Mahavitaran Junior Assistant Bharti: मित्रांनो महावितरण मध्ये ज्युनियर सहायक क्लर्क या पदासाठी भरती निघाली आहे. महावितरण द्वारे या संदर्भात अधिकृत जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे.
जाहिराती मध्ये Mahavitaran Junior Assistant Bharti 2024 संबंधी सविस्तर माहिती दिली आहे. महावितरण क्लर्क भरती ही एकूण 468 रिक्त जागांसाठी होणार आहे, B.com आणि पदवी प्राप्त उमेदवारांना नोकरीची मोठी सुवर्णसंधी आहे.
भरती संबंधित संपूर्ण माहिती या लेखामध्ये मी दिलेली आहे, जर तुम्ही या भरती साठी इच्छुक असाल तर तुम्ही ऑनलाईन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज सादर करू शकता.
महावितरण क्लर्क भरती साठी ऑनलाईन स्वरूपातच अर्ज सादर करायचा आहे, त्यासाठी फॉर्म भरण्याची शेवटची तारीख ही 20/06/2024 असणार आहे, त्यामुळे या तारखेच्या आगोदर आपला फॉर्म भरून घ्या.
भरती संबंधी माहिती काळजीपूर्वक वाचा, आणि नंतरच प्रत्यक्षरीत्या फॉर्म सादर करा. फॉर्म भरण्यापूर्वी तुम्ही अधिकृत जाहिरात देखील वाचू शकता, जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणती अडचण येणार नाही.
Mahavitaran Junior Assistant Bharti 2024
📢 भरतीचे नाव – Mahavitaran Junior Assistant Bharti
✅ पदाचे नाव – कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
🚩 एकूण रिक्त जागा – 468
👨🎓 शैक्षणिक पात्रता – उमेदवार हा B.com, BMS, BBA या पैकी कोणतेही शिक्षण घेतलेला असावा, तसेच त्याने MSCIT पूर्ण केलेली असावी.
➡️ नोकरीची ठिकाण – संपुर्ण महाराष्ट्र
💰 पगार – 19000 रुपये प्रती महिना (वेतन श्रेणी वाढू शकते)
💵 परीक्षा फी – Open: ₹500/- [मागासवर्ग: ₹250/-]
📝 अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
🔞 वयोमर्यादा – 18 ते 30 वर्षे
📍 वयोमर्यादा सूट – मागासवगीर्य प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षांची सूट.
📆 फॉर्मची Last Date – 16/08/2024
🌐 ऑनलाईन अर्ज | Apply Online |
🖥️ जाहिरात PDF | Download |
Mahavitaran Junior Assistant Bharti Eligibility Criteria (पात्रता निकष)
- उमेदवार महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- उमेदवाराचे वय किमान 18 वर्षे असावे.
- उमेदवार वयाने तीस वर्षापेक्षा जास्त मोठा नसावा.
- उमेदवाराने B.com, BMS, BBA यापैकी कोणत्याही एका फील्ड मध्ये पदवी प्राप्त केलेली असावी.
- उमेदवाराने MSCIT किंवा समतुल्य कॉम्प्युटर कोर्स केलेले असावेत.
वर सांगितलेले सर्व पात्रता निकष हे प्रत्येक अर्जदार उमेदवारांना लागू असणार आहेत, केवळ मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीमध्ये पाच वर्षांची सूट देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कोणत्याही उमेदवाराला सूट देण्यात आलेली नाही.
Mahavitaran Junior Assistant Bharti Apply Online
महावितरण ज्युनियर सहाय्यक क्लार्क या पदासाठी भरती निघाली आहे, उमेदवारांना ऑनलाइन स्वरूपात या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे.
ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी महावितरण विभागाद्वारे अधिकृत संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. अर्जदार या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
- अर्ज करण्यासाठी अधिकृत लिंक वर दिलेली आहे, Apply Online वर क्लिक करा आणि अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- महावितरण भरतीसाठी सुरू करण्यात आलेल्या संकेतस्थळावर महावितरण ज्युनियर सहाय्यक क्लार्क भरती साठी फॉर्म प्रदर्शित झालेला दिसेल.
