Eastern Railway Bharti 2025: पूर्व रेल्वेत 10वी / ITI पास वर 3115 जागांसाठी मेगा भरती, लगेच अर्ज करा

Eastern Railway Bharti 2025: रेल्वेत नोकरी मिळवण्याचं स्वप्न बाळगणाऱ्या तरुणांसाठी एक चांगली संधी चालून आली आहे. पूर्व रेल्वे विभागाने 2025 साठी Apprentice पदांसाठी मोठी भरती जाहीर केली आहे. विशेष म्हणजे ही भरती १०वी पास आणि ITI धारक उमेदवारांसाठी आहे. जर तुम्ही नुकताच शिक्षण पूर्ण केले असेल आणि रेल्वे सारख्या मोठ्या संस्थेत काम करण्याचा अनुभव घ्यायचा असेल, तर ही भरती तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

या भरती अंतर्गत एकूण 3115 जागांवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वेच्या विविध वर्कशॉप्स व युनिट्समध्ये Apprentice म्हणून प्रशिक्षण मिळेल. हे प्रशिक्षण ठराविक कालावधीसाठी असते आणि यामध्ये उमेदवारांना कौशल्यविकासासाठी योग्य मार्गदर्शन व अनुभव दिला जातो.

मात्र लक्षात ठेवा, ही भरती कायमस्वरूपी नोकरीसाठी नाही. Apprentice पद हे केवळ प्रशिक्षणासाठी असते, आणि प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर रेल्वेमध्ये थेट नोकरी मिळेलच, याची हमी नसते. तरीही ही संधी तुमच्या करिअरची चांगली सुरुवात ठरू शकते आणि पुढील रेल्वे किंवा अन्य सरकारी भरतींसाठी अनुभव फायदेशीर ठरतो.

जर तुम्ही 10वी किंवा ITI पास असाल, आणि रेल्वेत प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यायची इच्छा असेल, तर ही भरती नक्कीच तुमच्यासाठी आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया ऑनलाईन असून, शेवटच्या तारखेपूर्वी अर्ज करणे गरजेचे आहे. अर्ज प्रक्रिया, पात्रता आणि इतर तपशील खाली आर्टिकल मध्ये दिले आहेत, त्यामुळे हि पोस्ट काळजीपूर्वक वाचा आणि फॉर्म भरून घ्या!

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Eastern Railway Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती

माहितीचा तपशीलविवरण / माहिती
भरती करणारी संस्थाEastern Railway (पूर्व रेल्वे)
भरतीचे नावEastern Railway Apprentice Bharti 2025
पदाचे नावApprentice (प्रशिक्षणार्थी)
एकूण रिक्त जागा3115
वेतन / स्टायपेंडApprentice नियमानुसार स्टायपेंड – सुमारे ₹7,000 ते ₹10,000 (ट्रेडनुसार वेगळा)
नोकरीचे ठिकाणपूर्व रेल्वे अंतर्गत विविध वर्कशॉप्स व युनिट्स
शैक्षणिक पात्रता10वी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह) + संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण
वयोमर्यादा15 ते 24 वर्षे (SC/ST/OBC सवलत)
अर्ज प्रक्रियाऑनलाईन – www.er.indianrailways.gov.in या वेबसाईटवरून.
अर्जाची फीसामान्य/OBC – ₹100, SC/ST/PwBD/Women – फी नाही

Eastern Railway Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा

पदाचे नावरिक्त जागा
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)3115

Eastern Railway Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि आवश्यक शिक्षण

पदाचे नावपात्रता निकष
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)अर्जदार उमेदवाराने किमान 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण केलेली असावी, सोबतच संबंधित ट्रेड मध्ये ITI (Fitter/Welder/ Mechanic (MV) / Mechanic (Diesel) /Carpenter/ Painter/Lineman/Wireman/Ref.& AC Mechanic/ Electrician/MMTM)

Eastern Railway Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती

तपशीलविवरण
वयाची अटवयोमर्यादा हि 15 ते 24 वर्षे आहे.
SC/ ST प्रवर्ग15 ते 29 वर्षे (5 वर्षे सूट)
OBC प्रवर्ग15 ते 27 वर्षे (3 वर्षे सूट)

Eastern Railway Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत

या भरतीसाठी कोणतीही लेखी परीक्षा होणार नाही. उमेदवारांची निवड ही फक्त 10वी आणि ITI मध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारे होणार आहे.

