Bandhkam Kamgar Vivah Yojana: नमस्कार मित्रांनो, आजच्या या आर्टिकल मध्ये आपण बांधकाम कामगार विवाह योजने बद्दल सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत. बांधकाम कामगाराच्या मुलींना त्यांचे लग्न करण्यासाठी तब्बल 51,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे. मोठी अभिनव अशी योजना आहे, ज्यामुळे नक्कीच बांधकाम कामगारांना मोठा फायदा होणार आहे.
गरीब मध्यमवर्गीय जे लोक असतात त्यांना जर मुलगी असेल तर त्यांना नेहमी तिच्या लग्नाची चिंता असते, आणि त्यासाठी ते आयुष्यभर धडपड करत असतात, पैसे गोळा करून आपल्या लेकीच्या लग्नासाठी ते वापरावेत असा त्यांचा हेतू असतो, पण बऱ्याच वेळा हे शक्य होत नाही, ही बाब ओळखूनच शासनाने ही महत्वाची अशी नवीन योजना सुरू केली आहे.
बांधकाम कामगार विवाह योजने द्वारे कामगारांच्या मुलींच्या लग्नासाठी जब्बर मदत होणार असल्याने ही एक भारी गोष्ट आहे. जर तुम्ही बांधकाम कामगार असाल तर तुमच्या लाडक्या लेकी साठी या योजनेत नक्की सामील व्हा, आणि आर्थिक मदत मिळवा.
Bandhkam Kamgar Vivah Yojana
योजनेचे नाव | Bandhkam Kamgar Vivah Yojana |
सुरुवात | महाराष्ट्र शासन |
उद्देश | बांधकाम कामगाराच्या मुलींना लग्नासाठी आर्थिक मदत करणे. |
लाभ | लग्नासाठी 51,000 रुपये एवढी आर्थिक मदत केली जाते. |
लाभार्थी | बांधकाम कामगार योजनेतील कामगाराच्या मुली. |
अर्ज पद्धत | ऑफलाईन |
अधिकृत संकेतस्थळ | mahabocw.in |
Bandhkam Kamgar Vivah Yojana Qualification Details
बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी राज्य सरकारने बांधकाम विभागांतर्गत काही पात्रता निकष ठरवले आहेत, त्यानुसार बांधकाम कामगाराच्या मुलींना लग्नासाठी मोठी मदत केली जाणार आहे. बांधकाम कामगार विवाह योजना पात्रता निकष हे पुढीलप्रमाणे आहेत.
- बांधकाम कामगार विवाह योजनेचा फायदा केवळ नोंदीत बांधकाम कामगारांच्या मुलींना मिळणार आहे.
- बांधकाम कामगाराला जर दोन मुली असतील तर वडील मुलीच्या लग्नासाठीच मदत मिळेल, म्हणजे केवळ एका मुलीच्या लग्नासाठी अनुदान दिले जाईल.
- अर्जदार कामगाराची मुलगी अठरा वर्षापेक्षा जास्त वयाची नसावी, केवळ मुलीच्या 18 व्या वर्षा पर्यंत या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
- अर्जदार मुलीचे शिक्षण हे किमान 10 वी पर्यंत झालेले असावे, मुलगी जर 9 वी किंवा त्यापेक्षा कमी शिकली असेल किंवा मध्येच शिक्षण सोडून दिले असेल तर या योजनेचा लाभ मिळणार नाही.
Bandhkam Kamgar Vivah Yojana Benifits
बांधकाम कामगार योजना विवाह Scheme अंतर्गत कामगाराच्या मुलींच्या लग्नासाठी भरभक्कम रक्कम ही आर्थिक मदत स्वरूपात दिली जाते. याचा फायदा हा मोठा आहे, याबद्दल सविस्तर खाली वाचता येईल.
कामगाराच्या मुलींना लग्नासाठी 51,000 हजार रुपये एवढी आर्थिक मदत अनुदान स्वरूपात केली जाते. या अनुदानाची रक्कम हि DBT द्वारे अर्जदाराच्या बँक खात्यामध्ये जमा केली जाते, म्हणजे रक्कम हि मुलीच्या बँक खात्यावर जमा केली जाईल किंवा मुलीच्या पालकांच्या म्हणजेच बांधकाम कामगारांच्या बँक खात्यावर जमा केली जाईल.
