Captive Market Yojana Maharashtra: मित्रांनो महाराष्ट्र शासनाने एक मोठी अभिनव अशी योजना सुरू केली आहे, त्यानुसार आता राज्यातील सर्व महिलांना रेशन दुकानातून मोफत साडी मिळणार आहे.
सणासुदीला उत्सवाला या योजने द्वारे महिलांना नवी कोरी साडी मिळणार आहे. पूर्णपणे मोफत स्वरूपात ही योजना राबवली जाणार आहे, कोणत्याही स्वरूपाचे पैसे घेतले जाणार नाहीत.
सर्व महिलांना प्रत्येकी एक अशी साडी दिली जाणार आहे. या योजनेची सुरुवात राज्य शासनाच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाद्वारे केली जाणार आहे.
नवीन एकात्मिक शाश्वत वस्त्रोद्योग धोरण अंतर्गत ही मोफत साडी योजना राबवली जाणार आहे. योजनेला Captive Market Yojana असे नाव देण्यात आले आहे.
Captive Market Yojana संबंधी सविस्तर अशी माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, त्यामुळे captive Market योजने साठी कोण पात्र असणार? लाभ कसा मिळणार? अशी सर्व महत्त्वाची माहिती आपण या लेखामध्ये पाहणार आहोत.
Captive Market Yojana Maharashtra
योजनेचे नाव | Captive Market Yojana |
सुरुवात | महाराष्ट्र शासन (सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाद्वारे) |
उद्देश | महिलांना मोफत साडी देणे. |
लाभ | प्रत्येक पात्र कुटंबातील महिलांना मोफत साडी |
लाभार्थी | महाराष्ट्रातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबातील महिला |
Captive Market Yojana Benifits (लाभ आणि फायदे)
Captive Market मोफत साडी योजना द्वारे राज्य शासन लाभार्थी महिलांना मोठा फायदा करून देणार आहे. त्यानुसार वेगवेगळे लाभ मिळणार आहेत, त्यातील मुख्य स्वरूपात दिले जाणारे लाभ आणि फायदे पुढीलप्रमाणे.
- राज्यातील अंत्योदय शिधापत्रिका धारक कुटुंबातील महिलांना मोफत साडी देणे.
- या योजनेअंतर्गत सण समारंभ साठी गरीब कुटुंबातील महिलांना नवी कोरी साडी मिळते.
- यामुळे जे गरीब कुटुंबातील महिला आहेत, त्यांना एक रुपया पण खर्च न करता फ्री मध्ये साडी भेटते, त्यामुळे त्यांचा साडी साठी होणारा खर्च कमी होऊ शकतो.
- ही मोफत साडी वर्षातून एकदा दिले जाणार आहे, प्रत्येकी वर्षी साडी मिळणार असून महिला त्यांचा फायदा घेऊ शकणार आहेत.
- 2024 ते 2028 असे एकूण 5 वर्षे ही मोफत साडी योजना राबवली जाणार आहे, म्हणजे या 5 वर्षात एकूण 5 साड्या मोफत स्वरूपात रेशन दुकानातून मिळणार आहेत.
Captive Market Yojana Qualification Details (पात्रता निकष, अटी)
Captive Market Yojana साठी ज्या महिलांना लाभ मिळणार आहे, त्यांच्या साठी काही निकष दिले गेले आहेत. ज्या महिला या सर्व निकषांत येतील, त्यांना मोफत साडी योजनेचा लाभ मिळणार आहे.
- मोफत साडी मिळवण्यासाठी अर्जदार लाभार्थी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- महिलेचे कुटुंब हे गरीब मध्यमवर्गीय प्रवर्गातील असावे.
- तसेच कुटुंबाकडे अंत्योदय शिधापत्रिका असावी, म्हणजे कुटुंब अंत्योदय शिधापत्रिका धारक असावे.
- अंत्योदय शिधापत्रिका मध्ये पिवळे रेशनकार्ड येते, त्यामुळे ज्यांच्या कडे पिवळे रेशनकार्ड आहे, अशा सर्व कुटुंबातील महिला फ्री साडी योजना साठी पात्र असणार आहेत.
Captive Market Yojana GR (शासन निर्णय)
Captive Market Yojana साठी राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णय GR प्रसिध्द केला आहे, त्यानुसार ही योजना लागू होणार आहे.
जर तुम्ही अंत्योदय शिधापत्रिका धारक असाल, आणि तुम्हाला तुमच्या कुटुंबातील महिलांसाठी फ्री मध्ये साडी हवी असेल तर हा Captive Market Yojana GR नक्की वाचा.
जेणेकरून तुम्हाला योजने संबंधी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मदत होईल, आणि तुम्ही या Captive Market Yojana साठी खऱ्या अर्थाने पात्र आहात की नाही. हे जाणून घेता येईल.
Captive Market Yojana Application Form (अर्ज सादर करण्याची प्रक्रिया)
Captive Market Yojana साठी कोणत्याही स्वरूपाची अर्ज करण्याची गरज नाही. तुम्ही जर अंत्योदय शिधापत्रिका धारक असाल तर जेव्हा योजना अधिकृत रीत्या सुरू होऊन, मोफत साडी वाटप केले जाईल. तेव्हा तुम्हाला तुमच्या गावातील रेशन दुकानातून ही साडी मिळणार आहे.
मोफत साडी योजना साठी कोणत्याही स्वरूपाचे अर्ज किंवा फॉर्म भरायची गरज नाही. त्यामुळे काळजी करू नका, कोणताही फॉर्म भरायचा नाहीये, तुम्ही जर पात्र अंत्योदय शिधापत्रिका धारक असाल, तर तुमच्या साठी तुमच्या कुटुंबातील महिलांना रेशन दुकानातून मोफत साडी दिली जाईल.
सरकारी योजना:
- ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, OBC प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळणार 60,000 रू
- कुसुम सोलार पंप योजना, मोठा फायदा! लगेच अर्ज करा Kusum Solar Pump Yojana
- प्रधानमंत्री कर्ज योजना महाराष्ट्र, 50 लाख मिळणार! अर्ज करा PMEGP Loan Yojana 2024
Captive Market Yojana FAQ
Captive Market Yojana साठी कोणत्या महिला पात्र आहेत?
ज्या कुटुंबाकडे अंत्योदय शिधापत्रिका आहे, किंवा पिवळे रेशनकार्ड आहे त्या कुटुंबातील महिला या योजनेसाठी पात्र असणार आहेत.
Captive Market Yojana अंतर्गत कोणते लाभ मिळणार आहेत?
Captive Market योजने अंतर्गत महिलांना दरवर्षी मोफत साडी मिळणार आहे.
मोफत साडी योजने साठी अर्ज कसा करायचा?
योजने साठी पात्र असणाऱ्या महिलांना त्यांच्या जवळील रेशन दुकानातून साडी मिळणार आहे. कोणताही अर्ज सादर करायची आवश्यकता नाही.
मोफत साडी योजने साठी किती वर्षा साठी असणार आहे?
मोफत साडी योजना हि २०२४ ते २०२८ पर्यंत चालू असणार आहे, म्हणजे एकूण 5 वर्षे महिलांना मोफत फ्री मध्ये साडी मिळणार आहे.