Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा

Indian Navy SSC Officer Bharti 2025: Indian Navy मार्फत SSC (Short Service Commission) Officer पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. ही भरती विविध ब्रँचसाठी असून, यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

या भरतीत निवड झालेल्या उमेदवारांना चांगला पगार, भत्ते आणि प्रशिक्षणाद्वारे नौदलात अधिकारी म्हणून सेवा देण्याची संधी मिळणार आहे. सुरुवातीला ही सेवा काही वर्षांसाठी असते, परंतु जर काम चांगल केल Overall Performance चांगला असेल तर पुढे तुम्हाला नोकरीचा कालवधी वाढवून देखील दिला जाऊ शकतो.

या भरतीची अर्ज प्रक्रिया हि पूर्णपणे ऑनलाइन असून, पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करणे आवश्यक आहे. कोणत्या ब्रँचसाठी किती जागा आहेत, शैक्षणिक पात्रता काय आहे, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया आणि अशीच महत्वाची माहिती या आर्टिकल मध्ये देण्यात आली आहे.

जर तुम्हाला Indian Navy मध्ये अधिकारी बनायचं असेल, तर ही भरती तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. संपूर्ण माहिती आणि अर्ज कसा करायचा हे जाणून घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचा! आणि त्यानंतर लगेच ऑनलाईन स्वरुपात फॉर्म भरून टाका.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Indian Navy SSC Officer Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

विवरणमाहिती (Details)
भरतीचे नावIndian Navy SSC Officer Bharti 2025
भरती करणारी संस्थाभारतीय नौदल (Indian Navy)
एकूण पदसंख्या260 पदे (ब्रांच /कॅडर नुसार)
शैक्षणिक पात्रताBE/B.Tech, B.Sc, B.Com, M.Sc, MCA, LLB इ. (ब्रँचनुसार अट वेगळी)
अर्ज प्रक्रियाऑनलाईन (Online)
अर्ज फीफी नाही
वेतन श्रेणी₹56,100/- ते ₹1,10,000/-
वयोमर्यादा18 ते 24 वर्षे (ब्रँचनुसार वेगळी)
नोकरी ठिकाणसंपूर्ण भारतातील Indian Navy च्या युनिट्स
अधिकृत वेबसाइटhttps://www.joinindiannavy.gov.in

Indian Navy SSC Officer Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावपद संख्या
SSC ऑफिसर260
अ. क्र.ब्रांच /कॅडरपद संख्या
एक्झिक्युटिव ब्रांच
1SSC जनरल सर्व्हिस (GS / X)/Hydro Cadre}57
2SSC पायलट24
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर20
4SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)20
5SSC लॉजिस्टिक्स10
6नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन कॅडर (NAIC)20
7लॉ02
एज्युकेशन ब्रांच
8SSC एज्युकेशन15
टेक्निकल ब्रांच
9SSC इंजिनिरिंग ब्रांच (GS)36
10SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)40
11नेव्हल कन्स्ट्रक्टर16
Total260

Indian Navy SSC Officer Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

ब्रांचशिक्षण
एक्झिक्युटिव ब्रांच60% गुणांसह BE/ B.Tech किंवा B.Sc/ B.Com/ B.Sc (IT) + PG डिप्लोमा (Finance / Logistics / Supply Chain Management / Material Management) किंवा प्रथम श्रेणी MCA / M.Sc (IT)/ LLB
एज्युकेशन ब्रांचप्रथम श्रेणी M.Sc. (Maths/Operational Research/Physics/Applied Physics/ Chemistry) किंवा 55% गुणांसह MA (इतिहास) किंवा 60% गुणांसह BE/B.Tech
टेक्निकल ब्रांच60% गुणांसह BE/B.Tech

Indian Navy SSC Officer Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

अ. क्र.पदाचे नाववयोमर्यादा (Age Limit)
1SSC जनरल सर्व्हिस (GS/X) / Hydro18 ते 24 वर्षे
2SSC पायलट17 ते 22 वर्षे
3नेव्हल एयर ऑपरेशन्स ऑफिसर17 ते 22 वर्षे
4SSC एयर ट्रॅफिक कंट्रोलर (ATC)18 ते 24 वर्षे
5SSC लॉजिस्टिक्स18 ते 24 वर्षे
6नेव्हल आर्मामेंट इन्स्पेक्शन कॅडर (NAIC)18 ते 24 वर्षे
7लॉ20 ते 25 वर्षे
8SSC एज्युकेशन18 ते 24 वर्षे / 20 ते 26 वर्षे
9SSC इंजिनिअरिंग ब्रांच (GS)18 ते 24 वर्षे
10SSC इलेक्ट्रिकल ब्रांच (GS)18 ते 24 वर्षे
11नेव्हल कन्स्ट्रक्टर18 ते 24 वर्षे

Indian Navy SSC Officer Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

Step 1: अर्जांची शॉर्टलिस्टिंग (Shortlisting)

  • उमेदवारांच्या शिक्षणानुसार त्यांचे मार्क तपासले जातील, त्यावरून अर्ज निवडले जातील.
  • BE/B.Tech च्या विद्यार्थ्यांसाठी पहिल्या 5 सेमिस्टरचे गुण विचारात घेतले जातील.
  • MSc, MCA, MBA, M.Tech साठी पूर्ण गुणपत्रक (जोपर्यंत पूर्ण झालं असेल) किंवा Pre-Final Year चे गुण (जर शेवटच्या वर्षात असेल) विचारात घेतले जातील..

