Infosys Foundation STEM Stars Scholarship Program 2025-26. महिला विद्यार्थिनींना STEM (Science, Technology, Engineering & Mathematics) या क्षेत्रात पदवी शिक्षण घेण्यासाठी आर्थिक आधार देणारी Infosys Foundation STEM Stars Scholarship Program 2025‑26 ही शिष्यवृत्ती योजना जाहीर झाली आहे.
ही शिष्यवृत्ती दरवर्षी ₹1,00,000 पर्यंतचा पूर्ण खर्च (ट्यूशन फी + जिवनावश्यक खर्च + अभ्यास साहित्य) भरून काढते, त्यामुळे आर्थिक अडचणींमुळे शिक्षण थांबू नये, हाच ‘इन्फोसिस फाउंडेशन’चा उद्देश आहे.
जर तुम्ही इयत्ता १२वी उत्तीर्ण असून पहिल्या वर्षाला STEM पदवी, पाच वर्षांचा इंटिग्रेटेड/ड्युअल डिग्री कोर्स किंवा बी.आर्क.च्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला असेल आणि वार्षिक कुटुंब उत्पन्न ₹ 8 लाखांपेक्षा कमी असेल, तर ही संधी खास तुमच्यासाठी आहे. खालील माहिती काळजीपूर्वक वाचा आणि शेवटी दिलेल्या ‘Apply Now’ लिंकद्वारे अर्ज भरण्याची तयारी करा.
आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.

Infosys Foundation STEM Stars Scholarship 2025‑26 – झटपट माहिती (Overview)
घटक | तपशील |
---|---|
शिष्यवृत्तीचे नाव | Infosys Foundation STEM Stars Scholarship 2025‑26 |
आयोजक | Infosys Foundation (CSR विंग – Infosys Ltd.) |
एकूण आर्थिक मदत | दरवर्षी ₹ 1,00,000 (ट्यूशन, लिव्हिंग, स्टडी मटेरियल) |
कालावधी | कमाल 4 वर्षे (इंटिग्रेटेड/ड्युअल डिग्रीसाठी) |
Infosys Foundation STEM Stars Scholarship 2025‑26 – पात्रता निकष (Eligibility Criteria)
- राष्ट्रीयत्व – अर्जदार ही भारतीय महिला विद्यार्थिनी असावी.
- शैक्षणिक पात्रता –
- इयत्ता 12वी उत्तीर्ण (Science सत्र) व अव्वल गुणवत्ताधारक.
- प्रथम वर्ष STEM UG / 2nd Year B.Arch / 5‑Year Integrated किंवा Dual Degreeमध्ये प्रवेश घेतलेला / घेणारा विद्यार्थी.
- महत्त्वाची अट – NIRF‑मान्यताप्राप्त संस्थांतील प्रवेश किंवा शासनाच्या सरकारी अभियांत्रिकी‑वैद्यकीय महाविद्यालयांतील प्रवेश.
- उत्पन्न मर्यादा – कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹ 8 लाख किंवा त्याखाली असावे.
Infosys Foundation STEM Stars Scholarship 2025‑26 – लाभ व आर्थिक मदत (Scholarship Benefits)
- दरवर्षी कमाल ₹ 1,00,000 पर्यंतची रक्कम, जी पुढील गोष्टींसाठी वापरता येते:
- ट्यूशन फी / कॉलेज फी
- हॉस्टेल, मेस, राहणी व प्रवास खर्च
- पुस्तके, स्टेशनरी, लॅब किट्स, इ.
- इंटिग्रेटेड किंवा Dual Degree कोर्ससाठी कमाल चार वर्षांपर्यंत सतत लाभ मिळू शकतो.
Infosys Foundation STEM Stars Scholarship 2025‑26 – आवश्यक कागदपत्रे (Required Documents)
क्रमांक | कागदपत्र |
---|---|
1 | चालू सत्राची पासपोर्ट साइज फोटो |
2 | JEE Main/CET/NEET स्कोअरकार्ड, 12वी मार्कशीट व पासिंग सर्टिफिकेट |
3 | आधार / वोटर ID / पासपोर्ट इ. ओळखपत्र |
4 | प्रवेशाचा पुरावा – फीस पावती / अॅडमिशन लेटर / कॉलेज ID / बोनाफाइड सर्टिफिकेट |
5 | उत्पन्न प्रमाणपत्र / BPL कार्ड / आयुष्मान भारत कार्ड |
6 | मागील ६ महिन्यांचे वीज बिल (पूरक आधार) |
7 | शैक्षणिक खर्चाच्या पावत्या – ट्यूशन, हॉस्टेल, मेस, पुस्तके इ. |
8 | अर्जदाराचे बँक पासबुक / कॅन्सल्ड चेक |
Infosys Foundation STEM Stars Scholarship 2025‑26 – निवड प्रक्रिया (Selection Process)
- स्क्रीनिंग (Eligibility Check) – ऑनलाइन अर्जातील पात्रता निकष, गुण, उत्पन्न व कागदपत्रांची छाननी.
