Indian Army SSC Tech Bharti 2025: भारतीय लष्करात (Indian Army) अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी एक मोठी संधी आली आहे. Indian Army SSC Tech Bharti 2025 अंतर्गत शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) टेक्निकल कोर्स साठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या कोर्सअंतर्गत पुरुष आणि महिलांना लष्करी अधिकारी पदासाठी प्रशिक्षण दिले जाणार असून, यामार्फत पदवीधरांना थेट सैन्यात अधिकारी होण्याची संधी मिळणार आहे.
या भरतीमध्ये टोटल 381 जागा उपलब्ध असून, यामध्ये SSC (Tech) पुरुष, SSC (Tech) महिला यांचा समावेश आहे. तुम्ही जर इंजिनिअरिंग पदवी, कोणत्याही शाखेतील पदवी, BE/B.Tech किंवा समतुल्य पदवी प्राप्त केली असेल किंवा शेवटच्या वर्षाला असाल, तर तुम्ही या भरतीसाठी पात्र आहात.
या भरती साठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून शेवटची तारीख पुरुष आणि महिलांसाठी वेगवेगळी आहे. इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावा आणि भारतीय लष्करात अधिकारी होण्याच्या या संधीचा लाभ घ्यावा.
या लेखात Indian Army SSC Tech Bharti 2025 संदर्भात पात्रता, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया, अर्ज कसा भरावा, महत्वाच्या तारखा अशा सगळ्या बाबींची संपूर्ण माहिती दिली आहे. त्यामुळे लेख शेवटपर्यंत नीट वाचा, आणि लगेच या भरती साठी अर्ज सादर करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
Indian Army SSC Tech Bharti 2025: Complete Recruitment Details – भरतीची संपूर्ण माहिती
माहितीचा तपशील | विवरण / माहिती |
---|---|
भरती करणारी संस्था | भारतीय सैन्य दल (Indian Army) |
भरतीचे नाव | SSC (Tech) Entry 2025 |
पदाचे नाव | Short Service Commission (Technical) Officer |
एकूण पदसंख्या | 381 (पुरुष: 350, महिला: 29) |
सेवेचा प्रकार | Commissioned Officer (SSC) |
नोकरी ठिकाण | भारतातील विविध लष्करी ठिकाणी |
वेतनश्रेणी | ₹56,100/- पासून (Level 10) + भत्ते |
अर्जाची फी | सर्व प्रवर्गासाठी विनामूल्य |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन अर्ज (www.joinindianarmy.nic.in वर) |
Indian Army SSC Tech Bharti 2025: Posts & Vacancies – पदे आणि उपलब्ध जागा
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या | |
1 | SSC (T) – 66 & SSCW (T) – 66 | पुरुष | महिला |
350 | 29 | ||
Widows of Defence Personnel only | |||
2 | SSC (W) (Tech) | 01 | |
3 | SSC(W) (Non-Tech) (Non-UPSC) | 01 | |
Total | 381 |
Indian Army SSC Tech Bharti 2025: Eligibility & Qualifications – पात्रता आणि शैक्षणिक अटी
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
SSC (T)-65 & SSCW (T)-36 | उमेदवार हा संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी घेतलेला असावा किंवा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षात शिकत असावा. |
SSC (W) (Tech) | उमेदवाराने B.E/B.Tech पदवी मिळवलेली असावी. |
SSC(W) (Non Tech) (Non UPSC) | उमेदवाराने कोणत्याही शाखेतील पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. |
Indian Army SSC Tech Bharti 2025: Age Limit & Relaxations – वयोमर्यादा आणि सवलती
पदाचे नाव | वयोमर्यादा (Age Limit) |
---|---|
SSC (T)-66 & SSCW (T)-66 | 20 ते 27 वर्षे |
Widows of Defence Personnel | 20 ते 35 वर्षे |
Indian Army SSC Tech Bharti 2025: Physical Requirement
पुरुषांसाठी शारीरिक पात्रता या खालील प्रमाणे आहेत:
Activity | Minimum Requirement |
---|---|
2.4 किमी धावणे (Run) | 10 मिनिटे 30 सेकंदांमध्ये पूर्ण करणे |
पुश-अप्स (Push Up) | 40 वेळा |
पुल-अप्स (Pull Up) | 6 वेळा |
सिट-अप्स (Sit Up) | 30 वेळा |
स्क्वॅट्स (Squats) | दोन सेट, प्रत्येकी 30 वेळा |
लंजेस (Lunges) | दोन सेट, प्रत्येकी 10 वेळा |
पोहणे (Swimming) | प्राथमिक स्वरुपात पोहणे जमल पाहिजे. |
महिलांसाठी शारीरिक पात्रता या खालील प्रमाणे आहेत:
Activity | Minimum Requirement |
---|---|
2.4 किमी धावणे (Run) | 13 मिनिटांमध्ये पूर्ण करणे |
पुश-अप्स (Push Up) | 15 वेळा |
पुल-अप्स (Pull Up) | 2 वेळा |
सिट-अप्स (Sit Up) | 25 वेळा |
स्क्वॅट्स (Squats) | दोन सेट, प्रत्येकी 30 वेळा |
लंजेस (Lunges) | दोन सेट, प्रत्येकी 10 वेळा |
पोहणे (Swimming) | प्राथमिक स्वरुपात पोहणे जमल पाहिजे. |
Indian Army SSC Tech Bharti 2025: Selection Process & Exam Pattern – निवड प्रक्रिया आणि परीक्षा पद्धत
भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स (एप्रिल 2026) साठी निवड प्रक्रिया हि खालील प्रमाणे असणार आहे, यामध्ये उमेदवार हे त्यांच्या शैक्षणिक मार्क द्वारे Shortlist केले जातील मग त्यांना Interview साठी बोलवले जाईल, मुलाखत झाल्यावर मेडिकल तपासणी होईल नंतर उमदेवार भारतीय सैन्य SCC (Tech) कोर्स (एप्रिल 2026) साठी निवडले जातील.
