दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये मोठी बंपर भरती निघाली आहे, रेल्वे द्वारे या SECR Bharti 2024 साठी अधिकृत जाहिरात अधिसूचना देखील प्रसिद्ध केली आहे.
तब्बल 1,113 एवढ्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. रेल्वेची ही भरती 10 वी आणि ITI पास वर होणार आहे.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती ची विशेष बाब म्हणजे भरतीसाठी फॉर्म भरताना कोणतीही परीक्षा फी भरायची गरज नाहीये. अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदाची Recruitment असल्याने सर्वांना फी माफ केली आहे.
भरती साठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे, ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 मे, 2024 आहे. त्यामुळे मुदत संपण्यापूर्वी अर्ज करून टाका.
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती 2024
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत सुरू असलेली ही अप्रेंटिस भरती ही कायमस्वरूपी असणार नाही, जे उमेदवार या भरतीसाठी निवडले गेले आहेत, त्यांना ठराविक निश्चित कालावधी साठी नोकरी वर ठेवले जाईल, त्यांनतर एकदा कालावधी संपला की मग उमेदवारांना नोकरी वरून बडतर्फ केले जाणार आहे. ट्रेनिंग स्वरूपात ही भरती होणार आहे, प्रत्येक उमेदवाराला 1 वर्षासाठी नोकरी वर ठेवले जाईल.
SECR Bharti 2024 Highlights
पदाचे नाव | अप्रेंटिस |
रिक्त जागा | 1,113 |
नोकरीचे ठिकाण | रायपूर विभाग |
वेतन श्रेणी | 13,188 रुपये प्रति महिना |
वयाची अट | उमेदवाराचे वय हे 15 ते 24 वर्षे असावे. |
परीक्षा फी | कोणतीही फी भरायची नाही |
SECR Bharti 2024 Education Qualification
SECR Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता निकष हे पुढीलप्रमाणे आहेत:
- उमेदवाराचे शालेय शिक्षण हे किमान 10 वी पर्यंत झालेले असावे.
- 10 वी मध्ये बोर्ड परीक्षेत किमान 50% मार्क मिळालेले असावेत.
- उमेदवाराने संबंधित ट्रेड मध्ये ITI केलेले असावे.
थोडक्यात वर सांगितलेले सर्व निकष हे शैक्षणिक पात्रता अटी म्हणून या SECR Bharti 2024 साठी लागू करण्यात आले आहे.
SECR Bharti 2024 Application Form
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑनलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 03 एप्रिल, 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 01 मे, 2024 |
Online Application Form Process
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करायचा आहे. केवळ ऑनलाईन स्वरूपात केलेले अर्जच स्वीकारले जाणार आहेत.
सोबत जर फॉर्म भरताना कोणती चूक झाली, तर त्याची पूर्ण जबाबदारी उमेदवारांची असणार आहे. त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज भरा, घाई गरबड करू नका.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया:
- सुरुवातीला अधिकृत वेबसाईट वर जाऊन Apply Online हा पर्याय शोधा.
- त्यावर क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन फॉर्म येईल.
- तो फॉर्म तुम्हाला काळजीपूर्वक जाहिराती मध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करून भरून घ्यायचा आहे.
- जे उमेदवार SC, ST, OBC अशा मागासवर्गीय प्रवर्गातील आहेत, त्यांना चालू वर्षाचे कास्ट सर्टिफिकेट देखील अपलोड करायचे आहे.
- बाकी इतर उमेदवारांना त्यांचा फोटो आणि सही अपलोड करायची आहे.
- भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी नाहीये, त्यामुळे सर्व जण (पात्र व्यक्ती) या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
- एकदा फॉर्म भरून झाला की नंतर तो तपासून घ्यायचा आहे, मग सबमिट करायचे आहे.
SECR Bharti 2024 Important Links
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
अधिसूचना जाहिरात | डाऊनलोड करा |
ऑनलाईन अर्ज | येथून करा |
SECR Bharti 2024 Selection Process
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती साठी उमेदवारांची निवड ही मेरिट लिस्ट नुसार केली जाणार आहे. मेरिट लिस्ट ही इयत्ता 10 वी आणि ITI च्या मार्क वर अवलंबून असणार आहे.
यामधे उमेदवारांना किमान गुण मार्क हे 50 टक्के असणे गरजेचे आहे, 50% च्या वर ज्यांना मार्क आहेत, केवळ त्यांनाच या भरती अंतर्गत रिक्त पदासाठी निवडले जाणार आहे.
मेरिट लिस्ट लागल्या नंतर, उमेदवारांची मेडीकल टेस्ट घेतली जाणार आहे. सोबत त्यांचे कागदपत्रे देखील पडताळणी केली जाणार आहे. जे उमेदवार या सर्व प्रक्रियेत पास झाले आहेत त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून निवडले जाणार आहे.
नवीन भरती जॉब अपडेट:
- इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 660 जागांची मेगा भरती, लगेच येथून अर्ज करा
- SSC मार्फत ज्युनियर इंजिनिअर पदासाठी भरती! पदवी, डिप्लोमा असेल तर नोकरीची सुवर्णसंधी
SECR Bharti 2024 FAQ
How to Apply For SECR Bharti 2024?
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरायचा आहे. त्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये आपण दिली आहे.
Who is eligible for SECR Bharti 2024?
SECR Bharti 2024 साठी 10 वी पास आणि ITI उत्तीर्ण उमेदवार पात्र असणार आहेत. सोबत उमेदवारांचे वय 15 ते 24 वर्षे या वयोगटात असावे.
What is the last date for SECR Bharti 2024?
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 01 मे 2024 आहे. या तारखेच्या आत फॉर्म भरून घ्या, कारण नंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
How many vacancies are there in SECR Bharti 2024?
दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरती मध्ये एकूण 1,113 रिक्त जागा आहेत. या सर्व रिक्त जागा या केवळ एका पदासाठी असणार आहेत, ते पद म्हणजे रेल्वे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी.
2 thoughts on “दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत 10 वी आणि ITI वर अप्रेंटिस पदाची बंपर भरती! कोणतीही फी नाही | SECR Bharti 2024”