RRB NTPC Recruitment 2025: भारतीय रेल्वेत काम करण्याचे स्वप्न अनेक उमेदवारांचे असते. त्यासाठी रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) कडून नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी (NTPC) भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीमुळे हजारो तरुणांना सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे.
या RRB NTPC भरती 2025 अंतर्गत तब्बल 8,850 रिक्त जागा उपलब्ध झाल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या भरतीसाठी 12वी पास (अंडरग्रॅज्युएट) तसेच पदवीधर (ग्रॅज्युएट) उमेदवार अर्ज करू शकतात. त्यामुळे ही सुवर्णसंधी गमावू नका.
या नोकरीत उमेदवारांना पदानुसार 35,400 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला रेल्वेत सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल तर ऑनलाईन स्वरुपात अर्ज सादर करा.
याबद्दलची पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज प्रक्रिया आणि सविस्तर माहिती खालील पोस्टमध्ये दिलेली आहे. त्यामुळे पोस्ट पूर्ण वाचा भरतीची जाहिरात वाचा आणि मगच अर्ज करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
RRB NTPC Recruitment 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
भरती करणारी संस्था | रेल्वे रिक्रूटमेंट बोर्ड (RRB) |
भरतीचे नाव | RRB NTPC Recruitment 2025 |
पदाचे नाव | विविध पदे |
रिक्त जागा | 8,850 |
वेतन | 35,400 रु. |
नोकरी ठिकाण | संपूर्ण भारत |
शैक्षणिक पात्रता | 12वी/ पदवी पास |
वयोमर्यादा | 18 ते 33/36 वर्षे |
अर्जाची फी | खुला प्रवर्ग: ₹500/- राखीव प्रवर्ग: ₹250/- |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
RRB NTPC Recruitment 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पदाचे नाव | रिक्त जागा |
Graduate Level | |
Station Master | 615 |
Goods Train Manager | 3,423 |
Traffic Assistant (Metro Railway) | 59 |
Chief Commercial cum Ticket Supervisor (CCTS) | 161 |
Junior Account Assistant cum Typist (JAA) | 921 |
Senior Clerk cum Typist | 638 |
Total | 5,817* |
Undergraduate Level | |
Junior Clerk cum Typist | 163 |
Accounts Clerk cum Typist | 394 |
Trains Clerk | 77 |
Commercial cum Ticket Clerk | 2,424 |
Total | 3,058* |
Grand Total | 8,850 |
RRB NTPC Recruitment 2025: Exam Fees (परीक्षा फी)
Graduate Level | ₹500/- |
Undergraduate Level | ₹250/- |
RRB NTPC Recruitment 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण
या भरती साठी Inter आणि Graduate Level मध्ये भरती होणार आहे, यात अनुक्रमे 12वी पास आणि पदवी पास असणे आवश्यक आहे.
Graduate Level Posts | पदवीधर |
Undergraduate Level Posts | 12वी पास |
RRB NTPC Recruitment 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
या भरतीत उमेदवारांची निवड खालील टप्प्यांनुसार केली जाईल –
- कंप्यूटर बेस्ड टेस्ट (CBT) – पहिला टप्पा
- कंप्यूटर बेस्ड टेस्ट (CBT) – दुसरा टप्पा
- स्किल टेस्ट / टायपिंग टेस्ट / कॉम्प्युटर बेस्ड अप्टीट्यूड टेस्ट (पदांनुसार)
- डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन
- मेडिकल टेस्ट
CBT – Tier I
विषय (Subject) | प्रश्नांची संख्या | गुण (Marks) | वेळ (Time) |
---|---|---|---|
गणित (Mathematics) | 30 | 30 | * |
सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती (General Intelligence & Reasoning) | 30 | 30 | * |
सामान्य जागरूकता (General Awareness) | 40 | 40 | * |
एकूण (Total) | 100 | 100 | 90 मिनिटे |
CBT – Tier II
विषय (Subject) | प्रश्नांची संख्या | गुण (Marks) | वेळ (Time) |
---|---|---|---|
गणित (Mathematics) | 35 | 35 | * |
सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशक्ती (General Intelligence & Reasoning) | 35 | 35 | * |
सामान्य जागरूकता (General Awareness) | 50 | 50 | * |
एकूण (Total) | 120 | 120 | 90 मिनिटे |
स्किल टेस्ट / टायपिंग टेस्ट / कॉम्प्युटर बेस्ड अप्टीट्यूड टेस्ट
- काही पदांसाठी टायपिंग टेस्ट आवश्यक आहे.
- काही तांत्रिक पदांसाठी अप्टीट्यूड टेस्ट घेतली जाईल.
- जे उमेदवार या टप्प्यात पास होतील केवळ तेच पुढील टप्प्यासाठी पात्र असणार आहेत.
डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल टेस्ट
- अंतिम निवड यादीसाठी उमेदवारांचे मूळ कागदपत्र तपासले जातील.
- मेडिकल तपासणी अनिवार्य असेल.
- जर कागदपत्रे योग्य नसतील तर मात्र उमेदवार अपात्र ठरवले जातील, त्यामुळे कागदपत्रे पडताळणी च्या आगोदर सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा.
