IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात B.Sc, BCA, इंजिनिअरिंग डिप्लोमा, पदवी पास वर भरती! 81,100 रु. पगार, लगेच अर्ज करा

IB Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau – IB) कडून 2025 सालासाठी नवीन भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीत इंजिनिअरिंग डिप्लोमा तसेच पदवीधर उमेदवारांना संधी मिळणार आहे. सरकारी नोकरीची संधी शोधत असलेल्या तरुणांसाठी ही सुवर्णसंधी आहे.

या भरती साठी ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरायचे आहेत, अर्ज करण्याची प्रोसेस हि सुरु झाली आहे. IB च्या अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करावे लागणार आहेत.

ऑफिसर पदासाठी हि भरती होणार आहे, सोबतच वेतन हे 81,100 रु. इतके मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला सरकारी नोकरी करायची असेल आणि जर तुमचा इंटरेस्ट केंद्रीय गुप्तचर विभागात असेल तर हि संधी तुमच्या साठी खास असणार आहे.

भरती संदर्भात सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे, त्यामुळे सर्व प्रथम हे आर्टिकल शेवट पर्यंत वाचून घ्या सोबतच या भरतीची अधिकृत जाहिरात पूर्ण वाचा आणि दिलेल्या सूचनांचे पालन करून त्या प्रकारे योग्य रित्या फॉर्म भरून घ्या.

 आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

IB Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थाकेंद्रीय गुप्तचर विभाग (Intelligence Bureau – IB)
भरतीचे नावIB Bharti 2025
पदाचे नावज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/Tech (JIO-II/Tech)
रिक्त जागा394
वेतन₹81,100/- रुपये
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारत
शैक्षणिक पात्रताइंजिनिअरिंग डिप्लोमा / पदवी पास
वयोमर्यादा१८ ते 27 वर्षे
अर्जाची फीGeneral/OBC/EWS: ₹650/
SC/ST/ExSM/महिला: ₹550/-
अर्ज प्रक्रियाऑनलाईन

IB Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/Tech (JIO-II/Tech)394
Total394

IB Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पद क्र.पदाचे नावशिक्षण
1ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/Tech (JIO-II/Tech)अर्जदार उमेदवाराने इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics /Electronics & Tele-communication/ Electronics & Communication/Electrical & Electronics/Information Technology / Computer Science/ Computer Engineering / Computer Applications) चे शिक्षण पूर्ण केलेले असावे, सोबतच त्याने B.Sc (Electronics / Computer Science or Physics/Mathematics) किंवा BCA केलेलं असावे.

IB Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलविवरण
वयाची अट18 ते 38 वर्षे
SC/ST05 वर्षे सूट
OBC03 वर्षे सूट

IB Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरती 2025 साठी निवड प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये (Tier-I, Tier-II आणि Tier-III) पार पडणार आहे. अर्जदार उमेदवाराला खालील सर्व टप्प्यात पास होणे अनिवार्य असणार आहे.

Tier-I (ऑनलाईन परीक्षा)

  • ही परीक्षा ऑनलाईन Objective Type MCQs स्वरूपात असणार आहे.
  • सर्व उमेदवारांना हि परीक्षा देणे बंधनकारक आहे.
  • या परीक्षेसाठी ¼ प्रमाणात निगेटिव्ह मार्किंग असणार आहे.
विषयप्रश्नमार्क्सवेळ
General Mental Ability2525
शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित विषय7575
एकूण1001002 तास (120 मिनिटे)

Tier-II (Skill Test)

  • ही परीक्षा प्रॅक्टिकल व टेक्निकल स्वरूपाची असणार आहे.
  • या स्कील टेस्ट मध्ये उमेदवारांची कौशल्य चाचणी हि घेण्यात येणार आहे.
तपशीलमार्क्स
कौशल्य चाचणी (Skill Test)30

Tier-III (Interview/Personality Test)

  • वरील दोन्ही टप्यात जे उमेदवार पास झाले आहेत त्यांना ib द्वारे मुलाखती साठी बोलवले जाईल.
  • मुलाखती मध्ये उमेदवाराची पात्रता हि तपासली जाईल.
  • जर उमेदवार ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर पदासाठी योग्य असतील तर त्यांना निवडले जाईल.