Bandhkam Kamgar Vivah Yojana Documents
बांधकाम कामगार विवाह योजनेचा फायदा घेण्यासाठी उमेदवाराला आवश्यक ते सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य आहे. त्याची लिस्ट ही पुढीलप्रमाणे.
विवाह योजनेचा फायदा घेण्यासाठी मुलीचे कागदपत्रे त्यासोबतच मुलीच्या पालकांचे म्हणजे मुलीच्या वडिलांचे देखील कागदपत्रे सादर करावे लागतात.
मुलीचे कागदपत्रे
- विवाह प्रमाणपत्र
- मुलीचा वयाचा पुरावा
- अर्जदार मुलगी हि बांधकाम कामगाराची मुलगी असल्याचा पुरावा
मुलीच्या पालकांचे कागदपत्रे
- कामगाराचे आधार कार्ड
- पॅन कार्ड
- रहिवाशी प्रमाणपत्र
- काम करत असलेल्या बांधकामाचा पत्ता
- नोंदणी अर्ज
- पासपोर्ट फोटो 3
- बँकचे पासबुक
- जन्म प्रमाणपत्र (शाळेची TC)
- मागील वर्षात किमान 90 दिवस काम केल्याचे प्रमाणपत्र
- ग्रापंचायती मार्फत बांधकाम कामगार असल्याचे प्रमाणपत्र
- स्वतः चे घोषणापत्र
यासोबतच इतर काही कागदपत्र देखील लागू शकतात, याची खात्री करण्यासाठी तुम्ही अर्ज सादर करताना आवश्यक असे कोण कोणते डॉक्युमेंट आहेत त्याची लिस्ट पाहून घ्या.
Bandhkam Kamgar Vivah Yojana Application Form
बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन स्वरूपाची आहे, उमेदवारांना त्यांचा अर्ज हा ऑफलाईन स्वरूपात कार्यालयात जाऊन जमा करावा लागतो. त्याची प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे.
सुरुवातीला तुम्हाला Bandhkam Kamgar Vivah Yojana Application Form घेऊन त्यावर विचारलेली सर्व माहिती भरावी लागणार आहे. हा फॉर्म तुम्ही ऑनलाईन सेंटर वर किंवा झेरॉक्स दुकानावर मिळवू शकता, किंवा त्याची प्रत अधिकृत वेबसाईट वरून पण Download करू शकता.
एकदा का तुम्हाला फॉर्म मिळाला, का तुम्हाला तो काळजीपूर्वक भरून घ्यायचा आहे. अर्जामध्ये कोणतीही चूक अपेक्षित नाही त्यामुळे काळजी घ्यायची आहे.
योजनेच्या फॉर्म सोबत वर सांगितलेले सर्व आवश्यक कागदपत्रे देखील जोडायचे आहेत, हे सर्व कागदपत्रे Hard Copy मध्ये झेरॉक्स प्रती स्वरूपात असावेत. कोणकोणते कागदपत्रे लागणार याची Final खात्री तुम्ही कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारून करू शकता.
तयार फॉर्म तुम्हाला सर्व Important Documents सहित बांधकाम विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे. किंवा हा फॉर्म तुम्ही बांधकाम कामगार योजनेसाठी करण्यात येणाऱ्या मेळाव्यात पण सादर करू शकता.
Bandhkam Kamgar Vivah Yojana FAQ
बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी कोण पात्र आहे?
नोंदीत बांधकाम कामगाराच्या मुली या योजनेसाठी पात्र आहेत.
बांधकाम कामगार विवाह योजनेअंतर्गत कोणते लाभ मिळणार?
मुलींच्या लग्नासाठी तब्बल 51,000 रुपयांची आर्थिक मदत या बांधकाम कामगार विवाह योजने द्वारे मिळते.
बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी अर्ज कसा करायचा?
बांधकाम कामगार विवाह योजनेसाठी ऑफलाईन स्वरूपात अर्ज सादर करता येतो, त्याची सविस्तर माहिती वर लेखामध्ये दिली आहे.
1 thought on “मुलीच्या लग्नासाठी मिळणार 51,000 रुपये! जाणून घ्या माहिती | Bandhkam Kamgar Vivah Yojana”