Maratha SEBC Caste Certificate: नमस्कार मित्रांनो, आजच्या या आर्टिकल मध्ये मी तुम्हाला मराठा SEBC प्रमाणपत्र कसे काढायचे याची प्रोसेस सांगणार आहे. जर तुम्ही पोलीस भरती किंवा इतर कोणत्या भरती साठी तयारी करत असाल, तर तुमच्या साठी हे SEBC प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
मराठा समाजाला या SEBC प्रवर्गाद्वारे 10 टक्के आरक्षण दिले गेले आहे, त्याचा मोठा फायदा हा येणाऱ्या पोलीस भरती मध्ये होणार आहे. त्यामुळे हे आर्टिकल काळजीपूर्वक वाचा, आणि मराठा SEBC प्रमाणपत्र कसे काढायचे? याची प्रोसेस समजून घ्या.
टीप: अद्याप मराठा SEBC Caste Certificate साठी अर्ज सुरु झाले नाहीत, कायदा अजून मंजूर झालेला नाहीये, त्यामुळे तुम्हाला सध्या तरी कास्ट सर्टिफिकेट मिळणार नाही. कोणत्याही शासनाच्या वेबसाईट वर याची अधिकृत माहिती आलेली नाही. जेव्हा अपडेट येईल तेव्हा आम्ही तुम्हाला या पोस्ट द्वारे कळवू.
Maratha SEBC Caste Certificate
मराठा SEBC सर्टिफिकेट ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन मार्गाने काढता येते. यामधे सर्वात जास्त वेळ हा ऑनलाईन स्वरूपात अर्ज केल्यावर लागतो. परंतु जर तुम्ही ऑफलाईन स्वरूपात अर्ज केला तर मात्र काही त्यापेक्षा कमी कालावधी मध्ये SEBC सर्टिफिकेट मिळते.
ऑनलाईन स्वरूपात अर्ज हा आपले सरकार पोर्टल वरून करता येतो, सोबतच महा ई सेवा केंद्र तसेच सेतू वरून देखील कास्ट सर्टिफिकेट साठी ऑनलाईन फॉर्म सादर करता येतो.
ऑनलाईन अर्ज सादर केल्यावर अर्ज केल्यापासून पुढील 45 दिवसात तुम्हाला तुमचे SEBC कास्ट सर्टिफिकेट मिळते. एकदा अर्ज मान्य झाला की तुम्ही तुमचे कास्ट सर्टिफिकेट Download करून घेऊ शकता.
ऑफलाईन स्वरूपात अर्ज करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जाऊन अर्ज करावा लागेल, तहसील कार्यालयात गेल्यावर तेथील अधिकाऱ्यांना तुम्ही कास्ट सर्टिफिकेट साठी कोणती प्रोसेस करावी लागते, हे पण विचारू शकता.
ऑफलाईन स्वरूपात तहसील कार्यालयातून अर्ज सादर केल्यावर अर्ज केल्यापासून 15 दिवसांच्या आत तुम्हाला तुमचा SEBC कास्ट सर्टिफिकेट मिळते.
How to Apply for Maratha SEBC Caste Certificate Online
मराठा कास्ट सर्टिफिकेट साठी तुम्हाला सर्वात पहिल्यांदा आपले सरकार या पोर्टलवर जावे लागेल. तिथे गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
नोंदणी करताना सर्वप्रथम तुम्हाला तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्यांनतर विचारलेली सर्व महत्वाची माहिती टाकून, आपली नोंदणी करून घ्यायची आहे.
नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला Aaple सरकार पोर्टल वर लॉगिन करायचे आहे. लॉगिन केल्यानंतर तुम्हाला सर्व्हिसेस मध्ये Revenue Department शोधायचे आहे. आणि त्यावर क्लिक करायचे आहे.
मग Revenue Department मध्ये असलेल्या सर्व्हिसेस मध्ये Cast Certificate ही Service निवडायची आहे. मग त्यावर क्लिक करायचे आहे, तेथे तुम्हाला SEBC प्रवर्गासाठी Cast Certificate चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल, त्यात SEBC Cast Certificate साठी फॉर्म दिलेला असेल, तो अर्ज तुम्हाला भरून घ्यायचा आहे. त्यात आवश्यक ती सर्व माहिती काळजीपूर्वक टाकायची आहे.
माहिती टाकून झाल्यावर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे फॉर्म भरताना अपलोड करायचे आहेत. कागदपत्रे अपलोड करताना दिलेल्या सूचनांचे पालन करायचे आहे, योग्य Size आणि Ratio मध्ये डॉक्युमेंट अपलोड करणे आवश्यक आहे, नाहीतर कागदपत्रे फॉर्म साठी स्वीकारले जाणार नाहीत.
कागदपत्रे अपलोड केल्यावर तुम्हाला पुढील आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करून घ्यायची आहे, आणि मग फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करून SEBC Certificate चा Online Form Submit करून टाका.
थोडक्यात अशा प्रकारे तुम्ही अगदी सहजपणे तुमचा मराठा जातीचा SEBC दाखला ऑनलाईन काढू शकता.
How to Apply for Maratha SEBC Caste Certificate Offline
ऑफलाईन स्वरूपात देखील तुम्ही Maratha SEBC Caste Certificate साठी अर्ज सादर करू शकता. त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात जावे लागेल, आणि तेथे ऑफलाईन स्वरूपात अर्ज करावा लागेल.
तुम्ही Cast Certificate चा फॉर्म कोणत्याही ई सेवा केंद्रातून मिळवू शकता. फॉर्म ची प्रिंट घेऊन तो फॉर्म भरून घ्या, मग फॉर्म ला आवश्यक ते सर्व कागदपत्रे जोडून घ्या.
त्यानंतर तहसील कार्यालयात तहसीलदारांकडे हा SEBC Form सबमिट करा. तहसील कार्यालया द्वारे तुमचा फॉर्मची पडताळणी केली जाईल, जर तुम्ही मराठा जातीचे असाल, तर तुम्हाला नवीन शासन निर्णया नुसार SEBC Cast Certificate दिले जाईल. ज्यामुळे तुम्ही 10% आरक्षणाचा फायदा घेऊ शकाल.
तहसील कार्यालयातून एकदा तुमचा फॉर्म Approved झाला की मग अर्ज केल्यापासून पुढील 15 दिवसाच्या आत तुमचे Cast Certificate येईल.
अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन आणि ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून तुमचा Maratha SEBC Cast Certificate अर्ज सादर करून जातीचा दाखला मिळवू शकता.
Maratha SEBC Certificate FAQ
SEBC Cast Certificate साठी कोण पात्र आहे?
महाराष्ट्र राज्यातील मराठा जातीचे लोक, ज्यांना कुणबी किंवा इतर कोणत्याही जातीचा लाभ मिळत नाही.
SEBC Cast Certificate साठी अर्ज कसा करायचा?
ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोन मार्गाने अर्ज करता येतो, त्याची सविस्तर माहिती लेखामध्ये दिली आहे.
SEBC Cast Certificate कसे Download करायचे?
ऑनलाईन स्वरूपात अर्ज केल्यावर तुमचा अर्ज मान्य झाल्यास Cast Certificate ची PDF येईल, तेव्हा तुम्ही तुमचे SEBC Cast Certificate Download करू शकता.
जुने SEBC Cast Certificate पोलीस भरती साठी जमेल का?
नाही, तुम्हाला नवीनच Cast Certificate काढावे लागेल. जुने प्रमाणपत्र भरती साठी अथवा कोणत्याही शासकीय कामासाठी चालणार नाही.