पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये PCMC Teacher Bharti साठी Recruitment निघाली आहे. जर तुम्ही 12 वी पास असाल, किंवा तुमचे B.Sc किंवा B.Ed झाले असेल तर तुमच्या साठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे.
एकूण रिक्त जागा या 327 आहेत, यामधे रिक्त जागांसाठी सहायक शिक्षक आणि पदवीधर शिक्षक असे दोन पद असणार आहेत. मराठी, उर्दू आणि हिंदी या तीन भाषा विषयासाठी शिक्षकांची नियुक्ती या भरती द्वारे केली जाणार आहे.
पदा नुसार शैक्षणिक पात्रता निकष हे भिन्न आहेत, वर सांगितल्या प्रमाणे पहिल्या पदासाठी उमेदवार हा HSC म्हणजेच 12 वी उत्तीर्ण असावा, तसेच सोबत उमेदवाराने D.Ed केलेले असावे. दुसऱ्या पदासाठी देखील उमेदवार हा HSC पास असावा, तसेच उमेदवाराने D.Ed केले असावे. त्याच बरोबर या व्यतिरिक्त उमेदवार हा B.Sc पास आणि D.Ed उत्तीर्ण असेल तरीही तो या भरतीसाठी पात्र ठरू शकतो.
PCMC Teacher Bharti साठी उमेदवारांना ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा नाही, या भरतीसाठी केवळ ऑफलाईन अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज हा जाहिराती मध्ये दिलेला आहे, तो तुम्हाला अधिकृत पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष रित्या जमा करायचा आहे. अर्ज हा 1 एप्रिल पासून सादर करायचा आहे, 16 एप्रिल 2024 ही अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती 2024
पिंपरी चिंचवड महानगरपालिका मध्ये कंत्राटी तत्वावर ही शिक्षक भरती होणार आहे, केवळ 11 महिने नोकरी असणार आहे. त्यानंतर उमेदवार कायमस्वरूपी शिक्षक पदावर नोकरी करू शकणार नाही.
PCMC Teacher Bharti Vacancy Details
पदाचे नाव | रिक्त जागा |
---|---|
सहायक शिक्षक | 189 |
पदवीधर शिक्षक | 138 |
एकूण | 327 जागा |
PCMC Teacher Bharti साठी निघालेले वरील दोन्ही पद हे मराठी, हिंदी आणि उर्दू या भाषा विषयासाठी असणार आहेत.
PCMC Teacher Bharti Educational Qualification
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
---|---|
सहायक शिक्षक | 12 वी (HSC) आणि D.Ed |
पदवीधर शिक्षक | 12 वी (HSC) आणि D.Ed Or B.Sc आणि D.Ed |
भरतीसाठी पदा नुसार शैक्षणिक पात्रता ही तेवढी भिन्न नाही, केवळ पहिल्या पदासाठी उमेदवार हा 12 वी पास आणि D.Ed उत्तीर्ण असला पाहिजे, बाकी दुसऱ्या पदामधे या पहिल्या पदाच्या निकाषा प्रमाणेच शैक्षणिक पात्रता आहे, परंतु यात एक अधिक बाब आहे, ती म्हणजे या दुसऱ्या पदासाठी उमेदवार हा जर B.Sc पास असेल आणि D.Ed उत्तीर्ण असेल तरीही तो पात्र असणार आहे.
PCMC Teacher Bharti Application Form
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाईन |
अर्ज सुरू होण्याची तारीख | 1 एप्रिल, 2024 |
अर्ज बंद होण्याची तारीख | 16 एप्रिल, 2024 |
अर्ज करण्याचा पत्ता | जुने ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील नगरपालिका, प्राथमिक शाळा – पिंपरीगाव |
Offline Application Process
- सुरुवातीला जाहिरात डाऊनलोड करून घ्या, त्यातून शेवटी दिलेल्या फॉर्मची प्रिंट आउट काढून घ्या.
- फॉर्म मध्ये सर्व माहिती भरून घ्या, खाडाखोड करू नका, झाली तर दुसरी प्रत घेऊन त्यावर फॉर्म भरा.
- फॉर्म सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडा, Document हे Hard Copy मध्ये असावेत.
- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिक्षक भरतीसाठी कोणत्याही स्वरूपाची परीक्षा फी भरायची नाहीये, सर्वांना सूट आहे.
- शेवटी फॉर्म भरून झाल्यावर, कागदपत्रे जोडून भरतीचा फॉर्म अधिकृत पत्त्यावर पोस्टाने किंवा प्रत्यक्ष रित्या जाऊन जमा करा.
PCMC Teacher Bharti Important Links
अधिकृत संकेतस्थळ | भेट द्या |
जाहिरात आणि फॉर्म | डाऊनलोड करा |
PCMC Teacher Bharti Selection Process
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये शिक्षक भरतीसाठी उमेदवारांची निवड ही Test घेऊन किंवा Interview द्वारे होणार आहे. यासंबंधी माहिती तुम्ही अधिकृत जाहिरात वाचून मिळवू शकता, किंवा तुम्ही जर अर्ज सादर केला असेल तर तुमच्या मोबाईल वर किंवा इमेल वर ही माहिती पाठवली जाऊ शकते.
नवीन भरती जॉब अपडेट:
- राष्ट्रीय रेडिओ खगोलभौतिकी केंद्रात भरती सुरू! कोणतीही फी नाही, मोठी संधी, अर्ज करा
- ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये ऑफीसर पदासाठी भरती सुरू! B. com पास असाल, तर संधी
PCMC Teacher Bharti FAQ
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती आहेत?
एकूण रिक्त जागा या 327 आहेत, ज्या मुळात दोन पदासाठी असणार आहेत.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका शिक्षक भरती अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे?
उमेदवारांना ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा, जाहिराती मध्ये दिलेल्या फॉर्मची प्रिंट काढून तो फॉर्म अधिकृत पत्त्यावर पाठवायचा आहे.
पिंपरी चिंचवड शिक्षक भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख ही 16 एप्रिल, 2024 आहे, अर्ज हे 1 एप्रिल पासून सुरू होणार आहेत.
1 thought on “12 वी, B.Sc, B.Ed पास असाल, तर शिक्षक होण्याची संधी! लगेच अर्ज करा | PCMC Teacher Bharti 2024”