राज्य सरकारने सुरू केलेली अभिनव अशी घरकुल योजना म्हणजे Yashwaantrao Chavan Gharkul Yojana या योजनेद्वारे गरीब कुटुंबातील लोकांना स्वतःचे घर बांधण्यासाठी अनुदान स्वरूपात आर्थिक मदत केली जाते.
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना साठी कोण पात्र आहे? अर्ज कसा करायचा? लाभ कोणते मिळणार, कसे मिळणार? अशी सविस्तर माहिती या लेखात मी दिली आहे, जर तुम्हाला तुमचे घर बांधायचे असेल तर हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा.
Yashwaantrao Chavan Gharkul Yojana
योजनेचे नाव | Yashwaantrao Chavan Gharkul Yojana |
योजनेची सुरुवात | महाराष्ट्र शासन |
उद्देश | गरीब लोकांना स्वतःचे घर उपलब्ध करून देणे |
लाभार्थी | भटक्या विमुक्त जाती जमाती मधील लोक |
अर्ज प्रक्रिया | ऑफलाईन |
Yashwaantrao Chavan Gharkul Yojana Elegibility Criteria
- अर्जदार व्यक्ती भटक्या विमुक्त जाती जमाती मधील असावा.
- अर्जदार व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न हे 1 लाख रुपया पेक्षा कमी असावे.
- व्यक्ती हा भटकंती करणारा असावा, एका गावातून दुसऱ्या गावी जाऊन राहणारा असावा.
- व्यक्तीच्या किंवा त्याच्या कुटुंबातील कोणाच्याही नावे घर नसावे, व्यक्ती कडे स्वतःची जमीन भूखंड देखील नसावा.
- व्यक्तीने शासनाच्या कोणत्याही आवास योजना चा या आगोदर फायदा घेतलेला नसावा.
Yashwaantrao Chavan Gharkul Yojana Benefits
Yashwaantrao Chavan Gharkul Yojana अंतर्गत अर्जदार व्यक्तीला घर बांधण्यासाठी सरकार द्वारे अनुदान दिले जाते.
- योजनेद्वारे दिले जाणारे अनुदान हे 1.30 हजार रुपया पर्यंत असते.
- अर्जदाराकडे राहण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा नसेल तर ती जागा देखील शासन अर्जदार व्यक्तीला देणार आहे.
भटक्या विमुक्त जाती मधील लोक मुख्य प्रवाहात यावेत, त्यांच्या कडे पण पक्के घर असावे, यासाठी यशवंतराव चव्हाण घरकुल योजना सुरू करण्यात आली आहे.
घरकुल यादीत नावे कसे बघायचे? जाणून घ्या सविस्तर प्रोसेस | Gharkul Yadi Kashi Baghayachi
Yashwaantrao Chavan Gharkul Yojana Document List
- अर्जदाराचे आधार कार्ड ओळखपत्र
- अधिवास प्रमाणपत्र
- जमीन नसेल तर भूमिहीन प्रमाणपत्र
- शासनाच्या इतर आवास योजनांचा फायदा घेतला नसल्याचे शपथपत्र
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
या सोबत इतर कागदपत्रे देखील विचारले जाऊ शकतात, त्यामुळे अर्ज सादर करताना सर्व Documents घेऊन जा. जेणेकरून फॉर्म भरताना कोणतीही अडचण येणार नाही.
Yashwaantrao Chavan Gharkul Yojana Application Form
अर्जदार व्यक्तीला Yashwaantrao Chavan Gharkul Yojana साठी अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात सादर करायचा आहे.
- सुरुवातीला तुम्हाला योजनेचा फॉर्म मिळवायचा आहे, त्यासाठी तुम्ही समाजकल्याण विभागाच्या कार्यालयात जाऊन अर्ज मिळवू शकता.
- फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती सर्व Details काळजीपूर्वक भरून घ्या, वर सांगितलेले सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत झेरॉक्स प्रत स्वरूपात जोडा, त्यानंतर अर्ज सादर करा.
- तुम्ही ज्या जिल्ह्यात सध्या वास्तव्याला आहात, तेथील जिल्हा समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांच्याकडे योजनेचा अर्ज सादर करा.
- सहाय्यक आयुक्त तुमचा Yashwaantrao Chavan Gharkul Yojana Application Form Verify करतील, जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला योजनेचा लाभ मिळेल.
जर तुमच्या नावे घरासाठी जमीन नसेल, तर शासनाद्वारे तुम्हाला शासकीय जमीन किंवा खाजगी जमीन घर बांधण्यासाठी दिली जाईल. मुख्य स्वरूपात शासकीय जमीन देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.
जर तुम्ही ज्या भागात वास्तव्य करत आहात तेथे शासकीय जमीन उपलब्ध नसेल तर शेवटचा पर्याय म्हणून खाजगी जमीन दिली जाणार आहे. यासाठी महसूल खात्याचे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जमीन भूखंड दिला जाणार आहे.
नवीन सरकारी योजना Schemes:
- गरीबांना मिळणार हक्काचे घर! मोदी आवास घरकुल योजना महाराष्ट्र
- घर बांधण्यासाठी मिळणार 1,20,000 रुपये! संधी सोडू नका, अर्ज करा
- 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना मिळणार स्कॉलरशिप! 400 रूपया पर्यंत, फायदा घ्या
Yashwaantrao Chavan Gharkul Yojana FAQ
Who is eligible for Yashwaantrao Chavan Gharkul Yojana?
यशवंतराव चव्हाण घरकुल योजना साठी राज्यातील भटक्या विमुक्त जाती जमाती मधील लोक पात्र असणार आहेत. इतर कोणत्याही प्रवर्गातील उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
How to apply for Yashwaantrao Chavan Gharkul Yojana?
या योजनेसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी अर्जदाराला जिल्हा समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त यांच्या कडे फॉर्म सबमिट करावा लागेल. अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये आपण दिली आहे.
What is the benefits of Yashwaantrao Chavan Gharkul Yojana?
पात्र भटक्या विमुक्त जाती जमाती मधील लोकांना पक्के घर बांधून देण्यासाठी 1.30 लाख रुपये एवढी आर्थिक मदत केली जाणार आहे, सोबत जर व्यक्तीकडे जमीन नसेल तर शासन त्यांना घर बांधण्यासाठी शासकीय जमीन देणार आहे.