AIIMS Nursing Officer Bharti: नमस्कार मित्रांनो, अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer) या पदासाठी भरती निघाली आहे.
विशेष म्हणजे म्हणजे B.Sc पास जे उमेदवार आहेत त्यांना या भरती अंतर्गत नोकरी मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही जर B.Sc पास असाल, तर वेळ घालू नका लगेच AIIMS Nursing Officer Bharti साठी अर्ज सादर करा.
नर्सिंग ऑफिसर भरती साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी AIIMS म्हणजेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे द्वारे अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे, तेथून ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे.
या भरतीसाठी अधिकृत जाहिरात (अधिसूचना) देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे, त्यामुळे जे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू इच्छित आहेत त्यांना विनंती आहे, कृपया अर्ज करण्यापूर्वी एकदा भरतीची जाहिरात वाचून घ्या.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नर्सिंग ऑफिसर भरती संबंधी सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे, त्यामुळे भरती साठी प्रत्यक्ष अर्ज सादर करण्यापूर्वी या लेखामधील सर्व माहिती एकदा काळजीपूर्वक वाचून घ्या. जेणेकरून तुम्हाला फॉर्म भरताना अडचण येणार नाही.
AIIMS Nursing Officer Bharti 2024
📢 भरतीचे नाव – AIIMS Nursing Officer Bharti
✅ पदाचे नाव – (नर्सिंग ऑफिसर) Nursing Officer
🚩 एकूण रिक्त जागा – अद्याप रिक्त जागा सांगितल्या नाहीत, त्यामुळे जेव्हा अपडेट येईल तेव्हा येथे माहिती दिली जाईल.
👨🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा B.Sc उत्तीर्ण असावा, तसेच त्याने नर्सिंग डिप्लोमा केलेला असावा. सोबत 50 बेड हॉस्पीटल मध्ये 2 वर्ष कामाचा अनुभव असावा.
➡️ नोकरीची ठिकाण – संपूर्ण भारत
💰 पगार – 34,800 रुपये प्रति महिना वेतन श्रेणी
💵 परीक्षा फी –
- General, OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी 3,000 रुपये परीक्षा फी भरायची आहे.
- SC, ST, EWS प्रवर्गातील उमेदवारांसाठी 2,400 रुपये परीक्षा फी भरायची आहे.
- PWD प्रवर्गातील उमेदवारांना फी भरायची नाही, त्यांना फी मध्ये सूट आहे.
📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
🔞 वयोमर्यादा – उमेदवाराचे वय हे 18 ते 30 वर्षे असावे.
📍 वयोमर्यादा सूट –
SC, ST प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा सूट ही 05 वर्षांची आहे. म्हणजे या उमेदवारांसाठी वयाची अट ही 18 ते 35 वर्षे असणार आहे.
OBC प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा सूट ही 03 वर्षांची असणार आहे, म्हणजे वयाची अट ही 18 ते 33 वर्षे असणार आहे.
📆 फॉर्मची Last Date – 17 मार्च, 2024
🌐 अधिकृत संकेतस्थळ | aiims.edu |
🖥️ जाहिरात (अधिसूचना) | PDF Download करा |
📝 ऑनलाईन अर्ज | येथून सादर करा |
AIIMS Nursing Officer Bharti Qualification Details (शैक्षणीक पात्रता निकष)
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये भरती निघाली आहे त्यासाठी संस्थेद्वारे पात्रता निकष जारी केले आहेत. पात्रता निकष शैक्षणिक स्वरूपाचे आहेत, जे उमेदवार या पात्रता निकषा अंतर्गत येतील केवळ त्यांनाच या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे.
नर्सिंग ऑफिसर ची भरती बीएससी पास वर होणार आहे, म्हणजे या भरतीसाठी उमेदवाराचे शिक्षण हे किमान B.Sc पदवीधर असावे.
B.Sc पदवी सोबतच उमेदवाराने नर्सिंगशी निगडित काही डिप्लोमा कोर्स केलेले असावे, B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ अशी शैक्षणिक पात्रता असणार आहे.
