असिस्टंट पदासाठी 10 वी पास वर नोकरी! फॉर्म सुरू, गोवा शिपयार्ड भरती | Goa Shipyard Bharti 2024

नमस्कार मित्रांनो, आजच्या या आर्टिकल मध्ये आपण Goa Shipyard Bharti संबंधित सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. गोवा शिपयार्ड मध्ये जबरदस्त भरती निघाली आहे, तुम्ही जर या भरती साठी इच्छुक असाल तर त्वरित अर्ज करून टाका.

विशेष बाब म्हणजे गोवा शिपयार्ड भरती ही दहावी पास वर होणार आहे, जर उमेदवार पदवीधर असतील किंवा उमेदवाराने आयटीआय केला असेल, तर त्यांना या गोवा शिपयार्ड असिस्टंट भरतीसाठी प्राधान्य असणार आहे.

एकूण 18 पदांसाठी ही शिपयार्ड भरती होणार आहे, या 18 पदांसाठी तब्बल 106 रिक्त जागा काढण्यात आल्या आहेत. त्यानुसारच गोवा शिपयार्ड असिस्टंट भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

उमेदवारांना या भरतीसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, इतर कोणत्याही स्वरूपात सादर केलेला अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे काळजीपूर्वक ऑनलाईन माध्यमातून अर्ज करायचा आहे.

ऑनलाइन स्वरूपात अर्ज सादर करण्याची शेवटची 27 मार्च, 2024 असणार आहे. मुदत केवळ एवढ्याच दिवसांची भेटणार आहे, तारीख वाढेल या संभ्रमात राहू नका. भरतीसाठी इच्छुक असाल तर लगेच अर्ज करून टाका.

Goa Shipyard Bharti 2024 ची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, यात तुम्हाला भरतीसाठी कोण पात्र आहे? अर्ज कसा करायचा? अशी महत्वाची माहिती मिळणार आहे. त्यामुळे वेळ घालू नका आर्टिकल सविस्तर वाचून घ्या, आणि फॉर्म भरा.

Goa Shipyard Bharti 2024

📢 भरतीचे नाव – Goa Shipyard Bharti

✅ पदाचे नाव – एकूण पद हे 18 आहेत, या सर्व पदांसाठी भरती राबवली जात आहे.

पदाचे नावपद संख्या
असिस्टंट सुपरिडेंटेंड (HR)02
असिस्टंट सुपरिडेंटेंड (Hindi Translator)01
असिस्टंट सुपरिडेंटेंड (CS)01
टेक्निकल असिस्टंट (Electrical)04
टेक्निकल असिस्टंट (Instrumentation)01
टेक्निकल असिस्टंट (Mechanical)04
टेक्निकल असिस्टंट (Shipbuilding)20
टेक्निकल असिस्टंट (Civil)01
टेक्निकल असिस्टंट (IT)01
ऑफिस असिस्टंट (Clerical Staff)32
ऑफिस असिस्टंट (Finance/IA)06
पेंटर20
व्हेईकल ड्राइव्हर05
रेकॉर्ड कीपर03
कुक (Delhi office)01
कुक02
प्लंबर01
सेफ्टी स्टुअर्ड01
Total106

🚩 एकूण रिक्त जागा – 106 Vacancy

👨‍🎓 शैक्षणिक पात्रता – पदानुसार शैक्षणिक पात्रता निकष हे वेगवेगळे आहेत, साधारण पणे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहेत, त्यांचे शिक्षण हे किमान 10 वी पर्यंत झालेले असावे. तसेच उमेदवार हा पदवीधर, ITI पास किंवा डिप्लोमा धारक असावा.

पद क्र.1: उमेदवार हा पदवीधर असावा, आणि त्याच्या कडे किमान 05 वर्षांचा अनुभव असावा.

पद क्र.2: उमेदवार पदवीधर असावा सोबत त्याने पदवी परीक्षा इंग्रजी सह हिंदी मध्ये केली असावी, ट्रांसलेशन डिप्लोमा झालेला असावा आणि किमान 2 वर्षांचा अनुभव असावा.

पद क्र.3: उमेदवार पदवीधर असावा, Inter Company Secretary (CS) आणि किमान 02 वर्षे अनुभव

पद क्र.4 ते 9: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Instrumentation/ Mechanical/ Shipbuilding/ Civil/IT) केलेला असावा, आणि 2 वर्षांचा अनुभव असावा.

पद क्र.10: कोणत्याही शाखेतील पदवी असावी, कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोणताही मान्यताप्राप्त कोर्स केला असावा, आणि 04 वर्ष अनुभव असावा.

