Raman Kant Munjal Scholarship 2025-26: 12वी पास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 5.5 लाख पर्यंतची स्कॉलरशि मिळणार! संधी गमावू नका!

Raman Kant Munjal Scholarship 2025-26. मित्रांनो! शिक्षण म्हणजे भविष्य घडवण्याचं शक्तिशाली साधन, आणि जर योग्य आर्थिक पाठबळ मिळालं, तर प्रत्येक विद्यार्थी आपलं स्वप्न साकार करू शकतो. अशाच विद्यार्थ्यांसाठी Hero FinCorp च्या सहकार्याने Raman Kant Munjal Foundation कडून ‘Raman Kant Munjal Scholarship 2025-26’ ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे.

ही शिष्यवृत्ती खासकरून अशा विद्यार्थ्यांसाठी आहे जे 12वी नंतर सध्या BBA, B.Com, BA (Economics), BMS, BFIA, IPM यासारख्या फायनान्ससंबंधित अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दरवर्षी ₹40,000 ते ₹5,50,000 इतकी आर्थिक मदत तीन वर्षांसाठी मिळू शकते.

ही योजना केवळ आर्थिक मदत देणारी नाही, तर विद्यार्थ्यांना उज्वल करिअर घडवण्यासाठी एक मजबूत पाया पुरवणारी आहे. जर तुम्ही फायनान्ससंबंधित अभ्यासक्रम करत असाल आणि गुणवत्तापूर्ण गुण मिळवले असतील, तर ही सुवर्णसंधी तुमच्यासाठीच आहे.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Raman Kant Munjal Scholarship

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 माहिती

तपशीलमाहिती
📌 शिष्यवृत्तीचे नावRaman Kant Munjal Scholarship 2025-26
🎯 उद्दिष्टफायनान्स संबंधित अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आर्थिक मदत
🎓 शिष्यवृत्तीची रक्कम₹40,000 ते ₹5,50,000 प्रतिवर्ष (तीन वर्षांसाठी)

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 Eligibility – कोण पात्र आहे?

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 ही शिष्यवृत्ती खालील पात्रतेचे निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खुली आहे:

  • शैक्षणिक पात्रता: अर्जदार विद्यार्थी सध्या खालील अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिकत असावा:
    • BBA (Bachelor of Business Administration)
    • B.Com. (Hons./General)
    • BMS (Bachelor of Management Studies)
    • BFIA (Bachelor of Financial and Investment Analysis)
    • IPM (Integrated Programme in Management)
    • BBS (Bachelor in Business Studies)
    • B.A. (Economics)
    • किंवा इतर कोणताही फायनान्स-संबंधित पदवी अभ्यासक्रम
  • गुणांची अट:
    • 10वी व 12वीत किमान 80% गुण आवश्यक (PwD विद्यार्थ्यांसाठी किमान 70%)
  • वार्षिक कुटुंब उत्पन्न:
    • कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ₹6 लाखांपेक्षा कमी असावे
  • राष्ट्रीयत्व:
    • अर्जदार भारतीय नागरिक असावा
  • निष्कासित पात्रता:
    • Hero FinCorp, Raman Kant Munjal Foundation किंवा Buddy4Study या संस्थांचे कर्मचारी/ठेकेदार यांची मुले पात्र नाहीत

Raman Kant Munjal Scholarship Selection Process निवड प्रक्रिया

ही शिष्यवृत्ती योजना केवळ अर्जावर आधारित नसून निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता, आर्थिक परिस्थिती आणि निवड मुलाखतीचा समावेश असतो. निवड प्रक्रिया पुढीलप्रमाणे असू शकते:

  1. शॉर्टलिस्टिंग: सर्व अर्जांची प्राथमिक छाननी करून गुणवत्ता आणि गरज या निकषांवर पात्र उमेदवार निवडले जातील.
  2. दस्तऐवज पडताळणी: अर्जासोबत दिलेले सर्व कागदपत्रे तपासली जातील.
  3. मुलाखत (जर आवश्यक असेल तर): काही विद्यार्थ्यांना ऑनलाइन किंवा फोनद्वारे मुलाखतीसाठी बोलावलं जाऊ शकतं.
  4. अंतिम यादी: निवड झालेल्या विद्यार्थ्यांची अंतिम यादी Buddy4Study पोर्टलवर जाहीर केली जाईल.

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 Important Dates

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे. इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांनी ही अंतिम तारीख लक्षात घेऊन लवकरात लवकर अर्ज प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे.

सूचना: अर्ज पूर्ण करताना सर्व आवश्यक कागदपत्रे तयार ठेवावीत व अर्जात दिलेली माहिती अचूक भरावी, अन्यथा अर्ज फेटाळला जाऊ शकतो.

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 Important Links

घटकलिंक/माहिती
अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
Eligible Institutions / College Listइथे क्लिक करा
व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप (रोजच्या अपडेटसाठी)येथे क्लिक करा

NHPC Apprentice Bharti 2025: ITI, डिप्लोमा आणि डिग्री पासवर विनापरीक्षा भरती नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये, Chance सोडू नका !