शैक्षणिक पात्रतेनुसारच उमेदवाराने हॉस्पिटलमध्ये काम करून नर्सिंग कामाचा अनुभव देखील घेतलेला असावा. उमेदवाराने 50 बेड असलेल्या हॉस्पीटल मध्ये किमान 2 वर्षे काम केलेले असावे. 2 वर्षांचा अनुभव असेल तरच उमेदवार भरती साठी पात्र होणार आहेत.
AIIMS Nursing Officer Bharti Apply online (ऑनलाईन अर्ज कसा करावा?)
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये नर्सिंग ऑफिसर या पदासाठी भरती निघाली आहे, पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीचे सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी अर्ज सुरू झाले आहेत, फॉर्म हे ऑनलाईन स्वरूपात भरायचे आहेत.
नर्सिंग ऑफिसर पदासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे, त्यासाठी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थे द्वारे अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे.
त्याची लिंक वर दिली आहे, तुम्ही Apply Online या लिंक वर क्लिक करून अधिकृत वेबसाईट वर जाऊ शकता. वेबसाईट चा URL हा norcet6.aiimsexams.ac.in असा आहे.
अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला AIIMS Nursing Officer Apply online हा Option शोधायचा आहे, त्यांनतर या पर्यायावर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यावर तुमच्या समोर अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था नर्सिंग ऑफिसर भरती चा फॉर्म Open होईल.
भरतीचा फॉर्म ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या फॉर्ममध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे, माहिती ही अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे, जर चुकीची माहिती आढळली तर तुमचा अर्ज बाद होऊ शकतो त्यामुळे काळजी घ्यायची आहे.
भरतीच्या अर्जासोबतच आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे हे Size आणि Ratio मध्ये योग्य असावेत, त्यासाठी तुम्ही जाहिराती मध्ये दिलेल्या सूचना वाचू शकता.
कागदपत्रे अपलोड केल्यानंतर भरतीसाठी परीक्षा फी भरायची आहे, जे उमेदवार परीक्षा फी भरणार नाहीत, त्यांचा अर्ज पुढे जाणार नाही, त्यामुळे फी भरणे अनिवार्य आहे.
भरतीसाठी परीक्षा फी ही कास्ट नुसार तसेच प्रवर्गानुसार वेगवेगळी असणार आहे. Open आणि OBC प्रवर्गासाठी 3000 रुपये फी भरायची आहे, तर SC, ST, EWS प्रवर्गासाठी 2400 रुपये फी भरणे आवश्यक आहे, या उमेदवारांना 600 रुपये फी मध्ये सूट असणार आहे. तसेच PWD प्रवर्गातील उमेदवारांना फी मध्ये पूर्णपणे सूट देण्यात आली आहे.
परीक्षा फी भरून झाल्यावर भरतीचा फॉर्म एकदा तपासून घ्यायचा आहे, चूक कोणती झाली असेल तर ती दुरुस्त करायची आहे. एकदा अर्ज सबमिट केला की तो नंतर Edit करता येणार नाही, त्यामुळे काळजी घ्यायची आहे.
फॉर्म तपासून झाल्यावर शेवटी फॉर्म खाली दिलेल्या सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे, अशा प्रकारे तुमचा फॉर्म अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेमध्ये नर्सिंग ऑफिसर पदासाठी सादर केला जाईल.
नवीन भरती अपडेट:
- महाराष्ट्र पोलीस भरती जाहिरात प्रसिद्ध! लगेच अर्ज करा, संधी सोडू नका
- 10 वी, 12 वी पास वर नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल 2049 रिक्त जागा, अर्ज करा
AIIMS Nursing Officer Bharti FAQ
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती साठी किती जागा रिक्त आहेत?
अद्याप रिक्त जागा किती आहेत, याची माहिती जारी करण्यात आलेली नाही. माहिती आल्यास आम्ही अपडेट करू.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती साठी अर्ज कसा करायचा?
अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन स्वरूपाची आहे, लेखामध्ये त्याची सविस्तर माहिती दिली आहे.
अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था भरती साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती?
भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 17 मार्च, 2024 आहे.
1 thought on “अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत B.Sc पास वर भरती सुरू! नोकरीची सुवर्णसंधी, अर्ज करा | AIIMS Nursing Officer Bharti 2024”