IB Bharti Syllabus:

विषय (टप्पा)अभ्यासक्रम / विषय
General Mental Ability (25%)– Logical Reasoning (तर्कशक्ती)
– Analytical Ability (विश्लेषण क्षमता)
– Numerical Aptitude (संख्यात्मक क्षमता)
– General Awareness (सामान्य ज्ञान)
– Current Affairs (चालू घडामोडी)
शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित विषय (75%)(Electronics, Computer Science, Communication & IT)Computer Science & IT:
– Computer Organization & Architecture
– Operating Systems
– DBMS (Database Management System)
– Data Structures & Algorithms
– Computer Networks
– Software Engineering
– Cyber Security, Cryptography & Network Security
– Programming Languages (C, C++, Java, Python – basics)

Electronics & Communication:
– Basic Electronics & Digital Electronics
– Microprocessors & Microcontrollers
– Signals & Systems
– Communication Systems (Analog & Digital)
– Networking & Internet Concepts
– Wireless & Mobile Communication Basics
– Instrumentation & Control Systems
Skill Test (Tier-II)– Practical / Hands-on Test
– Networking & Hardware Troubleshooting
– Programming / Technical Problem Solving

IB Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलतारीख
अर्जाची सुरुवात22 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख14 सप्टेंबर 2025

IB Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFजाहिरात वाचा
ऑनलाईन अर्जApply Online
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

IB Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

1) अधिकृत वेबसाईट वर जा

सर्वप्रथम वर दिलेल्या Apply Link वर क्लिक करून केंद्रीय गुप्तचर विभाग (IB) भरतीच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

2) नोंदणी (Registration) करा

नवीन उमेदवारांनी सर्वप्रथम पोर्टलवर आपली नोंदणी करणे आवश्यक आहे, त्यासाठी आवश्यक ती माहिती टाकून नोंदणी करून घ्या.

3) ऑनलाईन अर्ज भरा

नोंदणी झाल्यानंतर आयडी पासवर्ड वापरून लॉगिन करून ऑनलाईन अर्जाचा फॉर्म ओपन करा. फॉर्ममध्ये विचारलेली वैयक्तिक माहिती, शैक्षणिक तपशील इत्यादी सर्व माहिती नीट भरून घ्या.

४) कागदपत्रे अपलोड करा

फॉर्म मध्ये तुम्हाला तुमची पासपोर्ट फोटो आणि सही स्वाक्षरी अपलोड करावी लागेल, जाहिराती मध्ये सांगितल्याप्रमाणे योग्य साईज मध्ये ते अपलोड करा.

5) परीक्षा फी भरा

त्यानंतर ऑनलाईन परीक्षेची फीस हि भरून घ्या, फी भरण्यासाठी तुम्ही युपीआय, डेबिट कार्ड, नेट बँकिंग चा वापर करून पेमेंट करू शकता.

6) फॉर्म सबमिट करा

IB भरतीचा फॉर्म भरून झाला की नंतर तुम्हाला तो फॉर्म एकदा रिचेक करायचा आहे. कोणती माहिती चुकली असेल तर ती दुरुस्त करून घ्यायची आहे आणि मग शेवटी भरतीचा फॉर्म सबमिट करून टाकायचा आहे.

थोडक्यात, या पद्धतीने तुम्ही IB Bharti 2025 साठी ऑनलाईन स्वरूपात सहजपणे फॉर्म भरू शकता.

इतर भरती

IOCL Apprentice Bharti 2025: इंडियन ऑइल मध्ये 10वी, ITI, डिप्लोमा पास वर भरती! इथून लगेच फॉर्म भरा

Punjab And Sind Bank Bharti 2025: पंजाब & सिंध बँकेत पदवी पास वर भरती! 85,920 रु. पगार लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!

IB Bharti 2025 – 26: FAQ

IB Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

ज्युनियर इंटेलिजेंस ऑफिसर ग्रेड-II/Tech (JIO-II/Tech) या पदासाठी भरती केली जात आहे.

IB Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 3९४ आहेत, ज्या या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.

IB Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 सप्टेंबर 2025 आहे.

IB Recruitment 2025 ची निवड प्रक्रिया कशी आहे?

या भरती साठी अर्जदार उमेदवारांची निवड हि ऑनलाईन परीक्षा, स्कील टेस्ट आणि मुलाखतीच्या आधारे केली जाणार आहे.

Leave a comment