Stand Up India Scheme: नमस्कार मित्रांनो, आजच्या आर्टिकल मध्ये आपण Stand Up India Yojana बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
तसेच या योजनेसाठी कोण पात्र असणार? लाभ काय मिळणार? अर्जासाठी कोणते कागदपत्रे लागणार? फॉर्म कसा भरायचा? अशी सर्व महत्त्वाची माहिती देखील या लेखामध्ये आपण पाहणार आहोत.
Stand Up India Scheme ची विशेष बाब म्हणजे जो व्यक्ती व्यवसाय सुरू करत आहे त्याला भांडवल उपलब्ध करून देणे आणि व्यवसाय वाढावा यासाठी कमी व्याज दरात कर्ज पुरवठा करणे.
Stand Up India ही अभिनव अशी योजना केंद्र सरकार चालवते, ज्याद्वारे गरीबांना पण व्यवसाय क्षेत्रात येण्यास मदत केली जाते. या योजने अंतर्गत तब्बल 1 करोड पर्यंत कर्ज देखील मिळू शकते, या कर्जाचा वापर करून व्यक्ती त्यांचा व्यवसाय कैक पटीने वाढवू शकतो.
Stand Up India Scheme 2024
योजनेचे नाव | Stand Up India Scheme |
सुरुवात | केंद्र सरकार द्वारे करण्यात आली |
उद्देश | देशातील गरीब लोकांना उद्योग करण्यासाठी आर्थिक मदत करणे |
लाभ | तब्बल 1 करोड पर्यंत चे कर्ज मिळते |
लाभार्थी | देशातील अनुसूचित जाती जमाती आणि महिला |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | standupmitra.in |
Stand Up India Scheme Qualification Criteria (योजनेसाठी पात्रता निकष)
स्टँड अप इंडिया योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्र शासनाने काही पात्रता निकष ठरवले आहेत, त्या नुसार केवळ उमेदवारालाच या Stand Up India Scheme चा फायदा घेता येणार आहे.
पात्रता निकषात जे उमेदवार येतील ते Stand Up India द्वारे कोणत्याही बँकेतून कर्ज घेऊ शकतात. निकष हे जास्त कठोर नाहीत, पण ज्या अटी दिल्या आहेत त्यांचे पालन करणे मात्र अनिवार्य आहे.
Stand Up India Scheme साठीचे पात्रता निकष:
- अर्जदार व्यक्ती हा किमान 18 वर्षांचा किंवा त्यापेक्षा जास्त वयाचा असावा.
- अर्जदाराने सुरू केलेली कंपनी किंवा व्यवसाय हा Private किंवा LLP अथवा भागीदारी फर्म असावी.
- अर्जदाराच्या व्यवसायाची वार्षिक उलाढाल ही 25 कोटी पेक्षा जास्त नसावी.
- Stand Up India Scheme साठी केवळ (SC, ST) अनुसूचित जाती, जमाती किंवा महिला पात्र असणार आहेत.
- Open किंवा इतर प्रवर्गातील उमेदवारांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
अपवादात्मक परिस्थितीत या योजनेचा लाभ इतर प्रवर्गातील उमेदवारांना घेता येतो, तो म्हणजे कंपनी किंवा व्यवसायात महिला किंवा SC, ST प्रवर्गातील उमेदवारांची भागीदारी ही सर्वात जास्त असावी. किंवा व्यवसायिक तिच्या पत्नीच्या नावे देखील Stand Up India Scheme चा लाभ मिळवू शकतो.
Stand Up India Scheme Benifits (लाभ, फायदे)
स्टँड अप इंडिया योजनेमध्ये पात्र लाभार्थ्यांना वेगवेगळे लाभ तसेच फायदे मिळतात, ज्याद्वारे त्यांना त्यांचा व्यवसाय वाढवता येतो सोबतच व्यासायची वृध्दी करता येते.
- स्टँड अप इंडिया योजनेद्वारे सर्वात मोठा फायदा तो म्हणजे गरीब तसेच मध्यमवर्गीय व्यक्तींना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळते.
- या योजनेअंतर्गत व्यवसाय सुरू करण्यासाठी तब्बल 10 लाख रुपये ते 1 कोटी रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते.