थोडक्यात वरील प्रमाणे तुमची निवड हि रेल्वे च्या या भरती मध्ये मेरीट नुसार ज्यांना जास्त मार्क्स पडतील त्या आधारावर केली जाईल.
RRB NTPC Recruitment 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
अर्जाची सुरुवात (Graduate Level) | 21 ऑक्टोबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख (Graduate Level) | 20 नोव्हेंबर 2025 |
अर्जाची सुरुवात (Undergraduate Level) | 28 ऑक्टोबर 2025 |
अर्जाची शेवटची तारीख (Undergraduate Level) | 27 नोव्हेंबर 2025 |
RRB NTPC Recruitment 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
जाहिरात PDF | जाहिरात वाचा |
ऑनलाईन अर्ज | Apply Online |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
RRB NTPC Recruitment 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम वरील टेबलमधील Apply Online या लिंकवर क्लिक करून RRB च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
- वेबसाईटवर जर तुम्ही नवीन उमेदवार असाल तर आधी नोंदणी (Registration) करावी लागेल. आधीच नोंदणी असेल तर थेट Login करून पुढे जा.
- लॉगिन केल्यावर तुम्हाला NTPC Recruitment 2025 साठी अर्ज करा (Apply Now) असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- आता ऑनलाईन अर्ज फॉर्म तुमच्यासमोर उघडेल. त्या फॉर्ममध्ये नाव, शैक्षणिक माहिती, पत्ता, जन्मतारीख, श्रेणी (Category) इत्यादी तपशील काळजीपूर्वक भरावेत.
- पदानुसार परीक्षा फी ऑनलाईन पेमेंट मोड ने भरून घ्या.
- त्यानंतर तुमचा पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी दिलेल्या साईज व फॉरमॅट मध्ये अपलोड करा.
- पूर्ण फॉर्म भरून झाल्यावर तो एकदा नीट तपासा. चुकीची माहिती असल्यास दुरुस्ती करा.
- शेवटी फॉर्म सबमिट करा आणि त्याचा प्रिंट आउट काढून ठेवा.
इतर भरती
SSC Delhi Police Head Constable Bharti 2025: दिल्ली पोलीस दलात हेड कॉन्स्टेबल पदाची भरती! 81,100 रु. पगार, 12वी/ ITI पास अर्ज करा
SSC Delhi Police Driver Bharti 2025: SSC मार्फत दिल्ली पोलीस दलात ड्रायव्हर पदाची भरती! 69,100 रु. पगार, 12 वी पास अर्ज करा
BEL Bharti 2025: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड मध्ये पदवी पास वर भरती! 40,000 रु. पगार, लगेच अर्ज करा
Canara Bank Apprentice Bharti 2025: पदवी पास तरुणांसाठी कॅनरा बँक मध्ये 3500 जागांसाठी भरती, ₹15,000 पगार! लगेच अर्ज करा!
SSC Delhi Police Constable Bharti 2025: 12वी पासवर SSC कडून दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल 7565 जागांची मेगाभरती ! ₹69,100 पर्यंत पगार! इथून लगेच अर्ज करा!
RRB Junior Engineer Bharti 2025: रेल्वे मध्ये 2,570 जागांसाठी मेगा भरती! 35,400 रु. पगार, पदवीधर लगेच अर्ज करा
MSRTC Bharti 2025, महाराष्ट्र ST महामंडळमधे 17450 जागांसाठी मेगाभरती, चालक ,वाहक,Clerk, Assistant इत्यादी पदे भरणार, इथे बघा पूर्ण माहिती!
EMRS Bharti 2025: एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये 10वी/12वी/पदवी पास वर भरती! 2,09,200 रु. पगार, इथून लगेच अर्ज करा
YDCC Bank Bharti 2025: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत 10वी/ पदवी पास वर भरती! लगेच अर्ज करा
Thane Van Vibhag Bharti 2025: ठाणे वन विभाग भरती! 60 हजार रुपये पगार, 10वी पास अर्ज करा
North Central Railway Bharti 2025: उत्तर मध्य रेल्वेत 10वी/ ITI पास वर भरती! इथून अर्ज करा
RRB NTPC Recruitment 2025 – 26: FAQ
RRB NTPC Recruitment 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?
विविध पदासाठी हि भरती प्रक्रिया राबवली जात आहे, पदांची नावे तुम्ही वर पोस्ट मध्ये पाहू शकता.
RRB NTPC Recruitment 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरती साठी एकूण रिक्त जागा 8850 आहेत.
RRB NTPC Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरण्याची लास्ट डेट हि Inter आणि Graduate Level नुसार भिन्न आहे, ती तुम्ही वर पोस्ट मध्ये पाहू शकता.
RRB NTPC Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?
निवड प्रक्रिया हि पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा, स्कील टेस्ट आणि कागदपत्रे पडताळणी/ मेडिकल टेस्ट यावर आधारित आहे.
RRB NTPC Recruitment साठी वेतन पगार किती आहे?
रेल्वे भरती साठी वेतन हे 19,900 ते 35,400 रु. एवढे आहे.
Krushna Gupta