घर बांधण्यासाठी सरकार देणार मोफत वाळू, नविन योजना जाहीर! अर्ज करा | Free Valu Yojana Maharashtra

Free Valu Yojana Maharashtra: नमस्कार मित्रांनो आता राज्य शासनाद्वारे घर बांधण्यासाठी मोफत वाळू मिळणार आहे, मंत्रिमंडळ बैठकीत नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. गरीब लोकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे, शिंदे सरकारने हा निर्णय सामान्य नागरिकांच्या हितासाठी घेतला आहे.

मोफत वाळू योजना मध्ये सहभागी होण्यासाठी काही अटी आणि शर्ती सांगण्यात आल्या आहेत, त्या आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. सोबतच कोणते व्यक्ती पात्र असणार? लाभ कसा मिळणार? ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे? अशी संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

तुम्हाला जर घर बांधायचे असेल तर ही महत्वाची अशी माहिती तुमच्या मोठ्या कामाची आहे. सरकार फ्री मध्ये वाळू देत आहे, त्यामुळे तुम्ही त्याचा फायदा घेऊन 5 ब्रास पर्यंत वाळू घेऊ शकणार आहात.

Free Valu Yojana Maharashtra 2024

वाळूचा अवैध उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याने, त्यावर वचक बसावी आणि माफक दरात लोकांना वाळू किंवा रेती मिळावी यासाठी शासनाने पुढाकार घेऊन नवीन विधेयक मंजूर केले आहे. 

विधेयकानुसार आता नदी पात्रातील किंवा इतर ठिकाणी होणारे वाळू उपसा शासना द्वारे केला जाणार आहे. यापूर्वी जे खाजगी लोक चोरून अवैध वाळू वाहतूक करत होते, त्यांच्यावर पूर्णतः कारवाई केली जाणार आहे.

वाढते वाळूचे दर आटोक्यात ठेवण्यासाठी हा महत्वाचा असा निर्णय घेतला गेला आहे, गरीबांना घर बांधण्यासाठी माफक कमी दरात वाळू यामुळे उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे.

Free Valu Yojana Maharashtra Elegibility Criteria

मोफत वाळू मिळवण्यासाठी काही पात्रता निकष ठरवून दिले आहेत, ते पुढीलप्रमाणे:

  • अर्जदार उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  • अर्जदार केंद्र किंवा राज्य शासनाच्या घरकुल योजनेचा लाभार्थी असावा.
  • मोफत वाळू साठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करणे बंधनकारक असेल.
  • वाळूची बुकिंग केल्यावरच अर्जदाराला वाळू मोफत मिळते.
  • केवळ 5 ब्रास पर्यंत वाळू ही मोफत दिली जाते.

अशा प्रकारचे पात्रता निकष आहेत, उमेदवार हा गरीब मध्यमवर्गीय कुटुंबातील असावा, आणि त्याने केंद्र किंवा राज्य शासनाच्या घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला असावा.

ज्यांना घरकुल मिळाले आहे, केवळ अशाच व्यक्तींना मोफत वाळू योजनेचा लाभ घेता येईल. इतर कोणालाही मोफत वाळू मिळणार नाही, त्यांना वाळू Online Booking द्वारेच खरेदी करावी लागेल. खरेदी करण्यासाठी प्रती ब्रास 600 रुपये आकारले जातील, व वाहतुकीचा खर्च स्वतला करावा लागेल.

Free Valu Yojana Maharashtra Benifits 

शासनाद्वारे चालवल्या जाणाऱ्या वाळू डेपो द्वारे आता अगदी रास्त दरात वाळू विक्रीत केली जाणार आहे. सोबतच Free Valu Yojana अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना मोफत वाळू देखील दिली जाणार आहे.

मोफत वाळू योजने अंतर्गत मिळणारे लाभ पुढीलप्रमाणे आहेत:

  • गरीब लोकांना घर बांधण्यासाठी मोफत वाळू मिळते.
  • या योजने अंतर्गत 5 ब्रास पर्यंत मोफत वाळू गरीबांना मिळते.
  • सोबतच 5 ब्रास पेक्षा जास्त वाळू पाहिजे असेल, तर प्रती ब्रास 600 रुपये दराने वाळू खरेदी करता येते.
  • लाभार्थ्यांना केवळ वाळू वाहतूकीचा खर्च लागतो.

Free Valu Yojana Maharashtra Online Form (Booking)

Free Valu Yojana Maharashtra

मोफत वाळू मिळवण्यासाठी अर्जदाराला ऑनलाईन स्वरूपात फॉर्म भरायचा आहे. जे उमेदवार फॉर्म न भरता मोफत वाळूची मागणी करतील, ते पात्र जारी असले तरी त्यांना रेती फ्री मध्ये दिली जाणार नाही.

