RRB Group D Bharti 2025 : 10वी, ITI पासवर रेल्वे मध्ये 32,000 जागांसाठी मेगाभरती, संधी पुन्हा येणार नाही, लवकर अर्ज करा!

RRB Group D Bharti 2025: भारतीय रेल्वेने 2025 नवीन वर्षात RRB Group D Bharti 2025 अंतर्गत मेगा भरती ची नोटिफिकेशन जाहीर केली आहे. सरकारी नोकरीची स्वप्न बाळगणाऱ्या आणि भारतातील सार्वजनिक क्षेत्रात काम करण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांसाठी ही एक सुवर्णसंधी आहे.

भारतीय रेल्वे भरती प्रक्रिया रेल्वे प्रशासनाच्या विविध विभागांमध्ये कर्मचारी भरती करण्यासाठी आयोजित केली जाते. रेल्वे भर्ती बोर्ड (RRB) आणि रेल्वे भर्ती सेल (RRC) विविध पदांसाठी नियमितपणे जाहीरनावे काढतात. भारतीय रेल्वेच्या विस्तृत नेटवर्कमध्ये अनेक विभाग आहेत, जेव्हा उमेदवारांची निवड होऊन कार्यरत होतात, तेव्हा त्यांना आकर्षक वेतन, भत्ते आणि सेवासुरक्षेसह कारकीर्दीच्या संधी उपलब्ध होतात.

भरतीसाठी पात्रतेच्या अटी विविध पदांनुसार निश्चित करण्यात आल्या आहे. भरतीसाठी 10वी उत्तीर्ण किंवा समकक्ष आहे. याशिवाय आयटीआय (ITI) प्रमाणपत्र असलेल्या उमेदवारांना ही या 32 हजार जागांसाठी अर्ज करता येईल. यामुळे तांत्रिक कौशल्य असलेल्या उमेदवारांसाठीही ही एक चांगली संधी आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल.

आपल्याला व्हॉट्सऍप, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि यूट्यूबवर अजूनपर्यंत Follow आणि Subscribe केल नसेल तर लगेच करून घ्या लेटेस्ट अपडेटच्या व्हिडिओसाठी.
RRB Group D Bharti

RRB Group D Bharti Post & Vacancy :

पदाचे नाव आणि जागा

पदाचे नाव (Marathi Pronunciation)विभाग (Department)पदसंख्या (Posts)
Pointsman-B (पॉइंट्समन-बी)Traffic (ट्रॅफिक)5058
Assistant (Track Machine) (असिस्टंट (ट्रॅक मशीन))Engineering (इंजिनिअरिंग)799
Assistant (Bridge) (असिस्टंट (ब्रिज))Engineering (इंजिनिअरिंग)301
Track Maintainer Gr. IV (ट्रॅक मेंटेनर ग्रेड ४)Engineering (इंजिनिअरिंग)13,187
Assistant P-Way (असिस्टंट पी-वे)Engineering (इंजिनिअरिंग)257
Assistant (C&W) (असिस्टंट (सी अँड डब्ल्यू))Mechanical (मेकॅनिकल)2587
Assistant TRD (असिस्टंट टीआरडी)Electrical (इलेक्ट्रिकल)1381
Assistant (S&T) (असिस्टंट (एस अँड टी))S&T (एस अँड टी)2012
Assistant Loco Shed (Diesel) (असिस्टंट लोको शेड (डिझेल))Mechanical (मेकॅनिकल)420
Assistant Loco Shed (Electrical) (असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल))Electrical (इलेक्ट्रिकल)950
Assistant Operations (Electrical) (असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल))Electrical (इलेक्ट्रिकल)744
Assistant TL & AC (असिस्टंट टीएल अँड एसी)Electrical (इलेक्ट्रिकल)1041
Assistant TL & AC (Workshop) (असिस्टंट टीएल अँड एसी (वर्कशॉप))Electrical (इलेक्ट्रिकल)624
Assistant (Workshop) (Mechanical) (असिस्टंट (वर्कशॉप) (मेकॅनिकल))Mechanical (मेकॅनिकल)3077
एकूण : 32,438

RRB Group D Bharti 2025 Educational Qualification (शैक्षणिक पात्रता)

RRB Group D Bharti 2025 गट-ड (Group D)उमेदवारांनी दहावी आणि मान्यताप्राप्त संस्थेतून ITI उत्तीर्ण केलेले असावे. अंतिम वर्षाचे ITI विद्यार्थी अर्ज करू शकतात, परंतु 31 डिसेंबर 2024 पूर्वी उत्तीर्ण झाल्याचा पुरावा सादर करावा लागेल.

