DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग भरती! 10 वी पास वर नोकरी, लगेच अर्ज करा

DTP Maharashtra Bharti 2024: महाराष्ट्र नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभागामध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासंबंधी DTP Maharashtra द्वारे अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.

सरकारी नोकरी मिळण्याची ही मोठी सुवर्णसंधी आहे, यात अजून एक चांगली बाब म्हणजे भरती 10 वी पास वर राबवली जात आहे. म्हणजे तुमचे शिक्षण जरी दहावी झाली असेल तरी देखील तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

भरतीसाठी एकूण रिक्त जागा या 289 सोडण्यात आल्या आहेत. यात रचना सहायक, लघुलेखक अशा पदांचा समावेश आहे. ज्या उमेदवारांना टायपिंग चे ज्ञान आहे त्यांना तर भरती साठी सर्वात जास्त प्राधान्य असणार आहे.

DTP Maharashtra Bharti 2024

पदाचे नावरचना सहायक, उच्च आणि निम्नश्रेणी लघुलेखक
रिक्त जागा289
नोकरीचे ठिकाणसंपूर्ण महाराष्ट्र
वेतन श्रेणी41,800 रू. + महिना
वयाची अट18 ते 38 वर्षे
भरती फीसाधारण प्रवर्ग: 1000 रु. (मागासवर्ग: 900 रु.)

DTP Maharashtra Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
रचना सहायक (गट ब)261
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)09
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)19
Total289

DTP Maharashtra Bharti 2024 Education Qualification

नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग भरतीसाठी पदानुसार शिक्षण पात्रता वेगळी आहे, त्याची माहिती तुम्ही खाली दिलेल्या टेबलच्या आधारे घेऊ शकता.

भरती साठी सर्वसाधारणपणे उमेदवार हा 10/12 वी पास असावा, त्याला मराठी आणि इंग्रजी टायपिंग येत असावी, सोबत उमेदवाराकडे टायपिंग चे प्रमाणपत्र असावे.

पदाचे नावशिक्षण
रचना सहायक (गट ब)उमेदवाराने स्थापत्य किंवा ग्रामीण आणि स्थापत्य / नागरी व ग्रामीण किंवा वास्तुशास्त्र किंवा बांधकाम तंत्रज्ञान या विषयावर डिप्लोमा केलेला असावा.
उच्चश्रेणी लघुलेखक (गट ब)उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण असावा, आणि त्याची (लघुलेखन 120 शब्द प्रती मिनिट) इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट किंवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट अशी टायपिंग स्पीड असावी.
निम्न श्रेणी लघुलेखक (गट ब)उमेदवार हा किमान 10वी उत्तीर्ण उत्तीर्ण असावा, आणि त्याची लघुलेखन टायपिंग स्पीड 100 शब्द प्रती मिनिट सोबत इंग्रजी टंकलेखन 40 शब्द प्रती मिनिट अथवा मराठी टंकलेखन 30 शब्द प्रती मिनिट एवढी असावी.

Important Dates

अर्ज सुरू होण्याची तारीख02 ऑगस्ट 2024
अर्ज बंद होण्याची तारीख09 सप्टेंबर 2024 
परीक्षेची तारीखअद्याप आली नाही.

Important Links

अधिकृत वेबसाईटभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
भरतीचा फॉर्मऑनलाईन अर्ज येथून करा

DTP Maharashtra Bharti 2024 Apply Online

महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण प्रक्रिया खाली स्टेप बाय स्टेप दिली आहे.

  • सुरुवातीला वर दिलेल्या टेबलमधून ऑनलाईन अर्ज येथून करा या लिंकवर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्ही भरतीच्या पोर्टलवर जाल, तिथे New Registration या पर्यायावर क्लिक करा.
  • तुमची नोंदणी करून घ्या, आयडी पासवर्ड मिळाल्यानंतर लॉगिन करा.
  • त्यानंतर Apply Now वर क्लिक करून DTP Maharashtra Bharti 2024 चा फॉर्म Open करा.
  • फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे, ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  • आवश्यक अशी सर्व कागदपत्रे फॉर्ममध्ये अपलोड करा त्यानंतर परीक्षा फी भरून घ्या.
  • शेवटी अर्ज बरोबर आहे की नाही याची तपासणी करा, अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्यास Submit वर क्लिक करून अर्ज सादर करून टाका.

DTP Maharashtra Bharti 2024 Selection Process

DTP Maharashtra Bharti साठी उमेदवारांची निवड हि तीन टप्प्यात होणार आहे, ज्या उमेदवारांनी हि तिन्ही टप्पे पूर्ण केले त्यांना महाराष्ट्र राज्य नगर रचना विभाग आणि मूल्यनिर्धारण विभाग द्वारे जॉब दिला जाणार आहे.

  • लेखी परीक्षा
  • कागदपत्रे पडताळणी
  • मेडिकल तपासणी
  • मेरीट लिस्ट

सुरुवातीला ज्यांनी फॉर्म भरला आहे त्यांना भरती साठी conduct करण्यात येणारी परीक्षा द्यावी लागणार आहे, परीक्षेत जे उमेदवार पास होतील त्यांना पुढे कागदपत्रे पडताळणी साठी बोलवले जाईल. सर्व document असतील तर त्यांना मेडिकल तपासणी साठी बोलवले जाईल, शेवटी सर्व पात्र उमेदवारांची लिस्ट बनवली जाईल, मेरीट लिस्ट मध्ये ज्यांचे नाव असेल त्यांना या भरती अंतर्गत जॉब मिळेल.

IOCL Apprentice Bharti 2024: इंडियन ऑइल कंपनीमध्ये 10वी पास वर भरती! लगेच अर्ज करा

DTP Maharashtra Bharti 2024 FAQ

What are the eligibility criteria for DTP Maharashtra Bharti 2024?

DTP Maharashtra Bharti साठी अर्जदार उमेदवार हा किमान 10 वी शिकलेला असावा, आणि त्याला टायपिंग चे ज्ञान असावे.

How to apply for DTP Maharashtra Bharti 2024?

महाराष्ट्र नगर रचना विभाग भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे, महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत पोर्टल वरूनच अर्ज सुरू करण्यात आले आहेत.

What is the last date of DTP Maharashtra Bharti 2024?

महाराष्ट्र राज्य नगररचना विभाग भरतीसाठी ऑनलाइन स्वरूपात अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 29 ऑगस्ट 2024 आहे. मुदतवाढ मिळेल या आशेने फॉर्म नंतर भरता येईल, या भ्रमात राहू नका, तात्काळ अर्ज करून टाका.

Leave a comment