दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती, ITI पास नोकरीची संधी! फी नाही, लगेच अर्ज करा | SECR Bharti 2024

भारतीय दक्षिण पूर्व मध्य रेल्वेत अप्रेंटिस या पदांसाठी भरती निघाली आहे, पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन रेल्वे विभागा (SECR Bharti 2024) द्वारे करण्यात आले आहे.

रेल्वेत नोकरी करण्यासाठी ज्यांची इच्छा आहे, त्या उमेदवारांना ही एक मोठी सुवर्णसंधी आहे. यात एक विशेष बाब म्हणजे केवळ 10 वी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. 10 वी सोबत संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे.

याखेरीस दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती साठी जे उमेदवार अर्ज करणार आहेत, त्या सर्वांना फॉर्म भरण्यासाठी फी मध्ये 100% सूट देण्यात आली आहे. म्हणजे या रेल्वे भरती साठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाहीये.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये राबवण्यात आलेली ही भरती अप्रेंटिस या पदासाठी होणार आहे, त्यामुळे जे उमेदवार अप्रेंटिस पदासाठी निवडले जातील त्यांना रेल्वेमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळणार नाही.

अप्रेंटिस पदावर केवळ मर्यादित कालावधीसाठी निवड केलेल्या उमेदवारांना ठेवले जाणार आहे. बाकी जेव्हा उमेदवारांचा कार्यकाळ संपेल तेव्हा त्यांना अप्रेंटिस पदावरून काढले जाणार आहे.

प्रशिक्षणार्थी म्हणून उमेदवार निवडले जाणार आहेत, त्यामुळे त्यांना केवळ 1 वर्षासाठी रेल्वेत काम करता येणार आहे. या कालावधीमध्ये प्रशिक्षण कार्यकाळात रास्त पगार देखील दिला जाणार आहे.

SECR Bharti 2024 Highlights

पदाचे नावअप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
रिक्त जागा733
नोकरीचे ठिकाणबिलासपूर विभाग (छत्तीसगड)
वेतन श्रेणी84,000 रुपये प्रति महिना (वेतन श्रेणी बदलू शकते)
वयाची अट15 ते 24 वर्षे
परीक्षा फीकोणतीही फी नाही

SECR Bharti 2024 Educational Qualification

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे भरतीसाठी रेल्वे विभागाद्वारे शैक्षणिक पात्रता निकष जारी केले आहेत. यामध्ये वर सांगितल्याप्रमाणे उमेदवार हा किमान दहावी पास असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदार उमेदवाराने संबंधित ट्रेड मधून ITI कोर्स केलेला असणे देखील गरजेचे आहे.

  • 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण
  • संबंधित ट्रेड मध्ये ITI उत्तीर्ण

ITI ट्रेड Wise Vacancy

ITI ट्रेडरिक्त जागा
Carpenter 38
COPA (75 Divn.+25 HQ/Const)100
Draftsman (Civil)10
Electrician 137
Elect. (Mech.)05
Fitter187
Machinist 04
Painter 42
Plumber25
Mech (RAC)15
SMW04
Steno (English) (12 Divn.+15 HQ/Const.)27
Steno (Hindi) (04 Divn.+ 15HQ/Const.)19
Diesel Mechanic 12
Turner 04
Welder18
Wireman 80
Chemical Laboratory Assistant 04
Digital Photographer (00 Divn.+ 02 HQ)02
Total733

SECR Bharti 2024 Age Limit

रेल्वे भरतीसाठी उमेदवाराचे वय हे किमान 15 वर्षे असणे आवश्यक आहे, जास्तीत जास्त वय हे 24 असावे. मागासवर्गीय उमेदवारांना त्यांच्या कास्ट नुसार वयोमर्यादा निकषांमध्ये सूट देण्यात आली आहे.

SC प्रवर्गातील उमेदवारांना05 वर्षांची सूट 15 ते 29 वर्षे
ST प्रवर्गातील उमेदवारांना05 वर्षांची सूट 15 ते 29 वर्षे
OBC प्रवर्गातील उमेदवारांना03 वर्षांची सूट 15 ते 27 वर्षे

SECR Bharti 2024 Application Form

अर्ज करण्याची प्रक्रियाऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख12 मार्च, 2024
अर्ज बंद होण्याची तारीख12 एप्रिल, 2024

Online Application Process

रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सुरू झाले आहेत, उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवरून फॉर्म भरायचा आहे. कोणत्याही स्वरूपाचे हार्ड कॉपी पोस्टद्वारे पाठवण्याची गरज नाही.

भरतीसाठी अर्ज करण्यास जी उमेदवारी इच्छुक आहेत त्यांना खाली दिलेल्या Important Links Section मधून येथून अर्ज करा या लिंक वर क्लिक करायचे आहे.

तुमच्या समोर एक वेबसाईट ओपन होईल, तेथे तुम्हाला अप्रेंटिस भरतीसाठी Apply Online हा पर्याय शोधायचा आहे, आणि त्यानंतर Apply online या Option वर क्लिक करायचे आहे.

फॉर्ममध्ये जी माहिती विचारली आहे ती संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. माहिती तंतोतंत असावी, कोणत्याही स्वरूपाची चुकीची माहिती द्यायची नाहीये.

त्यानंतर एकदा का तुमचा फॉर्म भरून झाला की तुम्ही, रेल्वे अप्रेंटिस भरतीचा अर्ज सबमिट करू शकता. भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी आकारली जाणार नाही, त्यामुळे एक प्रकारे उमेदवारांना याचा फायदा होणार आहे.

टीप: दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती ही छत्तीसगड बिलासपूर विभगासाठी राबवली जात आहे, त्यामुळे देशातील सर्व पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. महाराष्ट्रातील उमेदवार देखील रेल्वे अप्रेंटिस भरती साठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत.

SECR Bharti 2024 Important Links

अधिकृत संकेतस्थळभेट द्या
अधिसूचना जाहिरातडाऊनलोड करा
ऑनलाईन अर्जयेथून करा

SECR Bharti 2024 Selection Process

रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी उमेदवाराची निवड ही मेरिट लिस्ट नुसार केली जाणार आहे, म्हणजे उमेदवारांना इयत्ता दहावी आणि संबंधित आयटीआय ट्रेड मध्ये किती मार्क मिळाले आहेत त्यानुसार लिस्ट लागणार आहे.

ज्या उमेदवारांची नावे मेरिट लिस्ट मध्ये येतील, त्यांना अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी या पदासाठी दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागात नोकरीसाठी निवडले जाईल.

मेरिट लिस्ट लागलेल्या उमेदवारांची मेडिकल तपासणी देखील होणार आहे. मेडिकल तपासणी मध्ये जर एखादा उमेदवार अपात्र झाला, तर त्याला रिक्त पदांसाठी निवडले जाणार नाही.

नवीन जॉब भरती अपडेट:

SECR Bharti 2024 FAQ

How to Apply For SECR Bharti 2024?

ऑनलाईन स्वरूपात अर्ज करायचा आहे, फॉर्म भरणे चालू झाले आहे. अर्ज कसा करायचा याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.

What is the last date for SECR Bharti 2024?

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल, 2024 आहे.

Who is eligible for SECR Bharti 2024?

ज्या उमेदवारांनी किमान 10 वी पर्यंत शिक्षण घेतले आहे, आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI केला आहे त्यांना या रेल्वे अप्रेंटिस भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.

11 thoughts on “दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अप्रेंटिस भरती, ITI पास नोकरीची संधी! फी नाही, लगेच अर्ज करा | SECR Bharti 2024”

Leave a comment