पदाचे नावशिक्षण पात्रता
Pointsman-B (पॉइंट्समन-बी)10वी पास
Assistant (Track Machine) (असिस्टंट (ट्रॅक मशीन))10वी पास + ITI
Assistant (Bridge) (असिस्टंट (ब्रिज))10वी पास + ITI
Track Maintainer Gr. IV (ट्रॅक मेंटेनर ग्रेड ४)10वी पास
Assistant P-Way (असिस्टंट पी-वे)10वी पास + ITI
Assistant (C&W) (असिस्टंट (सी अँड डब्ल्यू))10वी पास + ITI
Assistant TRD (असिस्टंट टीआरडी)10वी पास + ITI
Assistant (S&T) (असिस्टंट (एस अँड टी))10वी पास + ITI
Assistant Loco Shed (Diesel) (असिस्टंट लोको शेड (डिझेल))10वी पास + ITI
Assistant Loco Shed (Electrical) (असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल))10वी पास + ITI
Assistant Operations (Electrical) (असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल))10वी पास + ITI
Assistant TL & AC (असिस्टंट टीएल अँड एसी)10वी पास + ITI
Assistant TL & AC (Workshop) (असिस्टंट टीएल अँड एसी (वर्कशॉप))10वी पास + ITI
Assistant (Workshop) (Mechanical) (असिस्टंट (वर्कशॉप) (मेकॅनिकल))10वी पास + ITI

RRB Group D Bharti Age Limit (वयोमर्यादा)

वयाची अट: 01 जुलै 2025 रोजी 18 ते 36 वर्षे  (SC /ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)

  • किमान वय: 18 वर्षे
  • कमाल वय: 36 वर्षे
  • SC/ST/OBC आणि इतर राखीव प्रवर्गांसाठी सरकारी नियमांनुसार वयोमर्यादेत सूट.

RRB Group D Bharti Application Fee (अर्ज शुल्क )

अर्ज शुल्क

प्रवर्गअर्ज शुल्क
GEN/OBC₹500
SC / ST / ट्रान्सजेंडर₹250
परीक्षेस सामील झाल्या नंतर :
सामान्य आणि ओबीसी प्रवर्गासाठी ₹400 परतावा.
इतर प्रवर्गासाठी संपूर्ण रक्कम परत केली जाईल.

RRB Group D Bharti 2025 Salary (पगार)

7व्या सीपीसी वेतनश्रेणी स्तर 1 मधील विविध पदांसाठी भरती किमान पगार – Rs. 18000 असेल.

भत्ते आणि सुविधा

  • Dearness Allowance(महागाई भत्ता ):
    कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाचा एक टक्केवारीभाग जो महागाईच्या दरानुसार बदलतो.
  • घरभाडे भत्ता (House Rent Allowance):
    पोस्टिंग ठिकाणाच्या श्रेणीनुसार वेतनामध्ये वेगळेपण असतो.
  • परिवहन भत्ता (Transport Allowance):
    कामाच्या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी दिला जाणारा भत्ता.
  • वैद्यकीय सुविधा (Medical Facilities):
    रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा.
  • निवृत्ती वेतन योजना (Pension Scheme):
    निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्यासाठी पुरवठा.

RRB Group D Bharti 2025 अर्ज कसा करावा ?

