RPF Bharti Documents: RPF रेल्वे सुरक्षा दलामध्ये तब्बल 4,660 एवढ्या प्रचंड रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. कॉन्स्टेबल, सब इन्स्पेक्टर या दोन पदासाठी भरती राबवली जात आहे.
त्यामुळे तुम्ही जर या RPF भरती साठी ऑनलाईन अर्ज करण्यास इच्छुक असाल, तर तुम्हाला अर्ज कसा करायचा? याची माहिती असणे आवश्यक आहे. सोबत भरती साठी अर्ज करताना कोण कोणते कागदपत्रे आवश्यक आहेत, याची पण माहिती असणे गरजेचे आहे.
जर ही महत्वाची माहितीच तुम्हाला नसेल, तर तुम्ही RPF भरती साठी अर्ज करू शकणार नाही. अपुरे कागदपत्रे असतील, तर अर्जच पुढे जाणार नाही. त्यामुळे ही महत्वाची अशी पोस्ट आहे, कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा, आणि जे पण तुमचे मित्र RPF भरती साठी तयारी करत आहेत, त्यांना शेअर करून टाका.
RPF Bharti Documents
RPF रेल्वे सुरक्षा दल भरती साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत:
- अर्जदार व्यक्तीचे आधार कार्ड
- कास्ट सर्टिफिकेट
- वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र
- 10 वी ची मार्कशीट (गुणपत्रिका)
- 12 वी ची मार्कशीट (गुणपत्रिका)
- रहिवासी Domicile सर्टिफिकेट
- अर्जदाराची सही
- उमेदवाराचा पासपोर्ट साईज फोटो
थोडक्यात वर सांगितलेले सर्व कागदपत्रे हे उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करताना आणि कागदपत्रे पडताळणी करताना सादर करणे आवश्यक आहेत. हे कागदपत्रे Soft Copy आणि Hard Copy या दोन्ही स्वरूपात तयार ठेवायचे आहेत.
भरतीसाठी काही वेळा अधिकचे कागदपत्रे विचारले जाऊ शकतात, त्यामुळे तुम्हाला सर्व कागदपत्रे सोबत बाळगणे आवश्यक आहेत.
RPF भरतीची सविस्तर माहिती जाणून घ्या
RPF Bharti Online Form
RPF Bharti साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, केवळ ऑनलाईन माध्यमातून अर्ज करता येणार आहे. इतर कोणत्याही मार्गाने केलेले अर्ज किंवा फॉर्म हे ग्राह्य धरले जाणार नाहीत.
ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
- सुरुवातीला रेल्वे सुरक्षा दल भरतीच्या अधिकृत वेबसाईटला https://www.rrbmumbai.gov.in/ तुम्हाला भेट द्यायची आहे.
- वेबसाईट वरील होम पेज वर दिलेल्या Apply Online या Option वर क्लिक करायचे आहे.
- फॉर्म ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आवश्यक ती सर्व Personal Information भरायची आहे. सोबत तुमची शैक्षणिक पात्रता, कायमचा पत्ता आणि संपर्क क्रमांक याची माहिती पण भरून घ्यायची आहे.
- फॉर्म मध्ये विचारलेली कागदपत्रे Soft Copy स्वरूपात अपलोड करायचे आहेत, त्यांनतर परीक्षा फी भरून घ्यायची आहे.
- एकदा फॉर्म भरून झाला की मग तुम्हाला तो एकदा तपासून घ्यायचा आहे. सर्व माहिती योग्य असल्याची खात्री झाल्यावर मगच अर्ज Submit करायचा आहे.
थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही RPF Bharti Online Form अगदी सहज पणे ऑनलाईन स्वरूपात भरू शकता. जर तुम्हाला फॉर्म ऑनलाईन भरता येत नसेल, तर तुम्ही कोणत्याही Computer Center मध्ये जाऊन देखील त्यांच्या मार्फत पण RPF Bharti Form भरू शकता.
RPF Bharti Online Application हे 15 एप्रिल पासून सुरू होणार आहेत, आणि त्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. त्यामुळे तुम्ही जर या भरती साठी अर्ज करू इच्छित असाल, तर मुदत संपण्यापूर्वी फॉर्म भरून घ्या.
RPF Bharti FAQ
How to apply for RPF 2024?
RPF रेल्वे भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्याची सविस्तर माहिती वर दिली आहे.
What is the last date of RPF 2024?
RPF Bharti साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 14 मे 2024 आहे. देय तारखे आगोदर अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
When will the RPF Bharti Form Start?
RPF Bharti साठीचे ऑनलाईन फॉर्म हे दिनांक 15 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहेत.
2 thoughts on “RPF भरती साठी अर्ज कसा करायचा? आवश्यक कागदपत्रे कोणते? जाणून घ्या संपूर्ण माहिती | RPF Bharti Documents”