- कर्ज परतफेडची मुदत ही 7 वर्षांची आहे, त्यामुळे व्यवसायिक कर्ज फेडीची चिंता न करता चांगल्या प्रकारे व्यवसाय वाढवू शकतो.
- सुरुवातीला Stand Up India द्वारे व्यवसाय कसा करायचा? याचे प्रशिक्षण देखील दिले जाते, सोबतच पुढील 2 वर्षांसाठी स्टार्ट अप मध्ये मदत केली जाते.
Stand Up India Scheme Document List (आवश्यक कागदपत्रे)
स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्जदाराला बरेचशे कागदपत्रे गोळा करावे लागतात, सर्व कागदपत्रे असतील तरच या कर्ज योजनेचा फायदा घेता येतो.
स्टँड अप इंडिया योजनेसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे:
- अर्जदाराचे ओळखपत्र आधार कार्ड किंवा इतर डॉक्युमेंट
- Address Proof (कंपनी किंवा व्यवसायाचा)
- अर्जदाराचे रहिवासी प्रमाणपत्र
- अर्जदार बँक खाते पासबुक
- कंपनी किंवा व्यवसायाचा आयकर अहवाल
- अर्जदाराचे कास्ट सर्टिफिकेट (SC, ST)
- व्यवसायाचा प्रकल्प अहवाल
याशिवाय बरेच कागदपत्रे या योजनेसाठी लागू असतात, कागदपत्रे व्यवसाय आणि कंपनीच्या कामानुसार ठरवले जातात. तसेच व्यवसायासाठी किती कर्ज घ्यायचे आहे त्यानुसार देखील कागदपत्रे बदलतात.
त्यामुळे तुम्हाला स्टॅन्ड अप इंडिया या योजनेसाठी अर्ज करण्यापूर्वी तुमच्या व्यवसायासाठी, तसेच तुमच्यासाठी कोणकोणते कागदपत्रे लागू असणार आहेत याची माहिती मिळवायची आहे. ही माहिती तुम्ही अधिकृत वेबसाईट वरून मिळवू शकता.
Stand Up India Scheme Apply Online (अर्ज कसा करावा?)
स्टँड अप इंडिया योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येतो, त्यासाठी केंद्र सरकारने अधिकृत संकेतस्थळ देखील सुरू केले आहे.
योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन आहे, त्यामुळे सुरुवातीला उमेदवारांना अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची आहे. त्यासाठी तुम्ही येथे क्लिक करू शकता.
अधिकृत संकेतस्थळावर पोहोचल्यानंतर तुम्हाला सूचनेनुसार पहिल्यांदा संकेतस्थळावर तुमची नोंदणी करून घ्यायची आहे.
नोंदणी पूर्ण झाल्यावर तुम्हाला लॉगिन करायचा आहे, त्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म उघडेल फॉर्म तुम्हाला सुरुवातीला काळजीपूर्वकरीत्या वाचून घ्यायचा आहे.
फॉर्म वाचल्यानंतर आवश्यक अशी सर्व माहिती त्या फॉर्ममध्ये भरायची आहे, माहिती भरल्यानंतर ती माहिती योग्य असल्याची खात्री करायची आहे. कारण तुमच्या फॉर्मची विभागाद्वारे पडताळणी केली जाणार आहे.
आवश्यक असे सर्व कागदपत्रे देखील फॉर्म सोबत अपलोड करायचे आहेत, कागदपत्रे हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी या दोन्ही स्वरूपात तयार करून ठेवायचे आहेत.
त्यानंतर सूचनेनुसार स्टँड अप इंडिया योजनेसाठी चा फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला सबमिट या बटणावर क्लिक करायचे आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा अर्ज Stand Up India Scheme साठी सादर करू शकता.
Stand Up India Scheme FAQ
स्टँड अप इंडिया योजनेसाठी कोण पात्र असणार?
स्टँड अप इंडिया योजनेसाठी देशातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती तसेच सर्व महिला पात्र असणार आहेत.
स्टँड अप इंडिया योजने अंतर्गत कोणता लाभ मिळणार आहेत?
योजनेअंतर्गत पात्र उमेदवारांना तब्बल 25 लाख ते एक करोड रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे.
स्टँड अप इंडिया योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून अर्ज सादर करता येतो.