  1. अधिकृत वेबसाईटला भेट द्या: आरआरबी ग्रुप-D भरतीसाठी अधिकृत वेबसाईटवर जा. शॉर्ट नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या विभागानुसार(Ahmedabad, Ajmer, Bhopal, Chennai, etc) आपल्या संबंधित विभागाच्या लिंकवर क्लिक करा.
  2. नोंदणी करा: नवीन खाते तयार करण्यासाठी वेबसाईटवर नोंदणी करा. आवश्यक माहिती जसे की नाव, ईमेल आयडी(email), संपर्क नंबर (Phone No), वय(age), इत्यादी भरून खातं बनवा.
  3. अर्ज भरा: खाते तयार केल्यानंतर, अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक आणि वैयक्तिक माहिती भरा. आपली शैक्षणिक पात्रता, वय, आणि इतर संबंधित अचूक माहिती पूर्ण करा. तसेच, आवश्यक कागदपत्रांचे स्कॅन केलेले प्रती जोडणे आवश्यक आहे.
  4. फी भरा: अर्ज सादर करण्यासाठी, अर्ज शुल्क ऑनलाइन भरणे आहे. शुल्क भरण्यासाठी क्रेडिट/डेबिट कार्ड, नेट बँकिंग आणि upi अश्या ऑनलाइन पेमेंट पद्धती वापरता येतील. शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, त्याची पावती मिळवावी .
  5. प्रिंट घ्या: अर्ज सादर झाल्यानंतर, अर्जाचा प्रिंटआउट काढा. तो भविष्यातील संदर्भासाठी आणि पुढील प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण असेल

RRB Group D Bharti 2025 Selection Process (निवड प्रक्रिया)

भरती प्रक्रियेचे चार टप्पे असतील:

1. CBT परीक्षा:

विषयानुसार गुणांचे वितरण:

विषयप्रश्नसंख्यागुण
गणित (Mathematics)2525
सामान्य बुद्धिमत्ता आणि तर्कशास्त्र3030
सामान्य विज्ञान2525
सामान्य जागरूकता आणि चालू घडामोडी2020
एकूण : 100 प्रश्न, 100 गुण
  • RRB ग्रुप डी अभ्यासक्रम (संक्षिप्त स्वरूपात)
    • १. गणित
      • गणितात संख्या प्रणाली, टक्केवारी, नफा-तोटा, वेळ आणि अंतर, क्षेत्रफळ आणि घनफळ, बीजगणित, वयाशी संबंधित गणना आणि सांख्यिकी यांचा समावेश आहे.
    • २. सामान्य बुद्धिमत्ता व तर्कशास्त्र
      • तर्कशक्ती भागात मालिका ओळखणे, कोडिंग-डिकोडिंग, नाते संबंध, तर्कशुद्ध विचार, आकडेमोड, पझल्स सोडवणे आणि निर्णय घेण्याची क्षमता तपासली जाते.
    • ३. सामान्य विज्ञान
      • भौतिकशास्त्र: गतीचे नियम, उष्णता, प्रकाश आणि ऊर्जा यांसारख्या विषयांचा समावेश आहे.
      • रसायनशास्त्र: अणूंची रचना, रासायनिक अभिक्रिया आणि धातू व अधातूंची वैशिष्ट्ये शिकावी लागतात.
      • जीवशास्त्र: मानवी शरीर, पोषण, आणि पर्यावरणाचा समतोल यांवर भर दिला जातो.
    • ४. सामान्य जागरूकता व चालू घडामोडी
      • या भागात चालू घडामोडी, भारताचा इतिहास आणि स्वातंत्र्यलढा, भूगोल, अर्थव्यवस्था, क्रीडा विषयक घटना, शासकीय योजना आणि पुरस्कार यांची माहिती असणे महत्त्वाचे आहे.
  • परीक्षेचे स्वरूप
    • प्रश्नांची संख्या: 100
    • वेळेची मर्यादा: 90 मिनिटे
    • गुणांकन पद्धत: प्रत्येक बरोबर उत्तरासाठी 1 गुण; चुकीच्या उत्तरासाठी 1/3 नकारात्मक गुण.

2. शारीरिक कार्यक्षमता चाचणी (Physical Efficiency Test – PET)

  • पुरुष उमेदवारांसाठी:
    • 35 किलो वजन उचलून 100 मीटर अंतर 2 मिनिटांत पूर्ण करणे, आणि या प्रक्रियेत वजन खाली पडू नये.
    • 1 किलोमीटरचे अंतर 4 मिनिटे 15 सेकंदांच्या आत धावून पूर्ण करणे.
  • महिला उमेदवारांसाठी:
    • 20 किलो वजन उचलून 100 मीटर अंतर 2 मिनिटांत पूर्ण करणे, आणि वजन खाली पडू नये.1 किलोमीटरचे अंतर 5 मिनिटे 40 सेकंदांच्या आत धावून पूर्ण करणे.

