BRO Bharti 2025: सीमा रस्ते संघटनेत म्हणजेच Border Roads Organization (BRO) मध्ये नवीन भरती जाहीर झाली आहे. ही भरती त्यांच्या साठी आहे ज्यांना सरकारी नोकरीची चांगली संधी हवी आहे. संघटनेत विविध पदांसाठी भरती होत असून उमेदवारांना आकर्षक वेतन आणि शासकीय सुविधा मिळणार आहेत.
सीमा रस्ते संघटनेत काम करण्याची ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. देशाच्या सुरक्षेसाठी आणि रस्ते बांधणीसाठी महत्त्वाचं काम करणाऱ्या या विभागात नोकरी मिळणे ही अभिमानाची गोष्ट आहे. इच्छुक उमेदवारांनी भरतीची सर्व माहिती काळजीपूर्वक वाचूनच अर्ज करावा.
या भरतीसाठी 10वी पास आणि ITI उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे शिक्षण पात्रता कमी असली तरी सरकारी नोकरी मिळवण्याची ही उत्तम संधी आहे. ज्या उमेदवारांना या विभागात काम करण्याची इच्छा आहे त्यांनी ही संधी गमवू नये.
या पदांसाठी मिळणारा पगार ₹63,200 पर्यंत राहणार आहे. भरतीसंबंधीची पात्रता, वयोमर्यादा, अर्ज प्रक्रिया आणि इतर आवश्यक माहिती खाली दिलेली आहे, ती नीट वाचूनच आपला अर्ज सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
BRO Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
भरती करणारी संस्था | सीमा रस्ते संघटना |
भरतीचे नाव | BRO Bharti 2025 |
भरतीचे स्वरूप | कायमस्वरूपी |
पदाचे नाव | विविध पदे |
रिक्त जागा | 542 |
वेतन | 63,200 रु. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता | 10 वी + ITI पास |
वयोमर्यादा | 18 ते 25/ 27 वर्षे. |
अर्जाची फी | सामान्य प्रवर्ग: ₹50/- राखीव प्रवर्ग: फी नाही |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन/ ऑफलाईन |
BRO Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | व्हेईकल मेकॅनिक | 324 |
2 | MSW (पेंटर) | 13 |
3 | MSW (DES) | 205 |
Total | 542 |
BRO Bharti 2025: Exam Fees (परीक्षा फी)
General/OBC/EWS/ExSM प्रवर्ग | ₹50/- |
SC/ST प्रवर्ग | फी नाही |
BRO Bharti 2025: Age Limit (वयाची अट)
व्हेईकल मेकॅनिक | 18 ते 27 वर्षे |
MSW (पेंटर) | 18 ते 25 वर्षे |
MSW (DES) | 18 ते 25 वर्षे |
SC/ST प्रवर्ग | 05 वर्षे सूट |
OBC प्रवर्ग | 03 वर्षे सूट |
BRO Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
व्हेईकल मेकॅनिक | अर्जदार हा 10वी उत्तीर्ण असावा + मोटर व्हेईकल/डिझेल/हीट इंजिनमध्ये मेकॅनिकचे प्रमाणपत्र किंवा ITI (इंटरमल कम्बशन इंजिन/ट्रॅक्टर मेकॅनिक) हे त्याच्याकडे असावे. |
MSW (पेंटर) | अर्जदार हा 10वी उत्तीर्ण + ITI (पेंटर) उत्तीर्ण असावा. |
MSW (DES) | अर्जदार हा 10वी उत्तीर्ण + ITI (Motor/Vehicles/Tractors Mechanic) पास असावा. |
BRO Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
1) ऑनलाईन लेखी परीक्षा –
विषयाचे नाव (Subject) | प्रश्नसंख्या (No. of Questions) | गुण (Marks) | परीक्षा प्रकार (Type of Exam) |
---|---|---|---|
सामान्य ज्ञान (General Knowledge) | 25 | 25 | वस्तुनिष्ठ (Objective Type) |
सामान्य गणित (Mathematics) | 25 | 25 | वस्तुनिष्ठ (Objective Type) |
सामान्य इंग्रजी (General English) | 25 | 25 | वस्तुनिष्ठ (Objective Type) |
तांत्रिक विषय / ट्रेड संबंधित प्रश्न (Technical/Trade Related Questions) | 25 | 25 | वस्तुनिष्ठ (Objective Type) |
एकूण (Total) | 100 प्रश्न | 100 गुण | — |
2) Physical Efficiency Test –
विभाग | उंची (सेमी) | छाती (सेमी) | वजन (Kg) |
पश्चिम हिमालयी प्रदेश | 158 | 75 Cm + 5 Cm expansion | 47.5 |
पूर्वी हिमालयी प्रदेश | 152 | 75 Cm + 5 Cm expansion | 47.5 |
पश्चिम प्लेन क्षेत्र | 162.5 | 76 Cm + 5 Cm expansion | 50 |
पूर्व क्षेत्र | 157 | 75 Cm + 5 Cm expansion | 50 |
मध्य क्षेत्र | 157 | 75 Cm + 5 Cm expansion | 50 |
दक्षिणी क्षेत्र | 157 | 75 Cm + 5 Cm expansion | 50 |
गोरखास (भारतीय) | 152 | 75 Cm + 5 Cm expansion | 47.5 |
3) ट्रेड टेस्ट / स्किल टेस्ट –
जे उमेदवार ITI किंवा तांत्रिक पदांसाठी अर्ज करतात, त्यांना ट्रेड टेस्ट द्यावी लागते.