- अकादमिक मेरिट + प्रवेश चाचणी गुण – CET/NEET/JEE Main गुण व 12वी टप्प्यावरील कामगिरीला उच्च प्राधान्य.
- दूरभाष/ऑनलाइन मुलाखत – शॉर्टलिस्ट विद्यार्थिनींशी थेट संवाद : करिअर ध्येय, आर्थिक पार्श्वभूमी, प्रेरणा.
- अंतिम यादी व ऑफर लेटर – Infosys Foundation कडून अधिकृत निवड यादी जाहीर; ईमेल व SMSद्वारे सूचित.
- स्कॉलरशिप वितरण – बँक ट्रान्सफरद्वारे वार्षिक रक्कम; प्रगती अहवाल (Progress Report) सादर केल्यावर पुढील वर्षासाठी नूतनीकरण.
Infosys Foundation STEM Stars Scholarship 2025 – महत्त्वाच्या तारखा (Important Dates)
क्र. | घटक | तारीख |
---|---|---|
1 | अर्ज सुरू होण्याची तारीख | 3 जुलै 2025 |
2 | अर्ज करण्याची अंतिम तारीख | 15 सप्टेंबर 2025 |
3 | निकाल जाहीर होण्याची अपेक्षित वेळ | नोव्हेंबर – डिसेंबर 2025 |
Infosys Foundation STEM Stars Scholarship 2025 – अर्ज लिंक्स (Important Links)
घटक | दुवा |
---|---|
ऑनलाईन अर्ज करण्याची लिंक | Apply Now |
व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
Infosys Foundation STEM Stars Scholarship 2025‑26 – अर्ज प्रक्रिया (How to Apply Online)
- Apply Now बटणावर क्लिक करा (Buddy4Study पोर्टल).
- आधीच Buddy4Study वर खाते असल्यास Login करा; नवीन वापरकर्त्यांनी ईमेल / मोबाईल / Gmail द्वारे Register करा.
- डॅशबोर्डवर Infosys Foundation STEM Stars Scholarship 2025‑26 अर्ज पृष्ठ उघडेल.
- Start Application निवडा आणि ऑनलाईन फॉर्ममध्ये वैयक्तिक, शैक्षणिक व आर्थिक माहिती भरा.
- वरील कागदपत्रे PDF/JPEG फॉर्ममध्ये अपलोड करा (प्रत्येकी ≤ 2 MB).
- Terms & Conditions स्वीकारून Preview वर क्लिक करा.
- सर्व माहिती योग्य असल्याची खात्री पटल्यास Submit बटणद्वारे अर्ज अंतिम करा.
इतर भरती
Infosys Foundation STEM Stars Scholarship Program 2025-26 FAQ-
Infosys Foundation STEM Stars Scholarship Program साठी निवड प्रक्रिया काय आहे?
Infosys Foundation STEM Stars Scholarship Program 2025-26 अंतर्गत विद्यार्थिनींची निवड पुढील टप्प्यांद्वारे केली जाते:
शैक्षणिक पात्रता व आर्थिक परिस्थितीच्या आधारे प्राथमिक स्क्रीनिंग
आवश्यक कागदपत्रांची पडताळणी
शॉर्टलिस्ट विद्यार्थिनींसाठी टेलिफोनिक मुलाखत
अंतिम निवड Infosys Foundation कडून केली जाते
Infosys Foundation STEM Stars Scholarship Program साठी वयोमर्यादा आहे का?
Infosys Foundation STEM Stars Scholarship Program 2025-26 साठी ठरावीक वयोमर्यादा दिलेली नाही. मात्र, अर्जदार विद्यार्थिनीने नुकतेच १२वी उत्तीर्ण होऊन प्रथम वर्ष STEM / द्वितीय वर्ष B.Arch / इंटिग्रेटेड कोर्समध्ये प्रवेश घेतलेला असावा.
Infosys Foundation STEM Stars Scholarship Program साठी उत्पन्न मर्यादा किती आहे?
Infosys Foundation STEM Stars Scholarship Program 2025-26 साठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थिनींच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न ₹8,00,000 किंवा त्यापेक्षा कमी असणे आवश्यक आहे. उत्पन्न प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे.
Infosys Foundation STEM Stars Scholarship Program फंड विद्यार्थिनींना कसा मिळेल?
Infosys Foundation STEM Stars Scholarship Program 2025-26 अंतर्गत निवड झालेल्या विद्यार्थिनींना शिष्यवृत्तीची रक्कम थेट त्यांच्या बँक खात्यात ट्रान्सफर केली जाईल. विद्यार्थिनींनी बँक पासबुक / कॅन्सल्ड चेक अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
3 thoughts on “Infosys Foundation STEM Stars Scholarship Program 2025-26: 12वी पास मुलींना मिळणार ₹1 लाख शिष्यवृत्ती! आजच अर्ज करा!”