पूर्व रेल्वेच्या Apprentice भरतीमध्ये Written Exam स्पर्धा परीक्षा होत नाही. इथे निवड प्रक्रिया पूर्णपणे शैक्षणिक पात्रतेवर आधारित Merit List तयार करून केली जाते. त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करताना आपले गुण अचूक नमूद करणे फार महत्वाचे आहे. 10वीच्या बोर्ड परीक्षेतील टक्केवारी आणि संबंधित ITI ट्रेडमधील गुण यांचा सरासरी निकाल काढून त्यावर आधारित उमेदवारांची Merit List जाहीर केली जाते.

Merit List मध्ये नाव आल्यावर उमेदवारांना मूळ कागदपत्रांची पडताळणी (Document Verification) साठी बोलावलं जातं. हे टप्पे पार केल्यानंतरच अंतिम निवड निश्चित केली जाते.

  • लेखी परीक्षा होणार नाही.
  • 10वी व ITI मधील गुणांवर आधारित Merit List तयार केली जाईल.
  • Merit List नंतर Document Verification (कागदपत्र पडताळणी) होईल.
  • पडताळणी पूर्ण केल्यानंतरच Final Selection (अंतिम निवड) केली जाईल.
  • गरजेनुसार Medical Examination (वैद्यकीय तपासणी) घेतली जाऊ शकते.

Eastern Railway Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती

तपशीलDate
Online Registration Start Date14 ऑगस्ट 2025
Last Date for Online Application13 सप्टेंबर 2025

Eastern Railway Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना

घटकलिंक / माहिती
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची जाहिरात PDFNotification वाचा
Apply Online (ऑनलाईन अर्ज)इथे अर्ज करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

Eastern Railway Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया

✅ Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या

👉 https://www.er.indianrailways.gov.in या Eastern Railway च्या अधिकृत वेबसाईटवर जा.
तिथून “RRC/ER Apprentice 2025” या लिंकवर क्लिक करा.

✅ Step 2: नोंदणी (Registration) करा

नवीन उमेदवारांनी प्रथम “New Registration” या पर्यायावर क्लिक करून आपले नाव, ईमेल आयडी, मोबाईल नंबर आणि अन्य प्राथमिक माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.

✅ Step 3: Login करून अर्ज भरा

नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला एक Registration ID व पासवर्ड मिळेल. ते वापरून लॉगिन करा आणि अर्ज फॉर्म भरायला सुरुवात करा.

✅ Step 4: आवश्यक माहिती भरा

  • वैयक्तिक माहिती (Personal Details)
  • शैक्षणिक पात्रता (Qualification Details)
  • ITI ट्रेड व बोर्ड तपशील
  • फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा

✅ Step 5: अर्जाची फी भरा

  • General / OBC – ₹100
  • SC / ST / PwBD / महिला – फी नाही
    फी ऑनलाइन पद्धतीनेच (Debit/Credit Card, UPI, Net Banking) भरावी लागेल.

✅ Step 6: अर्ज सबमिट करा आणि प्रिंट घ्या

संपूर्ण माहिती तपासून अर्ज Final Submit करा. नंतर अर्जाची प्रिंटआउट (Printout) घ्या, कारण पुढे ती Document Verification वेळी लागणार आहे.

इतर भरती

BSF Sports Quota Bharti 2025: 10वी पास खेळाडूंना संधी! सीमा सुरक्षा दलात 241 जागांसाठी भरती! 69,000 पर्यंत पगार! अर्ज लगेच करा!

Indian Navy SSC Officer Bharti 2025: भारतीय नौदलात SSC ऑफिसर पदासाठी भरती! पगार रु.80,000 पर्यंत, लगेच फॉर्म भरा

BARTI Free Police Bharti Training 2025: पोलीस भरती मोफत ट्रेनिंग प्रोग्राम बार्टी मार्फत आणि 72,000 रु. आर्थिक मदत, महिना 10 हजार ! Apply Online

BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 10वी ITI पास वर 3588 जागांची मेगा भरती! पगार 69 हजार रुपया पर्यंत, लगेच अर्ज करा

Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा

Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!

IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!

AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!

BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!

ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!

Eastern Railway Bharti 2025 – 26: FAQ

Eastern Railway Bharti 2025 मध्ये कोणती पदे भरली जात आहेत?

अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) या पदांची भरती होणार आहे.

Eastern Railway Bharti 2025 साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?

एकूण रिक्त जागा या 3115 आहेत.

Eastern Railway Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 13 सप्टेंबर 2025  आहे.

Eastern Railway Bharti ची निवड प्रक्रिया कशी आहे?

निवड हि मेरीट बेस आहे, म्हणजे 10 वी आणि iti मध्ये मिळालेल्या मार्क वर निवड होणार आहे.

Leave a comment