- Shortlisting (अर्जाची छाननी करणे) –
- हा पहिला निवड प्रक्रियेतील पहिला टप्पा आहे.
- या टप्प्यात उमेदवाराला पदवी परीक्षेत किती मार्क पडले याची छाननी केली जाईल.
- त्यानंतर जे उमेदवार पात्र ठरतील त्यांना Shortlist केले जाईल.
- SSB Interview (मुलाखत) –
- अर्जाची छाननी करून जे उमदेवार निवडले जातील त्यांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.
- मुलाखत मध्ये जे उमेदवार पास होतील केवळ त्यांना पुढे कोर्स मध्ये भाग घेता येईल.
- Medical Examination (वैद्यकीय चाचणी) –
- वरील दोन्ही टप्प्यात पास झालेल्या उमेदवारांना वैद्यकीय चाचणी टेस्ट साठी बोलवले जाईल.
- या Medical Examination मध्ये उमेदवार शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आहे का, Fit – Unfit हे सर्व तपासले जाते.
- Final Selection (अंतिम निवड) –
- वरील सर्व टप्पे पार पडल्या नंतर पास झालेल्या उमेदवारांना पुढे प्रशिक्षणासाठी बोलवले जाईल.
Indian Army SSC Tech Bharti 2025: Important Dates & Deadlines – महत्त्वाच्या तारखा आणि अंतिम मुदती
तपशील | Date |
---|---|
Registration Start Date | 24 जुलै 2025 |
Last Date for Online Application | (पुरुष): 22 ऑगस्ट 2025 (महिला): 21 ऑगस्ट 2025 |
Indian Army SSC Tech Bharti 2025: Important Links & Official Notification – महत्त्वाच्या लिंक्स आणि अधिकृत सूचना
घटक | लिंक / माहिती |
---|---|
भरतीची अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
पुरुष उमेदवारांसाठी जाहिरात | PDF डाउनलोड करा |
महिला उमेदवारांसाठी जाहिरात | PDF डाउनलोड करा |
Apply Online (ऑनलाईन अर्ज) | इथे अर्ज करा |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Indian Army SSC Tech Bharti 2025: Step-by-Step Application Process – ऑनलाईन अर्ज प्रक्रिया
✅ Step 1: अधिकृत वेबसाईटला भेट द्या
- Indian Army SSC Tech Bharti 2025 साठी अर्ज खालील अधिकृत वेबसाईटवरून करता येईल.
- 👉 https://www.joinindianarmy.nic.in
✅ Step 2: नाव नोंदणी (New Registration) करा
- “Officer Entry Apply/Login” या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर “Registration” वर क्लिक करून तुमचे नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी माहिती भरून नोंदणी पूर्ण करा.
- नोंदणी झाल्यावर तुम्हाला एक User ID आणि Password मिळेल.
✅ Step 3: लॉगिन करा आणि अर्ज भरा
- प्राप्त User ID आणि Password वापरून वेबसाईटवर लॉगिन करा.
- लॉगिन केल्यानंतर “Apply Online” मध्ये जाऊन SSC(Tech)-66 Men किंवा SSCW(Tech)-38 Women पर्याय निवडा आणि अर्ज भरणे सुरू करा.
- त्यानंतर वैयक्तिक माहिती, शैक्षणिक पात्रता, शाखा (Engineering Discipline), पत्ता वगैरे सर्व माहिती नीट भरून घ्या.
