India Post GDS Result 2026: भारतीय डाक विभागाने GDS Online Engagement Schedule-II, July 2026 अंतर्गत महाराष्ट्र सर्कलची पहिली मेरिट लिस्ट (List-1) जाहीर केली आहे. देशभरात एकूण 23,757 जागांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या लिस्टमध्ये ग्रामीण डाक सेवक (GDS) भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची नावे प्रसिद्ध करण्यात आली आहेत. उमेदवार अधिकृत PDF डाउनलोड करून आपला Registration Number तपासू शकतात.
ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना Document Verification (DV) साठी संबंधित विभागीय कार्यालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
ज्यांचे नाव पहिल्या लिस्टमध्ये आले नाही त्यांनी निराश होऊ नये. पहिल्या लिस्टचे DV पूर्ण झाल्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी दुसरी मेरिट लिस्ट जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व उमेदवारांनी अधिकृत अपडेट्ससाठी आपल्याशी कनेक्टेड रहा.
India Post GDS Result 2026 – थोडक्यात माहिती
India Post GDS Result 2026 भारतीय पोस्ट विभागामार्फत GDS Online Engagement Schedule-II, July 2026 अंतर्गत ग्रामीण डाक सेवक भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. या भरतीत कोणतीही लेखी परीक्षा किंवा Interview नव्हता. उमेदवारांची निवड पूर्णपणे 10वीच्या गुणांच्या मेरिटच्या आधारे करण्यात आली आहे.
| घटक | तपशील |
|---|---|
| भरती संस्था | भारतीय डाक विभाग (India Post) |
| भरतीचे नाव | GDS Online Engagement Schedule-II, July 2026 |
| एकूण जागा (देशभर) | 23,757 |
| निकालाचा प्रकार | पहिली मेरिट लिस्ट (List-1) |
| निवडीचा आधार | 10वीचे गुण (Merit) |
| पुढील टप्पा | Document Verification (DV) |
| DV शेवटची तारीख | 27 ऑक्टोबर 2026 |
| अधिकृत वेबसाइट | indiapost.gov.in |
भरती अंतर्गत पदे
- Branch Postmaster (BPM)
- Assistant Branch Postmaster (ABPM)
- Dak Sevak
महाराष्ट्र सर्कलमधील विविध Division आणि Post Office साठी ही निवड करण्यात आली आहे.
India Post GDS Result 2026: DV साठी महत्वाची सूचना
GDS Result मध्ये निवड झालेल्या उमेदवारांनी Document Verification (DV) साठी ज्या Division मध्ये निवड झाली आहे, त्या संबंधित विभागीय कार्यालयात (Divisional Office) उपस्थित राहणे आवश्यक आहे.
महत्वाच्या सूचना
👉 उमेदवारांनी मूळ कागदपत्रे आणि सर्व कागदपत्रांचे 2 फोटो कॉपी सेट सोबत आणणे आवश्यक आहे.
👉 संबंधित Division Office मध्ये जाऊन कागदपत्रांची पडताळणी करावी.
⚠️ 27 ऑक्टोबर 2026 पर्यंत Document Verification पूर्ण करणे आवश्यक आहे.
❗ जर दिलेल्या तारखेपर्यंत कागदपत्र पडताळणी केली नाही तर उमेदवारी रद्द होऊ शकते.
DV साठी लागणारी कागदपत्रे
✔️ 10वीची मूळ मार्कशीट
✔️ जात प्रमाणपत्र (लागू असल्यास)
✔️ EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
✔️ PwBD प्रमाणपत्र (लागू असल्यास)
✔️ संगणक ज्ञान प्रमाणपत्र (Computer Certificate)
✔️ ओळखपत्र (आधार कार्ड)
✔️ अर्जाची प्रिंट
👉 कागदपत्र पडताळणीनंतर Medical Fitness तपासणी होते आणि त्यानंतरच अंतिम नियुक्ती दिली जाते.
India Post GDS Result 2026: मेरिट लिस्ट कशी तपासावी?
उमेदवार खालील स्टेप्स फॉलो करून आपला निकाल तपासू शकतात.
1️⃣ अधिकृत India Post GDS वेबसाइटला भेट द्या.
2️⃣ “Shortlisted Candidates” विभागात जा.
3️⃣ “GDS Online Engagement Schedule-II, July 2026 – Maharashtra Circle List-1” या लिंकवर क्लिक करा.
4️⃣ Result PDF डाउनलोड करा.
5️⃣ PDF मध्ये Ctrl + F करून आपला Registration Number शोधा.
6️⃣ नाव असल्यास आपण पुढील प्रक्रियेसाठी पात्र आहात.
⚠️ सोशल मीडियावरील फेक लिंकवर विश्वास ठेवू नका. PDF वर “Schedule-II, July-2026” आणि “Maharashtra Circle” लिहिलेले आहे का ते नक्की तपासा.
India Post GDS Result 2026: महत्त्वाच्या लिंक्स
| अधिकृत वेबसाइट | इथे क्लिक करा |
| पहिली मेरिट लिस्ट (महाराष्ट्र) | इथे क्लिक करा |
| पहिली मेरिट लिस्ट (इतर राज्य) | इथे क्लिक करा |
| दुसरी मेरिट लिस्ट | लवकरच उपलब्ध होईल |
| व्हॉट्सअॅप ग्रुप (अपडेटसाठी) | येथे क्लिक करा |
India Post GDS Result 2026: FAQs
India Post GDS Result 2026 जाहीर झाला आहे का?
हो, Schedule-II July 2026 अंतर्गत पहिली मेरिट लिस्ट जाहीर झाली आहे.
या भरतीत एकूण किती जागा आहेत?
देशभरात एकूण 23,757 जागांसाठी ही भरती आहे.
निवड कशाच्या आधारे झाली आहे?
10वीच्या गुणांच्या मेरिटच्या आधारे निवड झाली आहे. परीक्षा किंवा Interview नाही.
DV ची शेवटची तारीख काय आहे?
महाराष्ट्र सर्कल List-1 साठी 27 ऑक्टोबर 2026 पर्यंत DV पूर्ण करायचे आहे.
पहिल्या लिस्टमध्ये नाव नसेल तर काय?
पहिल्या लिस्टचे DV झाल्यानंतर रिक्त जागांसाठी दुसरी मेरिट लिस्ट येण्याची शक्यता आहे.
DV कुठे करायचे?
ज्या Division मध्ये निवड झाली आहे, त्या Divisional Office मध्ये DV करायचे आहे.
इतर भरती अपडेट्स
