Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana: नमस्कार मित्रांनो, आजच्या या आर्टिकल मध्ये आपण बांधकाम कामगार पहिला विवाह योजना याबद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
बांधकाम कामगार पहिला विवाह योजनेद्वारे कामगाराच्या लग्नासाठी तब्बल 30,000 रुपये शासनाद्वारे दिले जातात. या योजनेचा लाभ कसा घ्यायचा? कोण पात्र असणार? अर्ज कसा करायचा? अशी सर्व माहिती आपण पाहणार आहोत.
जर तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी या अगोदर अर्ज सादर केला असेल, तर तुम्हाला तुमच्या विवाहासाठी शासनाद्वारे बांधकाम कामगार विभागांतर्गत आर्थिक मदत केली जाणार आहे.
Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana
योजनेचे नाव | Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana |
उद्देश | बांधकाम कामगाराच्या लग्नासाठी आर्थिक सहायता करणे. |
सुरुवात | महाराष्ट्र शासन |
लाभ | नोंदीत बांधकाम कामगारांना त्यांच्या पहिल्या लग्नासाठी तब्बल 30,000 हजार रुपये दिले जाणार आहेत. |
लाभार्थी | बांधकाम कामगार योजने साठी अर्ज केलेले अविवाहित उमेदवार |
अधिकृत संकेतस्थळ | mahabocw.in |
Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana Qualification Criteria (पात्रता निकष)
बांधकाम कामगारांना त्यांच्या विवाहासाठी शासनाद्वारे मोठी आर्थिक मदत केली जाते, परंतु ही आर्थिक मदत योग्य लोकांना मिळावी यासाठी काही पात्रता निकष शासनाद्वारे ठरवण्यात आले आहेत. त्यानुसार जे उमेदवार हे सर्व पात्रता निकष पूर्ण करतील केवळ अशाच उमेदवारांना विवाह अनुदान योजनेचा लाभ मिळणार आहे.
बांधकाम कामगार पहिला विवाह योजना साठी उमेदवार हा नोंदीत बांधकाम कामगार असावा, त्याने बांधकाम कामगार योजनेसाठी अर्ज केलेला असावा, तसेच त्याच्या कडे बांधकाम कामगार कार्ड असावे.
विवाह अनुदान योजनेचा लाभ केवळ नोंदीत अविवाहित कामगारांना मिळणार आहे, जे बांधकाम कामगार अगोदरच विवाहित आहेत त्यांना या योजनेचा लाभ भेटणार नाही.
जर बांधकाम कामगार दुसरे लग्न करत असेल तर, अशावेळी बांधकाम कामगाराला त्याच्या विवाहासाठी बांधकाम कामगार पहिला विवाह योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळणार नाही. कारण महाराष्ट्र शासना द्वारे केवळ पहिल्या विवाहासाठी आर्थिक मदत केली जाते.
Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana Benifits (लाभ, फायदे)
बांधकाम कामगार योजना अंतर्गत ज्या उपयोजना राबवल्या जातात त्यामधीलच ही विवाह अनुदान योजना आहे. या योजनेद्वारे नोंदीत बांधकाम कामगारांना लग्नासाठी पैसे दिले जातात.
कामगारांना त्यांच्या लग्नासाठी आर्थिक मदत मिळवायची असेल, तर त्यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केल्यावर कामगाराच्या बँक खात्यावर थेट DBT द्वारे पहिल्या लग्नासाठी पैसे जमा केले जातात.
बांधकाम कामगार विवाह योजना अंतर्गत नोंदीत कामगाराच्या पहिल्या विवाहाच्या खर्चा साठी एकूण 30,000 रुपये एवढी आर्थिक सहाय्यता केली जाते. ज्याद्वारे कामगार त्याचे लग्न चंगल्या प्रकारे करू शकेल.
Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana Documents (आवश्यक कागदपत्रे)
बांधकाम कामगार पहिला विवाह योजनेसाठी अर्ज करताना कामगारांना आवश्यक ते सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. कागदपत्रांची लिस्ट खाली दिली आहे, त्यानुसार सर्व कागदपत्रे फॉर्म सोबत जोडायचे आहेत आणि त्यानंतरच अर्ज सादर करायचा आहे.
बांधकाम कामगार विवाह योजना आवश्यक कागदपत्रे:
- बांधकाम कामगाराचे आधार कार्ड
- बांधकाम कामगाराचे पॅन कार्ड
- विवाह झाल्याचा पुरावा म्हणून Marrige Certificate विवाह प्रमाणपत्र
- कामगाराचा पहिला विवाह असल्याचे प्रमाणपत्र लेखी
- महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र
- कामगाराचा कायमस्वरूपी रहिवासी पत्ता Address
- किमान कामगाराने 90 दिवस बांधकामाचे काम केल्याचे प्रमाणपत्र
- कामगाराने काम केलेल्या बांधकाम ठिकाणचा पत्ता
- कामगाराची ई-मेल आयडी
- ग्रामपंचायती कडून किंवा ग्रामसेवकाकडून तुम्ही बांधकाम कामगार असल्याचे लेखी प्रमाणपत्र
- कामगाराचा मोबाईल नंबर (आधार लिंक असावे)
- योजनेसाठी नोंदणी अर्ज
- पासपोर्ट साईज फोटो (3)
- बँकेचे पासबुक (आधार तसेच मोबाईल लिंक असावे)
- कामगाराचे जन्म प्रमाणपत्र (शाळा सोडल्याचा दाखला)
- बांधकाम कामगाराचे स्व घोषणापत्र
Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana Application Form (अर्ज कसा करावा?)