पद क्र.11: B.Com पदवी असावी, कॉम्प्युटर संबंधित किमान 01 वर्षाचा कोर्स केला असावा, आणि किमान 01 वर्ष अनुभव घेतलेला असावा.

पद क्र.12: 10वी उत्तीर्ण आणि 05 वर्षे अनुभव

पद क्र.13: 10वी उत्तीर्ण, अवजड वाहन चालक परवाना आणि 05 वर्षे अनुभव

पद क्र.14: 10वी उत्तीर्ण, कॉम्प्युटर संबंधित किमान 06 महिन्यांचा कोर्स आणि 01 वर्ष अनुभव

पद क्र.15: 10वी उत्तीर्ण आणि 05 वर्षे अनुभव

पद क्र.16: 10वी उत्तीर्ण आणि 02 वर्षे अनुभव

पद क्र.17: ITI (प्लंबर) आणि 05 वर्षे अनुभव

पद क्र.18: 10वी उत्तीर्ण आणि डिप्लोमा (Industrial Safety/Fire & Safety/ Safety Management)

➡️ नोकरीची ठिकाण – गोवा, मुंबई आणि दिल्ली

💰 पगार – 45,158 रुपये प्रति महिना वेतन

💵 परीक्षा फी – Open, OBC साठी 200 रुपये फी भरायची आहे, तर बाकी सर्व प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा फी माफ असणार आहे.

📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन

🔞 वयोमर्यादा – 18 ते 33, 36 वर्षे 

📍 वयोमर्यादा सूट – SC, ST प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट देण्यात आली आहे. तर OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षांची सूट आहे.

📆 फॉर्मची Last Date – 27 मार्च, 2024 

🌐 अधिकृत संकेतस्थळgoashipyard.in
🖥️ जाहिरात (अधिसूचना)PDF Download करा
📝 ऑनलाईन अर्जयेथून Apply करा

Goa Shipyard Bharti Apply online (अर्ज प्रक्रिया)

गोवा शिपयार्ड असिस्टंट भरतीसाठी फॉर्म सुरू झाले आहेत, ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करायचे आहेत.

Shipyard विभागाद्वारे या भरतीसाठी अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे, केवळ या संकेतस्थळावर सादर केलेले अर्ज स्वीकारले जाणार आहेत. 

जर उमेदवार इतर मार्गाद्वारे अर्ज सादर केला तर त्याचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, त्यामुळे तुम्ही जर Serious असाल, तर योग्य रित्या अर्ज सादर करा.

अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाईन संकेतस्थळावर जायचे आहे, तिथे गेल्यानंतर गोवा shipyard भरतीसाठी अर्ज दिसेल तो फॉर्म Open करायचा आहे.

दिलेल्या फॉर्ममध्ये आवश्यक ती सर्व माहिती भरून घ्यायची आहे, माहिती अचूक असावी, चुकीची माहिती आढळल्यास कारवाई होऊ शकते त्यामुळे काळजी घ्यायची आहे.

सूचनेनुसार फॉर्म भरून झाल्यावर, भरतीसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे फॉर्ममध्ये अपलोड करायचे आहेत. त्यानंतर परीक्षेसाठी फी देखील भरायची आहे, OBC आणि Open साठी केवळ फी असणार आहे, बाकी सर्वांना सूट आहे.

फी भरल्यानंतर संपूर्ण अर्ज एकदा तपासून घ्यायचा आहे, एखाद्या चुकी आढळल्या तर त्या दुरुस्त करायच्या आहेत. त्यानंतर फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे.

अशा तऱ्हेने तुमचा भरतीचा फॉर्म गोवा शिपयार्ड भरतीसाठी विभागाकडे सादर होईल. त्यानंतर पुढील माहिती तुम्हाला कळवली जाईल, त्यानुसार तुम्ही परीक्षा आणि इतर बाबी साठी तयारी करू शकता.

नवीन भरती जॉब:

Goa Shipyard Bharti FAQ

गोवा शिपयार्ड भरतीसाठी एकूण किती रिक्त जागा आहेत?

एकूण रिक्त जागा या 106 आहेत, ज्या ऑनलाईन माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

गोवा शिपयार्ड भरतीसाठी अर्ज कसा करायचा?

अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे, तुम्ही अधिकृत वेबसाईट वरून फॉर्म भरू शकता.

गोवा शिपयार्ड भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?

27 मार्च, 2024 ही गोवा शिपयार्ड भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे, यानंतर कोणाचेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

7 thoughts on “असिस्टंट पदासाठी 10 वी पास वर नोकरी! फॉर्म सुरू, गोवा शिपयार्ड भरती | Goa Shipyard Bharti 2024”

Leave a comment