- या चाचणीत उमेदवारांची तांत्रिक कौशल्ये, व्यावहारिक ज्ञान आणि काम करण्याची क्षमता तपासली जाते.
- ही चाचणी संबंधित ट्रेडनुसार वेगळी असू शकते.
4) डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन –
वरील सर्व टप्पे पार केल्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी केली जाते.
- शिक्षण प्रमाणपत्र, जन्मतारीख पुरावा, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखला इत्यादी कागदपत्रे तपासली जातात.
5) वैद्यकीय तपासणी –
- शेवटच्या टप्प्यात उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते.
- उमेदवार शारीरिकदृष्ट्या फिट असल्यासच अंतिम निवड करण्यात येते.
थोडक्यात जे उमेदवार वरील सर्व टप्प्यात पास झाले आहेत त्यांची निवड हि बोर्डर रोड संघटनेत केली जाणार आहे. निवड प्रक्रियेतील कोणत्याही टप्प्यात जर उमेदवार अपात्र ठरले तर मात्र त्यांना नोकरी हि मिळणार नाही.
BRO Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
अर्जाची सुरुवात | 19 ऑक्टोबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख | 24 नोव्हेंबर 2025 |
BRO Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF & अर्ज | जाहिरात & अर्ज पहा |
ऑनलाईन अर्ज | इथून फी भरा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
अर्ज पाठविण्याचा पत्ता: Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015
BRO Bharti 2025: Step-by-Step Application Process
सीमा रस्ते संघटनेत भरती प्रक्रिया सुरु झाली आहे, उमेदवारांना ऑनलाईन आणि ऑफलाईन स्वरुपात फॉर्म भरायचा आहे. ऑफलाईन अधिकृत पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे आणी ऑनलाईन फी भरायची आहे. याची स्टेप बाय स्टेप माहिती खाली दिली आहे.
- प्रथम तुम्हाला वरील टेबल मधील जाहिरात आणि अर्ज च्या लिंक वर क्लिक करायचं आहे.
- जाहिरात उघडल्यावर ती पहिल्यांदा वाचून घ्यायची आहे.
- नंतर भरतीचा जो काही फॉर्म आहे तो डाउनलोड करायचा आहे.
- अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती बरोबर टाकायची आहे.
- नंतर जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते अर्जासोबत जोडायचे आहेत.
- मग वरील टेबल मधील फी भरा या लिंक वर क्लिक करून तुम्हाला लागू आहे त्याप्रकारे फी भरायची आहे.
- शेवटी अर्ज हा स्वतः किंवा पोस्टाने अधिकृत पत्त्यावर (Commandant BRO School & Centre, Dighi Camp, Pune-411015) पाठवून द्यायचा आहे.
इतर भरती
NMMC NUHM Bharti 2025: नवी मुंबई महानगरपालिका-NUHM अंतर्गत स्टाफ नर्स भरती! 12वी/ नर्सिंग पास अर्ज करा
ONGC Apprentice Bharti 2025: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात मेगा भरती! 10वी/ 12वी/ ITI/ डिप्लोमा/ पदवी पास अर्ज करा
BSF Sports Quota Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात भरती! 69,100 रु. पगार, 10वी पास अर्ज करा
Mumbai Port Bharti 2025: मुंबई पोर्ट मध्ये भरती! 10वी/ ITI/ पदवी पास अर्ज करा
SEBI Bharti 2025: सिक्युरिटीज् & एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया मध्ये भरती! 1,84,000 रु. पगार, पदवी पास अर्ज करा
IPPB Bharti 2025: इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत भरती! 30,000 रु. पगार, परीक्षा नाही, लगेच इथून अर्ज करा
Railway RRC NWR Bharti 2025: भारतीय रेल्वे मध्ये 2162 जागांची मेगा भरती! 10वी/ ITI पास अर्ज करा
RRB JE Bharti 2025: भारतीय रेल्वेत 2570 जागांची मेगा भरती! B.Sc आणि डिप्लोमा पासवर, 35,400 रु. पगार, लगेच अर्ज करा
Indian Army DG EME Group C Bharti 2025: भारतीय सैन्यात 10वी/ 12वी/ ITI/ पदवी पास वर भरती! 20,200 रु. पगार, लगेच अर्ज करा
Bhumi Abhilekh Bharti 2025: महाराष्ट्र शासनाच्या भूमि अभिलेख विभागात भरती! 63,200 रु. पगार, 10वी/ITI/ सिविल डिप्लोमा पास अर्ज करा
Delhi Police HCM Recruitment 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल (Ministerial) भरती! 81,100 रु. पगार, 12वी पास लगेच अर्ज करा
RRB NTPC Recruitment 2025: रेल्वेमध्ये 8,850 जागांची मेगा भरती! 35,400 रु. पगार, 12वी/ पदवी पास अर्ज करा
BRO Bharti 2025 – 26: FAQ
BRO Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
विविध पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे, पदाची नावे तुम्ही वर आर्टिकल मध्ये पाहू शकता.
BRO Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा 542 आहेत.
BRO Recruitment साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात अर्ज हा दिनांक 24 नोव्हेंबर 2025 पर्यंत करायचा आहे.
BRO Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि ऑनलाईन परीक्षा, शारीरिक चाचणी, ट्रेड स्कील टेस्ट, कागदपत्रे तपासणी, मेडिकल तपासणी च्या आधारावर होणार आहे.
BRO Bharti 2025 मधील पदासाठी वेतन पगार किती आहे?
सीमा रस्ते संघटनेत निघालेल्या या भरती मधील पदासाठी वेतन हे 63200 रुपये पर्यंत आहे.