Majhi Kanya Bhagyashri Yojana: मुली असतील तर मिळणार 50,000 रुपये! संधी सोडू नका, अर्ज करा

महाराष्ट्र शासनाद्वारे सुरू करण्यात आलेली एक विशेष अशी योजना म्हणजे Majhi Kanya Bhagyashri Yojana या योजने द्वारे जर मुली असतील तर पालकांना पहिल्या मुलीसाठी 50,000 रुपये आणि दुसऱ्या मुलीसाठी 25,000 रुपये एवढी रक्कम मिळणार आहे.

माझी कन्या भाग्यश्री योजना साठी अर्ज कसा करायचा? कोण पात्र असणार? कागदपत्रे कोणती लागणार? लाभ कसा मिळणार? अशी सविस्तर माहिती या आर्टिकल मध्ये दिली आहे, जर तुम्हाला Majhi Kanya Bhagyashri Yojana चा फायदा घ्यायचा असेल तर ही माहिती काळजीपूर्वक वाचून घ्या.

Majhi Kanya Bhagyashri Yojana

योजनेचे नावMajhi Kanya Bhagyashri Yojana
योजनेची सुरुवातमहाराष्ट्र शासन
उद्देशमुलींचा जीवनस्तर उंचावणे.
लाभार्थीमुलीचे पालक
अर्ज प्रक्रियाऑफलाईन

Majhi Kanya Bhagyashri Yojana Elegibility Criteria

  • अर्जदार उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असावा.
  • अर्जदार व्यक्तीला एक किंवा दोन मुली असतील तर तो अर्ज करण्यास पात्र असणार आहे.
  • जर व्यक्तीला तीन आपत्य असतील तर तो व्यक्ती माझी कन्या भाग्यश्री योजना साठी अर्ज करू शकणार नाही.
  • अर्जदार व्यक्तीच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 7.5 लाख रुपये पेक्षा कमी असावे.
  • मुलींचा जन्म हा 1 ऑगस्ट 2021 नंतर झालेला असावा, त्याअगोदर जन्मलेल्या मुली या योजने अंतर्गत अर्ज करू शकणार नाहीत.

Majhi Kanya Bhagyashri Yojana Benefits

  • एक मुलगी असेल तर 50,000 हजार रुपये मिळणार
  • दोन मुली असतील तर 25-25 हजार रुपये मिळणार

म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत ज्या अर्जदार उमेदवारांनी फॉर्म भरला आहे, त्यांना पालक म्हणून वर सांगितलेले लाभ आर्थिक मदत स्वरूपात दिले जाणार आहेत. यामधे केवळ मुलीसाठी लाभ मिळणार आहेत, जर मुलगा असेल तर लाभ मिळणार नाही, सोबत इतर पण काही निकष आहेत, ते मी वर Elegibility Criteria या Section मध्ये Cover केले आहे.

या नागरिकांना मिळणार महिन्याला 600 रुपये! संजय गांधी निराधार योजना महाराष्ट्र 2024

Majhi Kanya Bhagyashri Yojana Document List

  • अर्जदाराचे आधार कार्ड
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज फोटो
  • मुलीच्या आईचे किंवा मुलीचे बँक खाते पासबुक

वर सांगितलेले सर्व कागदपत्रे तुम्हाला Majhi Kanya Bhagyashri Yojana Application Form सादर करताना फॉर्म सोबत जोडायचे आहेत. या सर्व कागदपत्रांसह इतर काही कागदपत्रे देखील लागू शकतात, त्यामुळे अर्ज करताना सर्व Documents सोबत बाळगा, म्हणजे येन वेळी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही.

Majhi Kanya Bhagyashri Yojana Application Form

माझी कन्या भाग्यश्री योजनेसाठी अर्ज हा ऑफलाइन स्वरूपात सादर करायचा आहे, त्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया खालील प्रमाणे असणार आहे.

  1. सुरुवातीला तुम्हाला Majhi Kanya Bhagyashri Yojana Application Form Download करावा लागणार आहे, त्यासाठी तुम्ही वरील लिंक वर क्लिक करू शकता, तेथे योजनेचा GR आहे, त्यातून तुम्हाला शेवटी दिलेल्या फॉर्मची प्रिंट आउट काढून घ्यायची आहे.
  2. फॉर्म मध्ये जी माहिती विचारली आहे, ती सर्व माहिती काळजीपूर्वक भरून घ्यायची आहे. चूक झाली तर दुसरा फॉर्म घ्यायचा आहे, चुकीचा फॉर्म सादर करायचा नाही.
  3. फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला तुमच्या जवळील महिला आणि बाल विकास विभागाच्या कार्यालयाला भेट द्यायची आहे, तेथे अधिकाऱ्यांकडे योजनेचा फॉर्म सर्व कागदपत्रांसह सुपूर्द करायचा आहे.
  4. अधिकारी तुमचा फॉर्म Verify करतील, जर तुम्ही योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला Majhi Kanya Bhagyashri Yojana चा लाभ मिळेल.

टीप: तुम्ही अंगणवाडी कार्यालयात जाणून देखील अर्ज सादर करू शकता, अंगणवाडी सेविका किंवा कर्मचारी यांच्या मार्फत फॉर्म Verify केला जाऊ शकतो.

नवीन सरकारी योजना Scheme:

Majhi Kanya Bhagyashri Yojana FAQ

Who is eligible for Majhi Kanya Bhagyashri Yojana?

राज्यातील सर्व पालक ज्यांना एक किंवा दोन मुली आहेत, परंतु दोन पेक्षा जास्त आपत्य असतील तर मात्र अर्जदाराला फॉर्म सादर करता येणार नाही.

How to apply for Majhi Kanya Bhagyashri Yojana?

माझी कन्या भाग्यश्री योजना साठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी तुम्ही वर दिलेली अर्ज करण्याची प्रक्रिया वाचू शकता.

What is the benefits of Majhi Kanya Bhagyashri Yojana?

योजने मध्ये पात्र झालेल्या अर्जदारांना आर्थिक सहाय्य केले जाते, यामधे पालकांना एक मुलगी असेल तर 50,000 दिले जातात, आणि दोन मुली असतील तर 25-25 हजार दिले जातात.

1 thought on “Majhi Kanya Bhagyashri Yojana: मुली असतील तर मिळणार 50,000 रुपये! संधी सोडू नका, अर्ज करा”

Leave a comment