How to Apply Raman Kant Munjal Scholarship 2025- अर्ज कसा करावा?

अर्ज प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे:

  1. खाली दिलेल्या ‘Apply Now’ बटणावर क्लिक करा.
  2. Buddy4Study या वेबसाईटवर आपला अकाउंटने लॉगिन करा. जर नोंदणी केलेली नसेल, तर Email, Mobile नंबर किंवा Gmail द्वारे रजिस्टर करा.
  3. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला ‘Raman Kant Munjal Scholarship 2025-26’ चा अर्ज फॉर्म दिसेल.
  4. ‘Start Application’ वर क्लिक करा आणि तुमची माहिती नीट भरायला सुरुवात करा.
  5. सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (स्वतः-प्रमाणित प्रत).
  6. ‘Terms and Conditions’ स्वीकारा आणि ‘Preview’ वर क्लिक करा.
  7. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यावर ‘Submit’ बटणावर क्लिक करून अर्ज पूर्ण करा.

इतर भरती

Indian Coast Guard AC 01/2027: 12वी + पदवी पास तरुणांसाठी तटरक्षक दलात भरती! पगार 56,000 पासून! लगेच अर्ज करा!

SSC MTS Bharti 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून 10वी पाससाठी हवालदार आणि MTS पदांसाठी मेगाभरती! पगार 25 हजार पासून, संधी सोडू नका!

Indian Air Force Agniveervayu Bharti 2025: 12वी पासवर इंडियन एअरफोर्सची अग्निवीरवायू भरती सुरू! पगार 30 हजार पर्यंत, संधी सोडू नका!

SSC CHSL Bharti 2025: 12वी पास विद्यार्थ्यांसाठी स्टाफ सिलेक्शन कमिशन SSC CHSL कडून 3131 जागांसाठी मेगाभरती, संधी सोडू नका!

SSC CGL 2025: स्टाफ सिलेक्शन कमिशन CGL मेगाभरती, तब्बल 14,582 जागा! पगार 1 लाख पेक्ष्या जास्त! लगेच अर्ज करा!

MFS Admission 2026: 10वी पाससाठी महाराष्ट्र अग्निशमन सेवा प्रवेश प्रक्रिया 2026-27 सुरू! संधी गमावू नका!

Bank of Baroda LBO Bharti 2025: कोणत्याही शाखेतील पदवी असणाऱ्यांसाठी बँक ऑफ बडोदामध्ये LBO पदाच्या जागांसाठी भरती! पगार 48 हजार पासून!

Ahilyanagar Kotwal Bharti 2025: अहिल्यानगर जिल्ह्यात कोतवाल पदासाठी भरती, 4थी पाससाठी संधी! पगार 15,000 पासून! लगेच अर्ज करा!

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 (FAQs)

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 साठी निवड प्रक्रिया कशी आहे?

या शिष्यवृत्तीसाठी निवड प्रक्रिया बहापदरी आहे. प्रथम अर्जदारांची शैक्षणिक गुणवत्ता आणि आर्थिक पार्श्वभूमी यावर आधारित प्राथमिक निवड केली जाते. त्यानंतर कागदपत्र पडताळणी, टेलिफोनिक मुलाखत आणि Hero FinCorp टीमकडून अंतिम मुलाखती घेतल्या जातात. त्यानंतर अंतिम निवड जाहीर केली जाते.

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 साठी ITR आवश्यक का आहे?

होय, या शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी ITR (Income Tax Return) सादर करणे आवश्यक आहे कारण यावरून विद्यार्थ्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती तपासली जाते. जर पालकांकडे ITR नसेल, तर त्याऐवजी उत्पन्न प्रमाणपत्र किंवा वेतन पावत्या सादर कराव्यात.

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 अर्जदाराचे पालक ITR फाइल करत नसतील, तर काय करावे?

जर पालक ITR फाईल करत नसतील, तर त्यांनी सरकारी मान्य उत्पन्न प्रमाणपत्र (Income Certificate) किंवा वेतन पावत्या सादर करणे आवश्यक आहे. तसेच बँक स्टेटमेंट्स सुद्धा जोडाव्या लागतील.

Raman Kant Munjal Scholarship 2025-26 चा निधी विद्यार्थ्यांना कसा मिळेल?

या शिष्यवृत्तीचा निधी थेट विद्यार्थ्याच्या महाविद्यालयाच्या फीच्या स्वरूपात किंवा विद्यार्थ्याच्या खात्यावर वर्ग करण्यात येतो. निधीचा तपशील निवडीनंतर कळवण्यात येतो.

3 thoughts on “Raman Kant Munjal Scholarship 2025-26: 12वी पास विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी 5.5 लाख पर्यंतची स्कॉलरशि मिळणार! संधी गमावू नका!”

Leave a comment