- तुम्हाला त्या लिंक वर क्लिक करून महावितरण भरतीसाठी फॉर्म ओपन करायचा आहे. अर्ज ओपन झाल्यावर त्यामध्ये उमेदवारांना त्यांची संपूर्ण माहिती योग्य रीत्या भरायची आहे.
- माहिती ही तंतोतंत असावी, अर्ज अचूक सादर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे काळजीपूर्वक अर्ज भरायचा आहे. कोणतेही चूक करायची नाही, चूक झाली तर अर्ज बाद होऊ शकतो.
- अर्जा सोबत आवश्यक ते सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत. जाहिरातीमध्ये भरतीसाठी कोणते कागदपत्रे लागणार याची माहिती दिलेली आहे. जाहिरात वाचून तुम्ही माहिती घेऊ शकता.
- कागदपत्रे सॉफ्ट कॉपी स्वरूपात असावेत, फॉर्म मध्ये हे कागदपत्रे अपलोड करावे लागतात. हार्ड कॉपी स्वरूपात देखील कागदपत्रे जवळ ठेवा, शेवटी निवड प्रक्रियेमध्ये कागदपत्रे वेरिफिकेशन करताना हार्ड कॉपी कागदपत्र लागतील.
- भरतीसाठी परीक्षा फी भरणे देखील अनिवार्य आहे, साधारण प्रवर्गातील उमेदवारांना 500 रुपये परीक्षा फी भरायची आहे. मागासवर्गीय उमेदवारांना परीक्षा फी मध्ये 50% सूट देण्यात आली आहे, त्यानूसार 250 रुपये फी भरायची आहे.
- जे उमेदवार भरतीसाठी परीक्षा फी नाही, त्यांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे भरतीसाठी जर तुम्हाला खरोखरच फॉर्म भरायचा असेल तर अर्ज करतानाच परीक्षा फी Payment करून टाका.
- परीक्षा फी भरून झाल्यावर शेवटी अर्ज सबमिट करण्यापूर्वी, एकदा फॉर्म काळजीपूर्वक तपासून घ्यायचा आहे. एखादी चूक असेल तर ती लागलीच दुरुस्त करायची आहे, एकदा फॉर्म सबमिट केला की नंतर तो एडिट करता येणार नाही त्यामुळे काळजी घ्यायची आहे.
महावितरण भरती ऑनलाईन स्वरूपात होणार आहे, त्यामुळे ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख उमेदवारांना माहिती असणे आवश्यक आहे.
भरती संबंधी अधिक माहिती तुम्ही जाहिरातीच्या माध्यमातून जाणून घेऊ शकता, जाहिरातीमध्ये महावितरण भरतीसाठी अर्ज कसा करायचा? कोण पात्र असणार? निवड प्रक्रिया काय असणार? याची सविस्तर माहिती दिली आहे.
अधिकृत जाहिरातीची डाऊनलोड लिंक लेखामध्ये आहे, Download वर क्लिक करून तुम्ही महावितरण ज्युनिअर क्लर्क भरती जाहिरात अधिसूचना PDF Download करू शकता.
नवीन भरती अपडेट:
- Indian Army Recruitment: 12 वी पास असाल, तर मिळणार सैन्यात नोकरी!
- राज्यात शिक्षक भरती सुरू! तब्बल 21678 रिक्त जागा, लगेच अर्ज करा
Mahavitaran Junior Assistant Bharti FAQ
महावितरण ज्युनिअर क्लर्क सहाय्यक भरतीसाठी एकूण रिक्त जागा किती आहेत?
महावितरण ज्युनिअर क्लर्क सहाय्यक पदासाठी एकूण जागा 468 आहेत.
महावितरण भरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया लेखामध्ये दिली आहे, कृपया काळजीपूर्वक माहिती वाचा.
महावितरण भरतीसाठी उमेदवारांची निवड कशी होणार आहे?
उमेदवारांची निवड लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून महावितरण करियर विभागाद्वारे केली जाणार आहे.
I AM orphan girl I need job
I need job
Job
Hi I am prerana I need job