बांधकाम कामगार पहिला विवाह योजनेसाठी उमेदवारांना अर्ज सादर करणे आवश्यक आहे त्याशिवाय योजनेचा फायदा मिळणार नाही.
बांधकाम कामगार विवाह योजना साठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन या दोन्ही माध्यमातून अर्ज सादर करता येतो, कामगार त्यांच्या मोबाईलवरून पण अधिकृत वेबसाईटवरून विवाह अनुदान योजनेचा फॉर्म भरू शकतो.
त्यासोबतच बांधकाम कामगार विभाग कार्यालयामध्ये जाऊन देखील कामगारांना विवाह अनुदान योजनेसाठी अर्ज सादर करता येतो. ऑफलाईन स्वरूपात सादर करताना वर सांगितलेले सर्व कागदपत्र सोबत जोडावे लागतात.
बांधकाम कामगारांना या विवाह योजनेचा फायदा केवळ पहिल्या लग्नासाठी होणार आहे, त्यामुळे जर तुम्ही पहिलेच लग्न करत असाल तरच या योजनेसाठी अर्ज सादर करा. आणि जर तुम्ही दुसऱ्या लग्न करत असाल आणि तुमची इच्छा आहे तुम्हाला पण या विवाह योजनेअंतर्गत आर्थिक मदत मिळावी. पण हे शक्य नाही, जरी तुम्ही अर्ज सादर केला तरी तो बांधकाम कामगार विभागाद्वारे अर्ज बाद केला जातो.
तसेच चुकीची माहिती दिल्यामुळे काही वेळा तुमचे बांधकाम कामगार नोंदणी देखील रद्द केली जाऊ शकते. त्यामुळे काळजी घ्यायची आहे, आणि जर तुम्ही योजनेसाठी अपात्र असाल तर अर्ज करायचा नाही.
ऑफलाईन स्वरूपात अर्ज कसा करावा?
बांधकाम कामगार पहिला विवाह योजनेसाठी ऑफलाइन स्वरूपात अर्ज सादर करणे अगदी सोपे आहे, कामगारांना केवळ या योजनेसाठी चा फॉर्म अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यायचा आहे.
फॉर्म डाउनलोड केल्यावर तो प्रिंट आउट काढून घ्यायचा आहे, त्यानंतर फॉर्म मध्ये दिलेली सर्व माहिती काळजीपूर्वक भरायची आहे. कोणत्याही स्वरूपाची चूक करायचे नाही.
फॉर्म भरून झाल्यावर वर सांगितल्याप्रमाणे आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्म ला जोडायचे आहेत. कागदपत्रे हे Hard Copy स्वरूपात असावेत, कारण फॉर्म सोबत ते द्यावे लागणार आहेत.
एकदा तुम्ही बांधकाम कामगार कार्यालयात तुमचा अर्ज सादर केला की, कार्यालय अधिकाऱ्याद्वारे तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला पहिल्या विवाहासाठी आर्थिक मदत केली जाईल.
ऑनलाईन अर्ज कसा करावा?
बांधकाम कामगार पहिला विवाह योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात देखील अर्ज सादर करता येतो, तुम्हाला यासाठी फक्त अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे.
अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana ही Scheme शोधायची आहे. आणि तेथील Apply Online या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
तुमच्या समोर एक फॉर्म येईल, तो तुम्हाला काळजीपुर्वक भरून घ्यायचा आहे. आणि आवश्यक ते सर्व कागदपत्रे फॉर्म मध्ये अपलोड करायचे आहेत. अशा प्रकारे तुम्ही ऑनलाइन स्वरूपात देखील या विवाह अनुदान योजनेसाठी पण अर्ज सादर करू शकता.
ऑनलाईन स्वरूपात अर्ज करण्याची आणखी एक पद्धत आहे, ती म्हणजे गावोगावी जी बांधकाम कामगार मेळावे घेतले जातात तेथील प्रतिनिधींना विचारून या योजनेसाठी तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
Bandhkam Kamgar Pahila Vivah Yojana FAQ
बांधकाम कामगार पहिला विवाह योजनेसाठी कोण पात्र आहे?
या योजनेसाठी नोंदीत बांधकाम कामगार पात्र असणार आहेत.
बांधकाम कामगार पहिला विवाह योजने अंतर्गत किती रुपये मिळतात?
पहिल्या लग्नासाठी एकूण 30,000 रुपये आर्थिक मदत केली जाणार आहे.
बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
या योजनेसाठी उमेदवार या दोन्ही माध्यमातून अर्ज सादर करू शकतात, त्याची सविस्तर माहिती या लेखामध्ये आपण दिली आहे.