ऑनलाईन बुकींग करणे आवश्यक आहे, त्यासाठी राज्य सरकारने अधिकृत संकेतस्थळ सुरू केले आहे. Official Website वरून Valu Booking करायची आहे.

सुरुवातीला तुम्हाला अधिकृत वेबसाईट वर जायचे आहे, तेथे तुम्हाला Online Valu Booking साठी क्लिक करायचे आहे.

तुमच्या समोर ऑनलाईन बुकींग चा फॉर्म Open होईल, तो फॉर्म तुम्हाला भरून घ्यायचा आहे. त्यात आवश्यक ती सर्व माहिती प्रविष्ट करायची आहे.

दिलेल्या सूचनांचे पालन करून अर्ज सादर करायचा आहे, फॉर्म अचूक भरणे आवश्यक आहे. शेवटी तुम्हाला तुमची घरकुला संबंधी माहिती टाकायची आहे, घरकुल मिळाले असेल तरच अर्ज पुढे जाईल, अन्यथा मोफत वाळू मिळणार नाही.

फॉर्म भरताना आवश्यक ते सर्व कागदपत्रे सोबत ठेवायचे आहेत, त्यानुसार जर कागदपत्रे अपलोड करण्यास सांगितले तर Soft Copy मध्ये कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.

फॉर्म भरून झाल्यावर शेवटी Free Valu Booking चा ऑनलाईन बुकींग फॉर्म सबमिट करायचा आहे. सबमिट करण्यापूर्वी एकदा अर्ज तपासून पाहायचा आहे, तसेच तुम्हाला जेवढी वाळू लागणार आहे, तेवढी वाळू तुम्ही अर्जात बुक करू शकता.

Free Valu Yojana Maharashtra मोफत वाळू कशी मिळवायची?

वाळूची ऑनलाईन बुकींग झाल्यावर त्यासंबंधी माहिती तुम्हाला प्राप्त होईल, नंतर तुम्ही तुमच्या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील वाळू डेपो मध्ये जाऊन बुकींग नुसार मोफत वाळू मिळवू शकता.

वाळू डेपो मध्ये तुम्हाला ऑनलाईन बुकींग केलेली पावती नेणे आवश्यक आहे. पावती रीसिप्ट ऑनलाईन बुकींग केल्यावर शेवटी येते, तेव्हा तुम्हाला ती सरकारी वाळू डेपो वरून मोफत वाळू मिळणार प्रिंट काढून घ्यायची आहे, किंवा PDF स्वरूपात Save करायची आहे.

ज्या लाभार्थ्याकडे पावती असेल आणि ज्याने online बुकिंग केली असेल त्त्यांनाच मोफत वाळू मिळणार आहे. वाळू मोफत मिळवण्यासाठी शासनमान्यता प्राप्त वाळू डेपो मध्ये जाऊन तुमच्या online बुकिंग नुसार मोफत फ्रीमध्ये वाळू मिळवता येईल.

अर्जदारांना वाळू मोफत स्वरुपात मिळणार आहे, पण वाळूची वाहतूक करण्यासाठी अर्जदाराला मात्र खर्च करावा लागणार आहे. जेमतेम एवढाच खर्च होणार आहे. मोफत वाळू फक्त 5 ब्रास मिळणार आहे, पण तुम्हाला जर जास्त वाळू हवी असेल तर तुम्ही जास्तीची वाळू पण मिळवू शकता.

जेवढी वाळू आवश्यक आहे त्यानुसार Free Valu Booking Online मध्ये मिळणारी 5 ब्रास वाळू आणि उर्वरित वाळू डेपो मधून खरेदी पण करता येते. खरेदी करण्यासाठी 600 रुपये या दराने प्रती ब्रास वाळू मिळवता येते.

हे पण वाचा:

Free Valu Yojana Maharashtra FAQ

मोफत वाळू कोणाला मिळणार?

ज्या व्यक्तीला घरकुल मिळाले आहे, त्यांना मोफत वाळू मिळणार.

मोफत वाळू मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा? 

अर्ज हा ऑनलाईन स्वरूपात अधिकृत वेबसाईट वरून करायचा आहे.

मोफत वाळू योजने अंतर्गत किती वाळू मिळणार?

पात्र लाभार्थ्यांना 5 ब्रास वाळू मिळणार आहे.

33 thoughts on “घर बांधण्यासाठी सरकार देणार मोफत वाळू, नविन योजना जाहीर! अर्ज करा | Free Valu Yojana Maharashtra”

  1. आमचे घरकुल आले आम्हाला घर बांधायला वाळू पाहिजे

    Reply

Leave a comment