✅ Step 4: आवश्यक कागदपत्रे अपलोड करा
- पासपोर्ट साईझ फोटो (JPEG – 20–50 KB)
- स्वाक्षरी (Signature – JPEG – 10–20 KB)
- पदवी / अंतिम वर्षाची मार्कशीट
- इतर आवश्यक प्रमाणपत्रे (PDF किंवा JPEG स्वरूपात)
- सर्व कागदपत्रे योग्य फॉरमॅटमध्ये आणि मर्यादित साईझमध्ये अपलोड करा.
✅ Step 5: अर्ज सबमिट करा
- संपूर्ण माहिती व कागदपत्रे नीट भरून झाल्यावर अर्ज Submit करा.
- एकदा Final Submit केल्यावर फॉर्ममध्ये बदल करता येणार नाही, हे नक्की लक्षात ठेवा.
✅ Step 6: अर्जाची प्रिंटआउट घ्या
- Final Submission केल्यानंतर अर्जाची प्रिंटआउट काढून ठेवा.
- ही प्रिंट SSB Interview किंवा पुढील टप्प्यांमध्ये उपयोगी येते, त्यामुळे पावती जपून ठेवा.
📌 महत्त्वाच्या टीप्स:
- अर्ज करताना इंटरनेट कनेक्शन चांगल असण आवश्यक आहे.
- अर्जात चुकीची माहिती दिल्यास फॉर्म रद्द होऊ शकते.
- अर्ज शेवटच्या तारखेच्या आगोदर भरा; शेवटच्या दिवशी वेबसाइट स्लो होण्याची शक्यता असते.
- अर्ज प्रक्रिया पूर्णतः मोफत आहे, अर्जासाठी कोणतीही फी नाहीये.
इतर भरती
BSF Constable Tradesmen Bharti 2025: सीमा सुरक्षा दलात 10वी ITI पास वर 3588 जागांची मेगा भरती! पगार 69 हजार रुपया पर्यंत, लगेच अर्ज करा
Intelligence Bureau Bharti 2025: केंद्रीय गुप्तचर विभागात 10वी पासवर भरती! पगार ₹69,100 पर्यंत, येथून लगेच फॉर्म भरा
Railway SWR Apprentice Bharti 2025: 10वी व ITI पास उमेदवारांसाठी रेल्वे अप्रेंटिस भरती सुरू! पगार ₹7,000 पासून! लगेच अर्ज करा!
IB ACIO Grade-II / Executive Recruitment 2025:पदवीधरांसाठी गुप्तचर विभागात मेगाभरती! पगार 1.4 लाख पर्यंत, अर्ज सुरू!
AIIMS CRE Bharti 2025: 10वी, 12वी, ITI, डिग्री पासवर AIIMS मधे 2300+ जागांची भरती, पगार ₹35,400 पासून! संधी सोडू नका लगेच अर्ज करा!
BHEL Bharti 2025: भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड मध्ये ITI+NAC उमेदवारांसाठी मेगाभरती! पगार ₹29,500 पासून! लगेच अर्ज करा!
ICF Bharti 2025: रेल्वे अप्रेंटिस भरती 10वी आणि ITI उमेदवारांसाठी सुवर्णसंधी,₹7000 पासून! लगेच अर्ज करा!
Indian Air Force Airmen Bharti 2025: 12वी आणि डिप्लोमा Pharmacy पाससाठी भरती, पगार ₹26,900 पासून! लगेच अर्ज करा!
NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !
Indian Army SSC Tech Bharti 2025 – 26: FAQ
Indian Army SSC Tech Bharti 2025 अंतर्गत कोणती पदे भरली जात आहेत?
Indian Army SSC Tech Bharti 2025 अंतर्गत SSC (Tech) Officer – पुरुष व महिला, तसेच शहीद जवानांच्या विधवा महिलांसाठी SSC (Tech) व Non-Tech Officer पदांची भरती केली जात आहे.
Indian Army SSC Tech Bharti साठी एकूण किती पदे रिक्त आहेत?
या भरतीद्वारे एकूण 381 रिक्त पदांची घोषणा करण्यात आली आहे, ज्यातील पुरुषासाठी 350 तर महिलासाठी 29 जागा आहेत.
Indian Army SSC Tech Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?
ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि पुरुषासाठी 22 ऑगस्ट 2025 तर महिलासाठी 21 ऑगस्ट 2025 आहे.
Indian Army SSC Tech Bharti 2025 मध्ये निवड प्रक्रिया कशी आहे?
सुरुवातीला उमेदवारांची Shortlisting केली जाते, नंतर Interview घेतला जातो मग वैद्यकीय तपासणी होते मग शेवटी मेरीट लिस्ट द्वारे अंतिम निवड होते.