Step 2: SSB मुलाखत (SSB Interview)

  • शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना SSB Interview साठी SMS/E-mail द्वारे बोलावले जाईल.
  • मुलाखती मध्ये उमेदवाराची पात्रता हि तपासली जाईल.

Step 3: वैद्यकीय तपासणी (Medical Test)

  • SSB मुलाखत पास झाल्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी होईल.
  • जे उमेदवार फिट ठरतील त्यांचीच अंतिम निवड केली जाईल.

Step 4: मेरिट लिस्ट

  • मेरीट लिस्ट साठी केवळ SSB मुलाखतीत मिळालेले मार्क गृहीत धरले जातील.
  • SSB Interview वरूनच अर्जदार उमेदवारांची अंतिम निवड हि केली जाईल.

Step 5: प्रशिक्षण (Training)

  • निवड झालेल्या उमेदवारांना Sub-Lieutenant या पदावर भारतीय नौदल अकॅडमीत प्रशिक्षणासाठी बोलावलं जाईल.
  • प्रशिक्षण काळात लग्न केलेले उमेदवार बाद केले जातील.
  • प्रशिक्षण सोडल्यास किंवा राजीनामा दिल्यास सरकारने खर्च केलेली रक्कम परत करावी लागेल.

Probation Period (परीविक्षण कालावधी):

SSC (NAIC) साठी 3 वर्षे आणि इतर शाखांसाठी 2 वर्षांचा Probation Period असणार आहे.

Indian Navy SSC Officer Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलDate
अर्जाची सुरुवात09 ऑगस्ट 2025
अर्जाची शेवटची तारीख09 सप्टेंबर 2025

Indian Navy SSC Officer Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFNotification वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Indian Navy SSC Officer Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या

  • अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जा:
  • 👉 www.joinindiannavy.gov.in

Step 2: नाव नोंदणी (New Registration) करा

  • जर तुम्ही या पोर्टलवर नवीन असाल तर “Register” या पर्यायावर क्लिक करा.
  • आवश्यक अशी सर्व माहिती टाकून तुमची नोंदणी करून घ्या.

Step 3: Login करा आणि Dashboard उघडा

  • तयार User ID व Password चा वापर करून वेबसाईट वर लॉगिन करा.
  • त्यानंतर वेबसाईट वर Apply Online अशी लिंक दिसेल त्यावर क्लिक करा.

Step 4: Application Form भरा

  • अर्जामध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  • सविस्तर रित्या माहिती भरून झाली कि मग पुढे माहिती बरोबर आहे का ते चेक करा.

Step 5: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा

  • पासपोर्ट साईझ फोटो (JPEG/JPG फॉरमॅट)
  • सही (Signature)
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे (Degree Certificates, मार्कशीट्स)
  • इतर लागणारी कागदपत्रे अर्जासोबत अपलोड करा.

Step 6: Final Preview आणि सबमिट

  • संपूर्ण फॉर्म नीट भरल्यानंतर एकदा “Preview” मध्ये माहिती तपासून घ्या.
  • सर्व माहिती बरोबर असल्यास “Submit” बटणावर क्लिक करून अर्ज सबमिट करून टाका.

Step 7: अर्जाची प्रिंट घेणे

  • फॉर्म भरून झाला कि मग एक पावती येईल ती पावती तुम्हाला सेव करून ठेवायची आहे.
  • सोबत फॉर्म ची आणि पावतीची प्रिंट काढून घ्यायची आहे, हि प्रिंट पुढे तुम्हाला भरती दरम्यान लागणार आहे.
इतर भरती

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!

NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !

Indian Coast Guard AC 01/2027: 12वी + पदवी पास तरुणांसाठी तटरक्षक दलात भरती! पगार 56,000 पासून! लगेच अर्ज करा!

Indian Navy SSC Officer Bharti 2025 – 26 : FAQ

Indian Navy SSC Officer Bharti 2025 मध्ये पदे भरली जात आहेत?

SSC ऑफिसर पद या भरती अंतर्गत भरले जाणार आहेत.

Indian Navy SSC Officer Bharti 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 260 आहेत.

Indian Navy SSC Officer Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 1 सप्टेंबर 2025 आहे, या तारखे नंतर फॉर्म स्वीकारले जाणार नाहीत.

Indian Navy SSC Officer Bharti मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड प्रक्रिया हि 3 टप्प्यात होणार आहे यात शॉर्टलिस्टिंग, मुलाखत, वैद्यकीय तपासणी आणि अंतिम निवड असे टप्पे आहेत.

7 thoughts on “Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात BE/B.Tech/पदवी वर SSC ऑफिसर पदाची भरती! 1,10,000 रु. पगार, अर्ज करा”

Leave a comment