North Eastern Railway Bharti 2024: रेल्वेत 1100+ जागांसाठी मेगा भरती! 10 वी आणि ITI वर अर्ज करा

North Eastern Railway Bharti 2024: उत्तर पूर्व रेल्वे विभागामध्ये अप्रेंटिस या पदासाठी मोठी मेगा भरती निघाली आहे. रेल्वे विभागाद्वारे या भरतीसाठी अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध केली आहे.

जे उमेदवार रेल्वेमध्ये नोकरी करू इच्छितात आणि अनुभव घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही मोठी सुवर्णसंधी आहे. या भरती साठी ऑनलाईन स्वरूपातच फॉर्म भरायचा आहे, इतर कोणत्या स्वरूपाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही.

मोठी विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी दहावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना मोठे प्राधान्य असणार आहे. ट्रेनिंग कोर्स प्रमाणे जॉब असणार आहे, निवडलेल्या उमेदवारांना प्रशिक्षणार्थी ट्रेड अप्रेंटिस या पदावरून नियुक्त केले जाणार आहे.

मराठी एकूण रिक्त जागा या 1104 आहेत, या सर्व जागा ट्रेड अप्रेंटिस याच पदासाठी सोडण्यात आल्या आहेत. भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै आहे, भरतीसाठी फॉर्म सुरू झाले आहेत त्यामुळे थोडाही वेळ न दवडता लगेच अर्ज करून टाका.

North Eastern Railway Bharti 2024

पदाचे नावट्रेड अप्रेंटिस
रिक्त जागा1104
नोकरीचे ठिकाणउत्तर पूर्व रेल्वे
वेतन श्रेणी20,200 रू. + महिना
वयाची अट15 ते 24 वर्षे
भरती फीसामान्य प्रवर्ग: 100 रु. (मागासवर्ग: फी नाही)

North Eastern Railway Bharti 2024 Vacancy Details

पदाचे नावपद संख्या
ट्रेड अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)1104
Total1104

North Eastern Railway Bharti 2024 ITI Trades

फिटरकारपेंटर
वेल्डरपेंटर
इलेक्ट्रिशियनमशीनिस्ट
टर्नर

North Eastern Railway Bharti 2024 Education

उत्तर पूर्व रेल्वे भरती साठी ज्या उमेदवारांना अर्ज करायचा आहे त्यांना रेल्वे विभागात द्वारे जारी करण्यात आलेल्या शैक्षणिक पात्रता निकषांचे पालन करावे लागेल.

  • अर्जदार उमेदवार हा किमान दहावी पास असावा.
  • अर्जदाराने दहावीमध्ये किमान 50 टक्के गुण घेतले असावेत.
  • अर्जदार संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असावा.

Important Dates

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख18 जून 2024
अर्ज बंद होण्याची तारीख11 जुलै 2024

Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
जाहिरात PDFDownload करा
ऑनलाईन फॉर्मयेथून अर्ज करा

North Eastern Railway Bharti 2024 Apply Online

  • रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याकरिता अर्जदार उमेदवारांना वर दिलेल्या टेबलमधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.
  • लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर रेल्वे विभागाची अधिकृत Official वेबसाईट ओपन होईल.
  • तिथे सुरुवातीला तुम्हाला तुमचे रजिस्ट्रेशन करून घ्यायचे आहे. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर लॉगिन करायचं आहे.
  • भरतीचा अर्ज तुमच्यासमोर Open होईल, फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे ती माहिती काळजीपूर्वक भरून घ्या.
  • माहिती भरून झाल्यावर जाहिरातीमध्ये सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.
  • रेल्वे भरती साठी नाममात्र फी आकारली जाणार आहे, ते पण फक्त जनरल प्रवर्गासाठी 100 रुपये भरायचे आहेत.
  • फी भरून झाल्यावर फॉर्म पुन्हा एकदा तपासून पाहायचा आहे, अर्ज Verify केला की नंतर सबमिट करून टाका.

North Eastern Railway Bharti 2024 Selection Process

उत्तर पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवारांची निवड ही त्यांच्या दहावीच्या आणि ITI मध्ये मिळालेल्या मार्कवर केली जाणार आहे. भरतीसाठी जेवढ्या उमेदवारांनी अर्ज केला आहे त्यातील सर्वांचे फॉर्म तपासून ज्यांना सर्वाधिक मार्क आहेत त्यांची मेरिट लिस्ट बनवली जाणार आहे, आणि त्याद्वारे रिक्त जागेवर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

North Eastern Railway Bharti 2024 FAQ

Who is eligible for North Eastern Railway Bharti 2024?

उत्तर पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवार हे किमान दहावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण असावेत. जर उमेदवाराचे शिक्षण एवढे झाले नसेल, तर त्यांना या भरतीसाठी अर्ज करता येणार नाही.

How to apply for North Eastern Railway Bharti 2024?

उत्तर पूर्व रेल्वे भरतीसाठी अर्जदार उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे. त्यासाठी स्टेप बाय स्टेप माहिती वर दिली आहे सोबतच पोर्टलची डायरेक्ट लिंक पण दिली आहे.

What is the last date of North Eastern Railway Bharti 2024?

उत्तर पूर्व रेल्वे भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जुलै 2024 आहे, या तारखेनंतर कोणालाही अर्ज करता येणार नाही त्यामुळे मुदती अगोदर फॉर्म भरून टाका.

1 thought on “North Eastern Railway Bharti 2024: रेल्वेत 1100+ जागांसाठी मेगा भरती! 10 वी आणि ITI वर अर्ज करा”

Leave a comment