IDBI Bank Bharti 2024: IDBI बँकेत ग्रॅज्युएशन पासवर भरती, 6.5 लाखाचे पॅकेज, लगेच अर्ज करा

IDBI Bank Bharti 2024: IDBI बँकेमध्ये भरती निघाली आहे, या संबंधी अधिकृत जाहिरात बँके द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.

ज्युनियर असिस्टंट मॅनेजर आणि असिस्टंट ऑफिसर या दोन पदासाठी भरती निघाली आहे, एकूण सहाशे जागा सोडण्यात आले आहेत.

जर तुम्हाला बँकेमध्ये जॉब करायचा असेल तर तुमच्यासाठी ही चांगली संधी आहे. ग्रॅज्युएशन पासवर ही भरती प्रक्रिया असणार आहे.

ऑनलाइन स्वरूपातच उमेदवारांना फॉर्म भरायचे आहेत, 30 नोव्हेंबर 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.

IDBI Bank Bharti 2024

पदाचे नावज्युनियर असिस्टंट मॅनेजर, JAM-स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर
रिक्त जागा600
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण भारत
वेतन श्रेणी55,000 रुपये
वयाची अट20 ते 25 वर्षे
भरती फीGeneral/ OBC/ EWS: ₹1050/- [SC/ ST/ PWD: ₹250/-]

IDBI Bank Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
 ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O500
JAM-स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर100
Total600

IDBI Bank Bharti 2024 Education Qualification

पदाचे नावशिक्षण
 ज्युनियर असिस्टंट मॅनेजर (JAM) ग्रेड O60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी + संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.  [SC/ST/PwBD: 55% गुण]
JAM-स्पेशलिस्ट-एग्री असिस्ट ऑफिसर60% गुणांसह B.Sc/ B.Tech/ B.E (Agriculture, Horticulture, Agriculture engineering, Fishery Science/ Engineering, Animal Husbandry, Veterinary science, Forestry, Dairy Science/ Technology, Food Science/ technology, Pisciculture, Agro Forestry, Sericulture) + संगणक / IT संबंधित पैलूंमध्ये प्रवीणता असणे अपेक्षित आहे.  [SC/ST/PwBD: 55% गुण]

IDBI Bank Bharti 2024 Apply Online

ऑनलाईन अर्जफॉर्म भरा
जाहिरातPDF Download करा
अर्ज करण्याची लास्ट डेट30 नोव्हेंबर 2024
  • आयडीबीआय बँक भरतीसाठी आयबीपीएस च्या अधिकृत पोर्टलला भेट द्या.
  • पोर्टल वर गेल्यानंतर तिथे तुमची नोंदणी करून लॉगिन करा.
  • त्यानंतर Apply Now ही लिंक शोधून त्यावर क्लिक करा.
  • तुमच्यासमोर भरतीचा फॉर्म उघडेल, फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती भरा.
  • सोबतच जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • या भरतीसाठी आयडीबीआय बँकेद्वारे परीक्षा फी देखील सांगण्यात आली आहे, ती परीक्षा फी भरून घ्या.
  • त्यानंतर बँकेचा एप्लीकेशन फॉर्म एकदा तपासा, काही चुका झाल्या असेल तर त्या दुरुस्त करा.
  • त्यानंतर शेवटी अर्ज खाली दिलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.

IDBI Bank Bharti 2024 Selection Process

आयडीबीआय बँक भरतीसाठी ज्या उमेदवारांनी फॉर्म भरले आहेत त्यांना सुरुवातीला ऑनलाइन स्वरूपात परीक्षा द्यावी लागेल. परीक्षेमध्ये उमेदवार पास झाले की नंतर डॉक्युमेंट वेरिफिकेशन केले जाईल, आणि त्यानंतर उमेदवाराचा पर्सनल इंटरव्यू घेतला जाईल.

IDBI Bank Bharti 2024 Exam

जर उमेदवार वरील प्रक्रियेमध्ये पास झाले तर त्यांना मेडिकल टेस्ट साठी बोलावले जाईल, मेडिकल टेस्ट मध्ये उमेदवारांचे आरोग्य तपासणी केली जाईल आणि सर्व निवड प्रक्रियेच्या टप्प्यानुसार उमेदवारांनी मिळवलेल्या मार्काचे एकत्रीकरण करून, ज्यांना सर्वाधिक मार्क मिळाले आहेत त्यांची मेरिट लिस्ट बनवली जाईल, आणि त्या प्रकारे उमेदवार भरतीसाठी निवडले जातील.

नवीन भरती अपडेट:

IDBI Bank Bharti 2024 FAQ

Who is eligible for IDBI Bank Bharti 2024?

या भरतीसाठी अर्जदार उमेदवारांचे शिक्षण हे किमान ग्रॅज्युएशन पर्यंत झालेलं असावं.

How to apply for IDBI Bank Bharti 2024?

अर्जदार उमेदवारांना आयबीपीएस रिक्रुटमेंट पोर्टलवरून फॉर्म भरायचा आहे.

What is the last date to apply for IDBI Bank Bharti 2024?

उमेदवारांना 30 नोव्हेंबर 2024 च्या अगोदर फॉर्म भरायचे आहेत.

Leave a comment