अमरावती, छ संभाजी नगर, गडचिरोली, जालना, कोल्हापूर, धाराशिव, पालघर, रत्नागिरी, सांगली, नंदुरबार & जळगाव
19 नोव्हेंबर 2025चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, परभणी, सातारा, सिंधुदुर्ग, पुणे & रायगड

Territorial Army Rally Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

सोल्जर (जनरल ड्युटी)उमेदवार हा 45% गुणांसह 10वी उत्तीर्ण असावा.
सोल्जर (लिपिक)उमेदवार हा 60% गुणांसह 12वी उत्तीर्ण असावा.
सोल्जर (हाऊस कीपर)उमेदवार 10वी उत्तीर्ण असावा.
उर्वरित पदेउमेदवार 08वी उत्तीर्ण असावा.

Territorial Army Rally Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

1) शारीरिक पात्रता निकष (Physical Standards) –

उंची160 से.मी
छाती82 से.मी. (77 से.मी. unexpanded)
वजनउंची आणि वयाच्या प्रमाणात (As per Army Medical Standards)

2) Physical Fitness Test (PFT) –

1 Mile Run:

वयTimingsमार्क्स
18 ते 30 वर्षेUpto 5 Min 30 Sec60 marks
5 Min 31 Sec to 5 Min 45 Sec40 marks
5 Min 46 Sec and aboveFail
31 ते 42 वर्षेUpto 6 Min 15 Sec60 marks
6 Min 16 Sec to 6 Min 30 Sec40 marks
6 Min 31 Sec and aboveFail

Pull Ups:

18 ते 30 वर्षे31 ते 42 वर्षेमार्क्स
10 +9 +40
9833
8727
7621
6516
5 –4 –Fail

3) लेखी परीक्षा (Written Exam) –

Soldier Tradesmen (8वी / 10वी पास):

विषयप्रश्नमार्क्स
General Knowledge2040
General Science1530
Maths1530
Total50100

Soldier Clerks:

विभागविषयप्रश्नमार्क्स
Part-IGeneral Knowledge0510
General Science0510
Maths0510
Computer Science1020
Part-IIGeneral English2550
Total50100

Soldier General Duty (10वी पास):

विषयप्रश्नमार्क्स
General Knowledge2040
General Science1530
Maths1530
Total50100
Total50100
  • वरील तीन टप्पे जे उमेदवार पास होतील त्यांना नंतर कागदपत्र पडताळणी आणि मेडिकल तपासणी साठी बोलवले जाईल.
  • सोबतच Soldier Clerks आणि Tradesmen पदासाठी वेगळी ट्रेड टेस्ट हि घेतली जाईल.
  • सर्व टप्प्यात ज्यांना सगळ्यात जास्त मार्क्स मिळालेत त्यांची निवड हि अंतिम यादी द्वारे केली जाईल.

Territorial Army Rally Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

अर्जाची सुरुवात29 ऑक्टोबर 2025
अर्जाची शेवटची तारीख19 नोव्हेंबर 2025
भरती मेळाव्याचा कालावधी16,17,18 & 19 नोव्हेंबर 2025 

Territorial Army Rally Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
जाहिरात PDFजाहिरात पहा
ऑनलाईन अर्जApply Now
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Territorial Army Rally Bharti 2025: Step-by-Step Application Process

  • सर्वप्रथम उमेदवारांना वरील टेबलमधील अर्जाच्या लिंकवर क्लिक करायचं आहे.
  • भरतीची अधिकृत वेबसाईट उघडेल, तिथे प्रथम तुमची नोंदणी करून घ्या.
  • मग भरतीचा फॉर्म उघडा, अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती भरून घ्या.
  • आवश्यक ते कागदपत्रे अपलोड करा – पासपोर्ट फोटो, स्वाक्षरी इत्यादी.
  • मग डायरेक्ट एकदा अर्ज तपासा आणि सबमिट करून पावती सेव्ह करा.

या भरती साठी ऑनलाईन अर्जासोबत भरती मेळाव्याद्वारे पण फॉर्म स्वीकारले जाणार आहेत, त्यामुळे तुम्ही मेळाव्यातून पण फॉर्म भरू शकता.

इतर भरती

Maharashtra Police Bharti 2025: महाराष्ट्र राज्य पोलीस भरती अर्ज सुरु! 15,500+ जागांची मेगा भरती, लगेच इथून फॉर्म भरा

GMC Solapur Bharti 2025: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर येथे 10वी पास वर भरती! 47600 रु. पगार, लगेच इथून अर्ज करा

Indian Army TES Bharti 2025: भारतीय सैन्य दलात 12 वी पास वर भरती! टेक्निकल एंट्री स्कीम कोर्स 55 (जुलै 2026) इथून फॉर्म भरा

IB ACIO Gr-II/ Tech Recruitment 2025: गुप्तचर विभागात भरती! 1,42,400 रु. पगार, पदवीधर उमेदवार अर्ज करा

UCO Bank Apprentice Bharti 2025: युको बँकेत भरती! पदवी पास वर भरती, लगेच अर्ज करा

BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ ITI पास अर्ज करा

ISRO SDSC SHAR Bharti 2025: सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये भरती! 1,77,500 रु. पगार, 10वी/ ITI/ डिप्लोमा, पदवी पास अर्ज करा

Jalgaon DCC Bank Bharti 2025: जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत भरती! पदवी/ MSCIT पास अर्ज करा

NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स भरती! 12वी/ नर्सिंग पास अर्ज करा

ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा

BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा

Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा

SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा

Territorial Army Rally Bharti 2025 – 26: FAQ

Territorial Army Rally Bharti मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

विविध पदांची भरती केली जात आहे, तुम्ही वर आर्टिकल मध्ये पदांची नावे पाहू शकता.

Territorial Army Rally Recruitment साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

या भरती मध्ये एकूण रिक्त जागा या 1426 आहेत.

Territorial Army Rally Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

या भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 19 नोव्हेंबर 2025 आहे.

Territorial Army Rally Bharti 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि शारीरिक पात्रता, Physical Fitness Test, लेखी परीक्षा, कागदपत्रे पडताळणी, ट्रेड टेस्ट, मेडिकल तपासणी वर होणार आहे.

Territorial Army Rally Bharti मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?

Territorial Army Rally मधील पदांसाठी वेतन हे 56100 रुपये प्रती महिना असणार आहे.

Leave a comment