वैद्यकीय चाचणी (Medical Examination)

वैद्यकीय चाचणीत उमेदवारांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची तपासणी केली जाते. ही चाचणी तुम्ही निवडलेल्या पदाच्या स्वरूपानुसार केली जाते.

मुख्य तपासण्या:
  1. दृष्टीक्षमता: चांगली दृष्टी असावी; चष्म्यांसह किंवा चष्म्याशिवाय दृष्टीच्या निकषांनुसार पात्र ठरावे.
  2. शारीरिक आरोग्य: शारीरिकदृष्ट्या कोणतीही अडचण किंवा गंभीर समस्या नसावी.
  3. श्रवण क्षमता: स्पष्ट ऐकू येणे आवश्यक आहे.
  4. इतर आरोग्य तपासण्या: रक्तदाब, हृदयाचे कार्य इत्यादी तपासले जाते.
टीप:
  • काही पदांसाठी उंची, वजन, आणि शारीरिक फिटनेसचे वेगळे निकष असू शकतात.
  • चाचणीपूर्वी वैद्यकीय सल्ला घेऊन आरोग्याची चाचणी करून घेणे फायद्याचे ठरेल.

3. दस्तावेज पडताळणी

  • पात्र उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक, ओळखपत्र, जात प्रमाणपत्र इ.) सादर करणे बंधनकारक आहे.

RRB Group D Bharti 2025 Important Dates

महत्वाच्या तारखा:

घटनातारीख
अर्ज सुरू होण्याची तारीख23 जानेवारी 2025
अर्ज करण्याची शेवटची तारीख22 फेब्रुवारी 2025

RRB Group D Bharti 2025 Important Links

घटकलिंक/माहिती
ऑनलाइन अर्जइथे क्लिक करा
भरतीची अधिकृत वेबसाइटइथे क्लिक करा
भरतीची शॉर्ट जाहिरात (PDF)इथे डाउनलोड करा
व्हॉट्सअ‍ॅप गट (अपडेटसाठी)येथे क्लिक करा

इतर भरती 



आरआरबी ग्रुप D 2024 ची अधिसूचना जारी झाली आहे का?

होय, आरआरबी ग्रुप D 2024 ची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. आरआरबीने 23 डिसेंबर 2024 रोजी रोजगार समाचार पत्रात ग्रुप D लेव्हल 1 भर्ती (CEN 08/2024) ची संक्षिप्त अधिसूचना प्रकाशित केली आहे. या अधिसूचनेनुसार, 2025 साठी 32,438 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. उमेदवार 23 जानेवारी 2025 ते 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करू शकतात.

RRB ग्रुप D चा पगार किती आहे?

RRB ग्रुप D कर्मचारी दरमहा साधारणपणे ₹28,512 पगार मिळवतात. यात मूळ वेतन, महागाई भत्ता (DA), घरभाडे भत्ता (HRA), आणि प्रवास भत्ता (TA) यांचा समावेश असतो. परंतु भविष्य निर्वाह निधी (PF) आणि कर वजा केल्यानंतर, प्रत्यक्ष हाती मिळणारा पगार ₹18,000 ते ₹20,000 च्या दरम्यान असतो. हा पगार भत्ते आणि कामाच्या ठिकाणानुसार बदलतो.

RRB Group D चा अभ्यासक्रम काय आहे ?

आरआरबी ग्रुप डी चा सिलेबस कक्षा 10 च्या स्तरावर आधारित आहे कारण या परीक्षेचा उद्देश प्राथमिक शैक्षणिक कौशल्यांचा मूल्यांकन करणे आहे. या परीक्षेत विचारले जाणारे विषय सामान्य ज्ञान, गणित, सामान्य विज्ञान, आणि तार्किक क्षमता यावर आधारित असतात, जे कक्षा 10 च्या स्तरावर शिकवले जातात.

Leave a comment